चला जाऊ गडकिल्ल्यांवर, महिमान गड,ता मान जि सातारा
*चला जाऊया गड-किल्ल्यांवर* (*महिमान गड*,ता.मान,जि सातारा) (भाग-०१) 🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩 *************************** ... नानाभाऊ माळी प्राचीन काळापासून आपला देश संपूर्ण विश्वाला शतकोंशतकं सहनशीलतेचा, मानवतेचा, शांतीचा संदेश देणारा महान संस्कृतीचां आदर्श दर्शक देश आहे.जगात शांती, मानवता नांदावी म्हणून भरत भूमीने जगाला सतशीलतेचा महान विचार दिला,मंत्र दिला आहे.अनेक आक्रमक या सोनेरी भूमीत आले.मानवतेचा महान संदेश धुडकावून संस्कृती नष्ट करण्यासाठी मंदिरं, तत्कालीन किल्ले तोड फोड करीत भरत भूमीची लयलूट करीत राहिले.त्यांच्या चालीरिती,संस्कारांची भारतीय संस्कृतीशी तिळमात्र साम्यता नव्हती.आपण मानवतेचे पुजारी बनून आक्रमकांना सहन करीत राहिलो.ते येऊन लयंलूट करीत राहिले.नरसंहार करीत राहिले. महिलांवरती अत्याचार करीत राहिले.येथील संस्कृती भ्रष्ट करीत राहिलें.भारतीय विशालता महानतेला हादरे देत यवनी सत्ता रुजवत राहिलें. ...