*तिरुपती बालाजी दर्शन*(*देव गाभाऱ्यात उभा*) (भाग-०२)🌹🌹💐🙏💐🌹🌹***********************... नानाभाऊ माळी माणसांचा अलोट श्रद्धामहापूर देवळात लोटल्यावर देव गाभारा फुलून जातो.भक्ती समागम एकरूप होतो,एकजीव होतो!भक्तीचं मनोमिलन होतं.आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.तिथे फक्त ईश्वरदर्शन असतं.परमेश्वराचं अतिविशाल लोहचुंबक असतं.बाळ आईच्या कुशीत अलगद बसावा.सुरक्षित अनुभव घेत राहावा. तसाचं ईश्वरास शरण गेलेला भक्त देवकुशीत बसून स्वतःस सुरक्षित समजू लागतो. देवदर्शाने,तृप्तीनें,समाधानांने नाचू लागतो.ईश्वर ओढ वेगळीचं अनुभूती असते.लाखो भक्त ईश्वर कृपेसाठी व्याकुळ असतात.तळमळत असतात.देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. आम्ही देखील करोडो भक्तांची श्रद्धा असणाऱ्या तिरुपती बालाजीला गेलो होतो.पुण्याहून साधारणत: १००० किलोमीटर अंतर रेल्वेनें पार करून दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या कुडकूडणाऱ्या थंडीत दर्शन रांगेत होतो. आम्ही ५४ जन होतो पण दर्शन रांगेत सर्वचं विखूरले गेलो होतो. त्याविषयी अनुभव कथन!.......... तिरुपती रेल्वे स्टेशनापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर, अति उंच डोंगरावर श्रीतिरुमाला बालाजीचं अतिभव्य प्राचीन मंदिर आहे.उंच डोंगरावर अतिभव्य शहर वसले आहे!भक्तांच्या निवासासाठी, डोंगरावर सात ते आठ अतिभव्य भक्तनिवास बांधलेले आहेत!एका भक्तनिवासात साधारण तीन ते चार हजार व्यक्ती राहू शकतात!लाईट, पाणी, वॉशरूम, लॉकर, नाश्ता, दुपार-संध्याकाळचं जेवण, केसकर्तनालय!सर्वचं मोफत...असे सात-आठ भक्तनिवास आहेत.दररोज लाखो भक्त दर्शनाला येत असतात. मंदिरातं दर्शनाला आलेल्या भक्तांसाठी मोफत इलेक्ट्रिक बसची सुविधा होती!आम्ही कुडकूडत्या थंडीत PS-5 भागातील 'वेंकटेश निलायम' भक्तनिवासात पोहचलो होतो.७ डिसेंबरला लॉकरची चावी घेतली. सर्व सामान लॉकरमध्ये ठेवलं.तेथेचं जेवण आटोपून घेतलं.रात्री 'व्यंकटेश निलायमध्येचं' झोपलो.दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ डिसेंबरला अंघोळी करून बाहेर पडलो.भाड्याने गाड्या करून त्या भव्य उंच डोंगरावरील छोटे मोठे पर्यटन स्थळ अन मंदिर पाहाण्यात दंग होतो.जिकडे पाहावे तिकडे भक्तजन दिसत होते!दिवसभर फिरून झाल्यावर पुन्हा भोजन गृहात जेवण उरकले.श्रीबालाजीचं अतिविशाल मंदिरं डोंगर उंचावर वसले आहे.थंडीचा कडका जाणवत होता.आम्ही देवस्थानांने दिलेल्या वेळेतील स्लॉटप्रमाणे संध्याकाळी ०४ वाजता दर्शन रांगेत उभे होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची प्रचंड गर्दी होती. 'गोविंदा!.. गोविंदा!..' असं श्री व्यंकटेशाचं एकमुखी नाम घेत... भक्तजन भक्तीच्या सागरात दर्शन रांगेने पुढे सरकत होती.आमच्या सोबत असलेल्या काही जेष्ठ नागरिकांसाठी विशेष पास देण्यात आल्या होत्या.ते वेगळ्या मार्गाने निघून गेले.राहिलेले इतर सर्व जन काही किलोमीटरच्या दर्शन रांगेने पुढे सरकत होती.माणसाला श्रद्धा अन आस्था जगण्याची उमेद देत असतात. श्वासात प्राण तरंगत असतो. कोंडमारा होऊ नये म्हणून दर्शन संजीवनीच महान कार्य करीत असतं!आम्ही श्रीबालाजी दर्शनाला गेलो होतो. देव दर्शनाची अभिलाषा घेऊन 'श्रीगोविंदा... गोविंदा' गजर करीत दर्शन बारीने पुढे सरकत होत दर्शन रांगेने पुढे सरकत होतो. मध्येच... विमान तळावर मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन असतं तसंच मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन मधून जावं लागलं.ज्यांच्याकडे मोबाईल, छोटया मोठया टाचण्या, पिना असतील ते सर्वजन अडकले.इतर सर्व भक्तजन दर्शनरांगेने पुढे निघून गेले.मोबाईल जमा करायला दूरवर वेगळंचं ठिकाण होतं.आमच्यासोबत असलेल्या ८०% व्यक्तींकडे मोबाईल होते.आम्ही पहिल्यांदाचं गेलो होतो. कुठल्या कुठल्या वस्तू सोबत असाव्यात हे माहीत नव्हतं. भक्तीचा अलोट सागर लोटला होता.त्यात आम्ही ५४ व्यक्ती दर्शन रांगेत पूर्णतः विस्कळीत झालो होतो.मागे पुढे कुठंतरी होतो.संपूर्ण भारतातून आलेले विविध भाषिक, प्रांतिक दर्शन रांगेत पुढे सरकत होती.मुखी एकच गजर होता,'गोविंदा...गोविंदा!' आम्ही त्या लाखों भक्तांच्या महापुरात इकडे तिकडे विखूरले गेलो होतो. संध्याकाळी ०४ वाजेपासून रांगेत होतो. रात्र झाली होती.अंगाला थंडीचा कडाका झोबंत होता.मोबाईल जमा करून पुन्हा रांगेत आलेले सर्व मागे राहिले होते.काहीजण जेष्ठ नागरिकांच्या रांगेने दर्शनाला गेले होते.मोबाईल जमा केलेला होता.लॉकरचं ठिकाण कुठे ते कळत नव्हतं.मोबाईल नसल्याने संपर्क खंडित झाला होता.दर्शन रांग खूप मोठी होती.मुखात,'गोविंदा.. गोविंदा' होता.श्रीव्यंकटेश बालाजी आतून हिम्मत देत होता.(अपूर्ण लेख पुढील-०३ऱ्या भागात पाहू)🌹🌹🙏💐🙏💐🌹🌹***************************... नानाभाऊ माळीहडपसर, पुणे-४११०२८मो.नं-९९२३०७६५००दिनांक-२० डिसेंबर २०२५nanabhaumali.blogspot.com
*तिरुपती बालाजी दर्शन*
(*देव गाभाऱ्यात उभा*)
(भाग-०२)
🌹🌹💐🙏💐🌹🌹
***********************
... नानाभाऊ माळी
माणसांचा अलोट श्रद्धामहापूर देवळात लोटल्यावर देव गाभारा फुलून जातो.भक्ती समागम एकरूप होतो,एकजीव होतो!भक्तीचं मनोमिलन होतं.आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो.तिथे फक्त ईश्वरदर्शन असतं.परमेश्वराचं अतिविशाल लोहचुंबक असतं.बाळ आईच्या कुशीत अलगद बसावा.सुरक्षित अनुभव घेत राहावा. तसाचं ईश्वरास शरण गेलेला भक्त देवकुशीत बसून स्वतःस सुरक्षित समजू लागतो. देवदर्शाने,तृप्तीनें,समाधानांने नाचू लागतो.ईश्वर ओढ वेगळीचं अनुभूती असते.लाखो भक्त ईश्वर कृपेसाठी व्याकुळ असतात.तळमळत असतात.देव भक्तीचा भुकेला असतो, असं म्हणतात. आम्ही देखील करोडो भक्तांची श्रद्धा असणाऱ्या तिरुपती बालाजीला गेलो होतो.पुण्याहून साधारणत: १००० किलोमीटर अंतर रेल्वेनें पार करून दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या कुडकूडणाऱ्या थंडीत दर्शन रांगेत होतो. आम्ही ५४ जन होतो पण दर्शन रांगेत सर्वचं विखूरले गेलो होतो. त्याविषयी अनुभव कथन!..........
तिरुपती रेल्वे स्टेशनापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर, अति उंच डोंगरावर श्रीतिरुमाला बालाजीचं अतिभव्य प्राचीन मंदिर आहे.उंच डोंगरावर अतिभव्य शहर वसले आहे!भक्तांच्या निवासासाठी, डोंगरावर सात ते आठ अतिभव्य भक्तनिवास बांधलेले आहेत!एका भक्तनिवासात साधारण तीन ते चार हजार व्यक्ती राहू शकतात!लाईट, पाणी, वॉशरूम, लॉकर, नाश्ता, दुपार-संध्याकाळचं जेवण, केसकर्तनालय!सर्वचं मोफत...असे सात-आठ भक्तनिवास आहेत.दररोज लाखो भक्त दर्शनाला येत असतात. मंदिरातं दर्शनाला आलेल्या भक्तांसाठी मोफत इलेक्ट्रिक बसची सुविधा होती!आम्ही कुडकूडत्या थंडीत PS-5 भागातील 'वेंकटेश निलायम' भक्तनिवासात पोहचलो होतो.७ डिसेंबरला लॉकरची चावी घेतली. सर्व सामान लॉकरमध्ये ठेवलं.तेथेचं जेवण आटोपून घेतलं.रात्री 'व्यंकटेश निलायमध्येचं' झोपलो.दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ डिसेंबरला अंघोळी करून बाहेर पडलो.भाड्याने गाड्या करून त्या भव्य उंच डोंगरावरील छोटे मोठे पर्यटन स्थळ अन मंदिर पाहाण्यात दंग होतो.जिकडे पाहावे तिकडे भक्तजन दिसत होते!दिवसभर फिरून झाल्यावर पुन्हा भोजन गृहात जेवण उरकले.श्रीबालाजीचं अतिविशाल मंदिरं डोंगर उंचावर वसले आहे.थंडीचा कडका जाणवत होता.आम्ही देवस्थानांने दिलेल्या वेळेतील स्लॉटप्रमाणे संध्याकाळी ०४ वाजता दर्शन रांगेत उभे होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची प्रचंड गर्दी होती.
'गोविंदा!.. गोविंदा!..' असं श्री व्यंकटेशाचं एकमुखी नाम घेत... भक्तजन भक्तीच्या सागरात दर्शन रांगेने पुढे सरकत होती.आमच्या सोबत असलेल्या काही जेष्ठ नागरिकांसाठी विशेष पास देण्यात आल्या होत्या.ते वेगळ्या मार्गाने निघून गेले.राहिलेले इतर सर्व जन काही किलोमीटरच्या दर्शन रांगेने पुढे सरकत होती.माणसाला श्रद्धा अन आस्था जगण्याची उमेद देत असतात. श्वासात प्राण तरंगत असतो. कोंडमारा होऊ नये म्हणून दर्शन संजीवनीच महान कार्य करीत असतं!आम्ही श्रीबालाजी दर्शनाला गेलो होतो. देव दर्शनाची अभिलाषा घेऊन 'श्रीगोविंदा... गोविंदा' गजर करीत दर्शन बारीने पुढे सरकत होत
दर्शन रांगेने पुढे सरकत होतो. मध्येच... विमान तळावर मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन असतं तसंच मेटल डिटेक्टर चेकिंग मशीन मधून जावं लागलं.ज्यांच्याकडे मोबाईल, छोटया मोठया टाचण्या, पिना असतील ते सर्वजन अडकले.इतर सर्व भक्तजन दर्शनरांगेने पुढे निघून गेले.मोबाईल जमा करायला दूरवर वेगळंचं ठिकाण होतं.आमच्यासोबत असलेल्या ८०% व्यक्तींकडे मोबाईल होते.आम्ही पहिल्यांदाचं गेलो होतो. कुठल्या कुठल्या वस्तू सोबत असाव्यात हे माहीत नव्हतं. भक्तीचा अलोट सागर लोटला होता.त्यात आम्ही ५४ व्यक्ती दर्शन रांगेत पूर्णतः विस्कळीत झालो होतो.मागे पुढे कुठंतरी होतो.संपूर्ण भारतातून आलेले विविध भाषिक, प्रांतिक दर्शन रांगेत पुढे सरकत होती.मुखी एकच गजर होता,'गोविंदा...गोविंदा!' आम्ही त्या लाखों भक्तांच्या महापुरात इकडे तिकडे विखूरले गेलो होतो. संध्याकाळी ०४ वाजेपासून रांगेत होतो. रात्र झाली होती.अंगाला थंडीचा कडाका झोबंत होता.मोबाईल जमा करून पुन्हा रांगेत आलेले सर्व मागे राहिले होते.काहीजण जेष्ठ नागरिकांच्या रांगेने दर्शनाला गेले होते.मोबाईल जमा केलेला होता.लॉकरचं ठिकाण कुठे ते कळत नव्हतं.मोबाईल नसल्याने संपर्क खंडित झाला होता.दर्शन रांग खूप मोठी होती.मुखात,'गोविंदा.. गोविंदा' होता.श्रीव्यंकटेश बालाजी आतून हिम्मत देत होता.
(अपूर्ण लेख पुढील-०३ऱ्या भागात पाहू)
🌹🌹🙏💐🙏💐🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२० डिसेंबर २०२५
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment