मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

मरणा आधी सावध व्हावे
आपले स्वहीत करून घ्यावे
💐💐💐💐💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी

जगणं परम साध्य आहें!जन्म मिळाला हे खरं आहें!त्यात मनुष्य जन्म मिळाला हे सर्वात मोठ भाग्य आहें!माणूस म्हणून जन्माला आलो हे भाग्यातील मोठं भाग्य आहें!जन्म मिळणं, आणि त्या नंतर जन्मानंतर मरण निश्चित आहें!मरण कसं असावं बर?सहज साध्य मरण जगणं सुकर असतं!आनंद देतं,सुखं पेहरीत, आपलं जीवन कोणाच्या कामी येत असेल असं जीवन जगून मनाची तृप्ती अन समाधानी जीवन जगत असतांना मरण आलं तर तें मरण यशस्वी जीवनाची इतिश्री असतें!अशा अनेक व्यक्ती त्यातून पार होतं गेल्या!चांगलं तें देऊन गेले!कोणी तत्वचिंतकं असेल!कोणी साधा शेजारी पण परोपकारी आणि सतत आपल्यासाठी धावून येणारा व्यक्ती असेल तर अशा व्यक्ती जीवनहित साधून निघून जातात!इतरांच्या काळजात नाव कोरून निघून जातात 

समाधान संत सानिध्यानें होतं असतं!संतांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनातून आपण समाधानाच्या जवळ पोहचत असतो!तत्वचिंतक अन संत सतगुणांचा प्रचार करीत असतात!आपण सदगुणांच्या संगतीत जातं राहिलो तर,आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळतं राहिलं!मग आपला जन्म सिद्ध करण्यासाठी मरणाची भीती पूर्णपणे नष्ट होईल!म्हणूनचं संत सांगून गेलेत,"मरणा आधी सावध व्हावे,स्वहीत साधून घ्यावे!".. हिचं तर खरी जीवन जगण्याची रीत आहें!सदाचारी असल्याचा पुरावा आहें!मग आपण मरणाला का घाबरावे?💐

मी कोणाच्या किती कामी आलो!कोणाच्या भल्यासाठी किती धावपळ केली!मी कोणाचे अश्रू पुसू शकलो का? मी कोणाचें दुःख कमी करू शकलो का?जर उत्तर "होय" असेल तर आपण स्वहीत साध्य केलं असं म्हणता येईल!स्वहीत म्हणजे स्वतःसाठी नं जगता इतरांसाठी जगून  जीवन समर्पण करणे होय!आपलं जीवन निरोपाची वाट पाहात असतं!मरणा आधी स्वहीत साधून जीवन समारोप घेतला तर त्याच्यासारखा तृप्तीचां क्षण नाही हो!आनंद नाही!समाधान नाही!!💐


 माझ्यातल्या "मी पणाला"मारून आम्हीं अशी ओळख निर्माण केल्यावर त्यातील "मी" नाश होत जातो!सद्गुण जन्म घेऊ लागतो!परोपकारासाठी आपलं जगणं सुरु होतं!दुसऱ्यांसाठी अश्रू तरळू लागतात!दुसऱ्यांच्या सात्विक आनंदाने आपणही आनंदीत होतो!त्यातील भावना निर्मळ होतं जाते!तीं भावना देखील निरपेक्ष असतें!जर मला आनंदाची अनुभूती होत गेली तर तो क्षण आपल्या जीवनाच्या उद्धाराचा होऊन जातो!💐

जन्माला येणारा जाणार आहेचं! प्रत्येकाचें वेळापत्रक ठरलेलं आहें!कोणाची बस लवकर येईल!कोणाची उशिरा येईल!जाणं निश्चित आहें!आलो म्हणून जाणं निश्चित आहे!पण मिळालेल्या वेळेत, काळात चांगलं तें पेहरून जायचं आहें!उगवणार तें निर्भेळ,अस्सल,सात्विक असेलचं!सोन्याहून पिवळं असेल!टिकावू असेल!समाजाला हितकारक असेल!  आपल्याकडे असलेलं "चांगलं" तें देतं रहाणे!ईश्वर सानिध्याच्या निकट जात रहाणे!...हा सात्विक प्रवाह आहें!सात्विक प्रवास आहें!हा प्रवाह सात्विक,अखंड वाहता असावा!नद्या शुद्ध अशुद्ध वाहून नेत असतात!सर्वं काही पवित्र करीत नदी शुद्धीकारण करीत असतें!नदी जीवन प्रवाह आहें!पवित्र दान देतं अशुद्ध वाहून नेत असतें!आपणही या मातीत विलीन होऊन जाणार आहोत!फक्त त्या आधी "स्वहीत साधून जायचं आहें!" आपण जन्माला येतांना इतर हसत असतात!आपण मरतांना इतरांनी रडावं,असं कर्म केलं तर तो क्षण मरणाला जिंकून सुकर असा देहाचा अन आत्म्याचा प्रवास सुरु राहतो!💐

"मी"मुळे कलह निर्माण होतं असेल तर आधी "मी" मारून टाकावा लागेल!"मी"मारण्यासाठी मनाला लगाम लावावी लागेल!मन उधळत राहिलं!चंचल घोडं उधळत राहिलं तर जगण्याच्या सात्विक अमृतापाशी पोहचता येणारं नाही!"भक्ती" गुरुची दान पेटी असतें!सदविचार,सगुण साकार,निर्गुण निराकाराच्या जेवढे जवळ जावू तेवढा आपल्या मनातील अशुद्ध,अनावश्यक कचरा साफ होतं राहिलं!विचारक,तत्वव्यत्ता,अन सद्गुरू हे अमृत'सार' आपल्या हाती देतं असतातं!सार घेऊन साऱ्याचं भलं करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होत राहते!"मी"पणा जळून जाऊ लागतो!अहंकार,मत्सर,क्रोध हे दुर्गुण जळू लागतात!जळण्याच्या त्या होळीकडे आपण त्रयस्थ होऊन पाहू लागलो तर आपला स्वहिताचा मार्ग अतिशय सुकर होत जातो!💐

....झालं असं की मी काल दिनांक ०९आगस्ट२०२३रोजी ऑगस्ट क्रांतिदिन होता!कालच थोर विचारवंत हरी नरके सरांचंही निधन झालं!मनाला दुखदायी घटना होती!अन त्यात काल शिंदखेडा येथे अजून अशाच सदगुणांच्या पायाजवळ पोहचलो होतो! "जीवन अनमोल"चं औषधं घ्यायला गेलो होतो!मी 'शिंदखेडा' या माझ्या गावी गेलो होतो!धुळे जिल्ह्यात असणारं हे प्राचीन गाव आहें!जुने आहें!गाव तसंच आहें!माती तिचं आहें!माणसं बदलली!जुनी माणसं जात आहेत!नवीन येतं आहेत!आधुनिकतेचा प्रकाश ही गावात पोहचला आहें!बदल होत असतो!माणसं जन्म घेऊन येतं आहेत!जात आहेत!माणसं जन्मून नवी पिढी येतं आहें!जुनी पिढी काळासंगे निघून जात आहें!त्यातील एका पवित्र मोक्षयात्रीला,पुण्यात्म्याला वंदन करण्यासाठी आलो होतो!💐

वयाच्या ९०व्या वर्षी आपला देह या भूवरी ठेवून "आत्मा" परमात्म्याच्या भेटीला गेला होता!त्यांचा जन्म देखील त्या काळात अधिक मासात झाला होता,असें म्हणतात!अन आता परमात्मा भेटीचा महिना देखील त्यांनी "अधिक मास" निवडला असावा!स्वतः आयुष्यातून कधीही पंढरपूरला गेले नाहीत!पण गोर- गरीब,गरजू,दाराशी आलेल्या व्यक्तीला कधीही माघारी पाठवलं नाही!सतत मदत करीत राहणाऱ्या या पुण्यात्माला ९०वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं!आपल्या उमेदीच्या काळात कुस्त्या खेळलेलें हे दानशूर व्यक्तीमत्व म्हणजेचं "कै.धोंडू भिला माळी!अर्थात आप्पा" यांचा उत्तर कार्याचा दिवस होता काल!💐

कै.आप्पाचां,संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या कर्म सिद्धांतांवर अतूट विश्वास होता!"सत्कर्म करीत राहावे, भगवंतास हृदयी बोलवावे!" अशी मानव सेवा करणारे आप्पा चालता बोलता गेलेत!१९-२०वर्षांपूर्वी त्यांच्या नातीचं लग्न होतं!आप्पांचं हृदयाच ऑपरेशन झालं होतं!तरीही लग्नाच्या वरातीत त्यांनी मुद्दल अर्थात जाड लाकडाची ५०किलो वाजनाची गदा सहज फिरविली होती!मी तर पाहतच राहिलो होतो!असें कुस्तीगीर,दानी महापुरुषांचा उत्तरकार्याचा दिवस होता!💐

मरणा आधी कै.धोंडू आप्पांनी सत्मार्गांच्या आचरणातून स्वहीत साधून संतांच्या विचारांना बळकटी दिली अन...
"मरणा आधी सावध व्हावे!
आपले स्वहीत साधून घ्यावे!"
या वाचनाचे पालन करीत दीर्घायुष्याचं जीवन मोक्ष्याकडे घेऊन गेलेत!विश्वात्मक आत्म्याचा परिचय देऊन गेलेत!तें शरीररूपी गावाला आले होतें!देवाने दिलेल्या देहाचा शेवटचा श्वास घेत ब्रम्हलीन झाले!त्यांच्या मुक्तीच्या सोहळ्यात साक्षीदार म्हणून मी ही त्या महान आत्म्यास शब्दांजली वाहात विनम्र अभिवादन करतो!💐
👏💐👏💐👏💐👏💐
*************************
... नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१०ऑगस्ट २०२३

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

चला जाऊ गडकिल्ल्यांवर(नारायणगड)