सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी

               गाड्या पयी ऱ्हायन्यात!मोट्रा पयी ऱ्हायन्यात!मानसे पयी ऱ्हायनात!बठ्ठ जग पयी ऱ्हायन!पयनं काय थांबेलं नयी से!थांबावू भी नयी!पयल्हे पयानी गती धिमे व्हती!मानसे चांगला व्हतात!येरायेरलें धरी संगे मांगे लयी चाली ऱ्हायंतात!तव्हयं मव्हरे जायी जग जिकानं हाव्हरं नयी व्हतं!यांनं कुस्मरं त्यांनंघर जाये!त्यान्हा खाराम्हानं लोनचं यांन्हा जीभवर पघयेतं ऱ्हायें!सासुले सासुले येरायेर संगे मांघे निंघी जायेत!🌹

   जश्या काय बदलालें लाग्ना!उज्जी हावरं सुटनं!मानुस्की कुचमालं व्हवालें लाग्नी!मव्हरे जावानी हुडी वर-दुडी मांगे लाग्नी!...तठे मानोस कूचमालं व्हयी ग्या!तठे मानोस मानुसकी सोडी पैसास्नी गड्डीवरं बठी ग्या!मानोस्कीना हुंडूक दाबायी ग्या!येरायेरनीं कुडची-चड्डी धोतर व्हडी व्हडी मांगे ढकलाले लाग्नातं!सोता खोया खोसी पयालें लाग्नातं!हावरं मांगे लाग्न!पैसा नावनां उचकेलं डंग्रा खिसाम्हा जायी बठना!खिसा फुगी फुगी,छाती फुगालें लाग्नी!फुगऱ्यास्ना पाह्यरें सत्यानीं माय मरालें लाग्नी!तठेंग झुंगी धरी पयी जिकानीं आदत लागी गयी!बठ्ठ सोतागुंता पयनं सुरु व्हयन!सीता मांगे ऱ्हायी गयी!राम मांगे ऱ्हायी ग्या!रावण डोकावर बठी नाचाळालें लाग्ना! दुसरास्ले घोंकय मारी,डुक्रेतोंड खुपसी,या खोट्टा-नाट्टा या करमावता पयेत सुटनातं!मव्हरे पयी ऱ्हायनात!... खराखाती उबगेलं जिवडा मांगे पडी ग्या!पयनं
फुर्रगधडां मायेक व्हयी गे!🌹

         आपलं पयनं सुरु से!घोडं मांगे ऱ्हायी गे!फुर्रगधड पयी ऱ्हायनं!आंगवर कोनं वझं से ते ध्यानमा यी नयी ऱ्हायनं! सोतालें घोडा समजनारा फुर्रगधडां शाना व्हयी पयी ऱ्हायनात!त्यास्ना मुचूक जग मांगे आहिरी गये ते नयी?घर, गाव, जीव भावना मानसे सोडी!चिखूलम्हा फसेल चाक ढकली पयनं चालू से!त्याम्हा निरानाम रस नयी से!मुडकेल चाकलें रिपेर करी पयनं, खोल दल्लाम्हा, खोल दरीम्हा पडा सारखं से!यान्ह्या त्यान्हया मुंड्या मोडी,कोंबडी समजी शिजाडी खानारा तकलादू बाट्टोड कितला कितला मव्हरे पयतीन बरं?🌹

            पयनं कस जोईजे?पयनारा कायेजम्हा घुसी,आपलं फाटेल कायेज शिवनारा जोईजे!कायेज शिवनारा कमी व्हयी ऱ्हायनातं!फाडनारा वाढी ऱ्हायनातं!पयनारा नाऱ्या कुडची-फराक काढी पयी ऱ्हायना!अस्सल,गावरान,पिव्वर सोनं मांगे ऱ्हायी चालनं!पालिश करेल दुन्यालें येडं बनायी मव्हरे जायी ऱ्हायन!भरीम रसदार ऊस मांगे ऱ्हायी चालना!कुच्चांसंगे दुन्या हारके भरी पयी ऱ्हायनी!फुटेल ठिकरास्ना मांगे लागी ऱ्हायनी!चांगलं जबून सोडी पायतांमांगे झटा खायी ठोकरायी ऱ्हायनी!चमक्यांमांगे लागी मानसे सोनं सोडी पित्तय धुंडी ऱ्हायनात!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु. हडपसर,पूणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१६ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊ गडकिल्ल्यांवर(नारायणगड)