चला जाऊ गडकिल्ल्यांवर, महिमान गड,ता मान जि सातारा

*चला जाऊया गड-किल्ल्यांवर* 
(*महिमान गड*,ता.मान,जि सातारा)
             (भाग-०१)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी

                प्राचीन काळापासून आपला देश संपूर्ण विश्वाला शतकोंशतकं सहनशीलतेचा, मानवतेचा, शांतीचा संदेश देणारा महान संस्कृतीचां आदर्श दर्शक देश आहे.जगात शांती, मानवता नांदावी म्हणून भरत भूमीने जगाला सतशीलतेचा महान विचार दिला,मंत्र दिला आहे.अनेक आक्रमक या सोनेरी भूमीत आले.मानवतेचा महान संदेश धुडकावून संस्कृती नष्ट करण्यासाठी मंदिरं, तत्कालीन किल्ले तोड फोड करीत भरत भूमीची लयलूट करीत राहिले.त्यांच्या चालीरिती,संस्कारांची भारतीय संस्कृतीशी तिळमात्र साम्यता नव्हती.आपण मानवतेचे पुजारी बनून आक्रमकांना सहन करीत राहिलो.ते येऊन लयंलूट करीत राहिले.नरसंहार करीत राहिले. महिलांवरती अत्याचार करीत राहिले.येथील संस्कृती भ्रष्ट करीत राहिलें.भारतीय विशालता महानतेला हादरे देत यवनी सत्ता रुजवत राहिलें. 

                        भारतीय संस्कृतीनें शतकोंशतकं संपूर्ण विश्वाला सहनशीलतेचा, मानवतेचा,शांतीचा संदेश दिलेला आहे.भारतीय सभ्यतेने जगात शांती, मानवता नांदावी म्हणून जगाला सतशीलतेचा महान विचार दिला आहे.भारतात आक्रमकांच्या अत्याचारी वृत्तीशी लढणारे अनेक महान राजे होऊन गेलेतं! *छत्रपती शिवरायांनी* वयाच्या अवघ्या १३-१४ व्या वर्षी अत्याचारी,जुलमी सत्तेविरुद्ध तलवार उपसली होती. आयुष्यभर झुंड शक्तीशी लढत राहिलें.रयतेच्या सुखासाठी लढत राहिले.अखंड हिंदुस्थानचें हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवरायांनी मनामनात हिंदवी चेतना पेटवून तेजाळत ठेवली होती.स्वाभिमान चेतवला होता.घराघरातील अनेक युवक छत्रपतींच्यां शब्दांनी पेटून उठले होते.शिवरायांनी आक्रमकांविरुद्ध लढण्यासाठी सहयाद्रीच्या दऱ्या खोऱ्यात मशाल पेटवली होती.अत्याचारी यावनां विरुद्धच्यां लढाईतं शूर मावळ्यांनी आपले प्राणार्पण केले.या मातृ भूमीसाठी देह ठेवला होता. आक्रमकांना योग्य अद्दल घडवीत इतिहास घडविला होता.छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीतील युवकांना हिंदवी स्वराज्याच्या लढाईसाठी तयार केले.सैन्यात योग्य स्थान देऊन शत्रूवर तुटून पडण्यासाठी हाती स्वराज्यांची तळपती तलवार दिली होती.मुखी 'हर हर महादेवाचा' शब्दचित्काराची भक्कम ताकद दिली होती.

                 किल्ला शब्द मुखावर आल्यावर, कानी पडल्यावर, डोळ्यासमोर आल्यावर अंगात वीज चमकू लागते. वीर रसांचे पोवाडे कानी गर्जू लागतात. अंगातील शक्ती स्फूर्तीतं रूपांतर होत जाते.तोफेत गोळे भरावेसे वाटतात.शत्रूवर तलवारीचे वार करावेसे वाटतात. प्रचंड ऊर्जा अंगात संचारू लागते.छत्रपतींचें तेजस्वी रूप डोळ्यासमोर दिसू लागतं.त्यांचीं भवानी तलवार तळपतांना दिसू लागते!सह्याद्री पर्वत रांगेत पडघम वाजू लागतात. मायभूमीच्या रक्षणासाठी शत्रूवर चाल करून अत्याचारींवर तळपती तलवारीनें सपासप वार करावेसे वाटतात.रक्त सळसळू लागतं. औरंग्या,अफजल डोळ्यासमोर दिसू लागतो.त्यांचे कोथळे काढावेसे वाटतात.आम्ही अशाचं स्फूर्ती देणाऱ्या गडावर गेलो होतो.इतिहास प्रसिद्ध *महिमान गडावर* चढाईला गेलो होतो. 

                            सह्याद्री डोंगर रांगेतील कुशीत अनंत किल्ले हिंदवी स्वराज्यांची लढाऊ ओळख आहेत. दिनांक २१ डिसेंबर २०२५ रविवार रोजी 'चला जाऊया गड किल्ल्यांवर' मोहिमेचे प्रमुख, पूर्व एअरफोर्सचें सैन्याधिकारी आदरणीय वसंतराव बागूल सरांच्या सोबत... अशाचं एका गड-किल्ल्यावर गेलो होतो.होय आम्ही *महिमान गडावर* गेलो होतो.सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील महिमानगड गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्याच्या पायथ्यालाचं श्रीभवानी मातेचं मोठ मंदिर आहे.महिमानगड गावाच्या पायथ्यापासून उंच उंच डोंगरावर पडके बुरुज,तटबंदी दिसू लागतात.बोडक्या वृक्षांनी किल्ल्याच्या अवतीभावती गर्दी केलेली दिसली.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्रीभवानी माता मंदिरापासून पायऱ्या वजा मातीचा घसरडा अन खडकाळ कच्ची पायवाट दिसली.सभोवती वाळलेलें सुष्क कुसळगवत होतं.आम्ही काळजातून एकमुखी गर्जना करीत चढाईला सुरुवात केली होती,'छत्रपती  शिवाजी महाराज की जय!'...'जय भवानी!जय शिवाजी!हर हर महादेव!' एकमुखी गर्जना करीत, जोशात किल्ला चढत होतो.मान तालुक्यावर निसर्गाची कृपादृष्टी कमीचं असावी. जिकडे पाहावं तिकडे माळरान दिसत.हिवाळा असल्याने कुठंतरी शेतात हरभरा, ज्वारी, गहू डोलतांना दिसत होते.

            किल्ल्यापासून दूरवर कुठेतरी छोटी मोठी पर्वतरांग दिसत होती.त्या काळी आदिलशाहीत गडाच नाव महिमान गड नाव झालं असावं.मानदेशावर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी महिमानगड टेहळणी किल्ला म्हणून वापरात होता.
(हा भाग अपूर्ण आहे. भाग -०२ मध्ये पाहू)
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक- २६ डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol