Posts

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

सोनं सोडी पित्तयंमांगे पयी ऱ्हायनात 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *************************** ... नानाभाऊ माळी                गाड्या पयी ऱ्हायन्यात!मोट्रा पयी ऱ्हायन्यात!मानसे पयी ऱ्हायनात!बठ्ठ जग पयी ऱ्हायन!पयनं काय थांबेलं नयी से!थांबावू भी नयी!पयल्हे पयानी गती धिमे व्हती!मानसे चांगला व्हतात!येरायेरलें धरी संगे मांगे लयी चाली ऱ्हायंतात!तव्हयं मव्हरे जायी जग जिकानं हाव्हरं नयी व्हतं!यांनं कुस्मरं त्यांनंघर जाये!त्यान्हा खाराम्हानं लोनचं यांन्हा जीभवर पघयेतं ऱ्हायें!सासुले सासुले येरायेर संगे मांघे निंघी जायेत!🌹    जश्या काय बदलालें लाग्ना!उज्जी हावरं सुटनं!मानुस्की कुचमालं व्हवालें लाग्नी!मव्हरे जावानी हुडी वर-दुडी मांगे लाग्नी!...तठे मानोस कूचमालं व्हयी ग्या!तठे मानोस मानुसकी सोडी पैसास्नी गड्डीवरं बठी ग्या!मानोस्कीना हुंडूक दाबायी ग्या!येरायेरनीं कुडची-चड्डी धोतर व्हडी व्हडी मांगे ढकलाले लाग्नातं!सोता खोया खोसी पयालें लाग्नातं!हावरं मांगे लाग्न!पैसा नावनां उचकेलं डंग्रा खिसाम्हा जायी बठना!खिसा फुगी फुगी,छाती फुगालें लाग्नी!फुगऱ्यास्ना पाह्यरें सत...

दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद

दर्शन.. संतुष्टीचा प्रसाद 🚩🚩🚩🚩🚩🚩 ****************** ... नानाभाऊ माळी          हृदयाचे ठोके पडत असतात!धडकन चालूच असतें!श्वसन चालूचं असतं!नाका तोंडातून श्वास सुरूचं असतात!बाहेरून बंदिस्त छातीच्या आतचीं धमणी अविरत सुरूचं असते!देहातला होम अखंडपणे सुरूचं असतो!ओमंकार स्वरूपाचं स्पंदन सुरूचं असतं!मानवी देह पावित्र्याचं सुंदर गुंजन असतं!आपला देह होम झाला तर ? देह दाह सहन करीत चंदणी लाकडाचा सुगंधी देह स्वाहा होत असतांना आपला जन्म सिद्ध करीत राहतं!आपला देह मुळातचं परमात्म्यास अर्पण करण्यासाठी असतो!आत्मा समर्पित भावनेने जगत असतो!जागत असतो!समर्पण सेवावृत्ती होऊन बसते!... अशाचं परमात्म्याच्या विशाल स्वरूपाचं दर्शन करण्या गेलो होतो!💐    सातारा जिल्ह्यातल्या 'वाई' पासून काही किलोमीटर अंतरावर,'ढोम' धरणाच्या पोटाशीच पवित्र कृष्णा नदी तिरावर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे!नृसिंहाच प्राचीन मंदिरं आहे आहे!निसर्गाच्या कुशीत, धरणाच्या विशाल साठ्याजवळी असलेलं प्राचीन मंदिरं स्वर्ग सुखाचं द्वार आहे असं वाटून गेलं होतं!आम्ही दिनांक ०९ जून २०२४ रविवार रोजी 'चला जाऊ गड-किल्ल...

मन मंदिरी, प्रति पंढरपूरी(श्री क्षेत्र दुधिवरे)

मन मंदिरी,प्रति पंढरपूरी    (श्री.क्षेत्र दुधिवरे) 🚩👏🏼🚩👏🏼🚩 ************** ... नानाभाऊ माळी  न भेटला पिंजरा  कुठे कुठे मी शोधू मन चंचल झाले  त्यासं कुठे कुठे बांधू!🚩 कुठे भेटेना तवा भाकरी मी रांधु  तृष्णा मनीची रें   मी देवाघरी नांदू...!🚩 शोध शोधीले रें तूला  मन नाही रें हे छंदू मन व्याकुळं झाले  देव मंदिरी मी वंदू...!🚩 अस्थिर अन चंचल पळून जाईल हे भोंदू  देव भेटला गाभारी मन भक्तीला रें बांधू..!🚩 चंचल मनास मी,देवनाड्याने बांधित असतो!निसटून जाईल म्हणुनी वाड्यात कोंडीत असतो!मन वाचाळ विरासारखे,माझ्याशी भांडीत असतं!नानाभाऊ सोडून नानासं उगाचं घोळीत असतं!मग दोघेही टुक्कार  होतात!अगदीचं मोक्कार होतात!'मन' अन 'मी' च्या मध्ये सोकावून उधळत असतात!चंचल मनास माझ्या श्रद्धानाड्याने बांधित असतो!पळणार नाही दूर दूर,करकंचून बांधित असतो!मन उधळतं वाऱ्यावर, हे नसतंच थाऱ्यावर!उथळ,उनाड,अस्थिर मनास व्यसणं बांधित असतो!मी मनास बांधित असतो!🚩           मन ओढून कोंडीत असतो!तरी आवरलं जात नसतं!बोट धरून चालायला मनचं सांगत अस...

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol

"भवरा"हिरदनां खोल दल्लान्हा बोल  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ************************** ... नानाभाऊ माळी       परोंदिन २ मार्चना दिन माव्यांलें डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना अहिराणी बोली भाषाम्हा लिखित "भवरा" कथासंग्रहानं प्रकाशन व्हयन!त्यास्नी जनम भूमी धुये से!धुये त्यास्ना हिरदम्हा बठेल से!धाकल्पन्ह्या बट्ठया खाना खुना,याद ताज्या व्हयी संगे लयी फिरी ऱ्हायनात!त्या ऱ्हायेल फासीपूल तें मिलन्हा भाग जीवन जगानी शक्ती सेतस!पुस्तक प्रकाशन धुयालेचं व्हयन!भवरा कथासंग्रह हिरदना खोल दल्लानां बोल सेतस!निर्मय मनन्हा बोल सेतस!खल्ली कायेजथुन लिखेलं सत्त्यांना बोल सेतस!कयकयनां बोल सेतस! भावरा कथासंग्रहम्हा १२ कथा सेतीस!कथाबीज आशयलोंग भिडस! कथा रसिक,वाचक मनलें पक्क धरी ठेवतीस!"डॉ. कोटणीस की अमर कहानीयाँ"गतं डोया हुगाडानं काम करतीस!हासी खुशी डोयालें पानी काढतीस!खोटा-नक्टास्लें गाव दर्जावर टांगांनं काम करतीस!हावू कथासंग्रह डॉ.दुसाने सरस्ना अनुभूतीना उमाया से!निमायालें उमेद दि कोमायेल से!बिमार मानोस्न शरीर कापीकुपी, जोडी-जाडी हुभ करनारा या डॉक्टर सोता गह्यरतसं!डोया वल्ला करतस! मानोस्किना...

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड(भाग -०४)

चला जाऊया गड-किल्ल्यांवर           *लोहगड किल्ला*              (भाग-०४) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ************************* ... नानाभाऊ माळी                    अनेक दुर्ग किल्ले  'उभट कडे' खांद्यावर घेऊन उभे आहेत!अंगावर घेऊन उभे आहेत!कित्येक शतकांपासून उभे आहेत! अनेक वादळानां तोंड देत उभे आहेत!आपलं अस्तित्व जपून उभे आहेत!खाली खोल खोल दरी दिसत असतें!खोल दरी प्रचंड जंगलांनी वेढलेली दिसतें!खोल दरीतून तुफान वारा वाहात असतो!गुंग गुंग आवाज करीत किल्ल्यावर येऊन धडकत असतो!कधी हृदयाला धडकी भरत असतें! निसर्गाचां उपजत कलाविष्कार पाहात राहावंसं वाटतं!किल्ल्याचे उभट कडे वारा,वादळ,पावसाला तोंड देत उभा असतात!'कडा'...किल्ल्याचा दागिना असतो!डोक्यावरील सुंदर गोंदन असतं!..'लोहगड किल्ला' असाच सुंदर दागिना घालून शतकानुशतके उभा आहे!          होय!लोहगडावर विंचू कडा आहे!विंचूच्या आकाराचा प्रचंड उभट कडा आहे!नजरेच्या पलीकडे त्याची लांबी आहे!विंचू कड्यावर जाऊन जीवंत अनुभव घेण्याचा आनं...

चला जाऊया गड -किल्ल्यांवर, लोहगड किल्ला (भाग-०३)

चला जाऊया गड-किल्ल्यांवर        *लोहगड किल्ला*              (भाग-०३)     🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ************************** ... नानाभाऊ माळी उंच उभट बुरुज हा  धमणीत दम भरतो जिंकूनी पायऱ्यांनां  कातळ पाषाण हरतो.!🚩 उंच पर्वतावरी उभा विशाल ढाल किल्ला चौफेर स्पर्शूनी अंगी   वाराही घेतो सल्ला..!🚩 झाले खडा मिठाचा भूमीत दडले नारद  आलेत तुफान किती  झालीतं येथे गारद...!🚩   गेलीत शतकं निघूनी  दडल्या स्मृती अजुनी देईल इतिहास ग्वाही पुढे वर्षानुवर्षे मोजूनी.!🚩  सह्याद्री ताठ छाती संदेश देतसे किल्ला  फडकतोय शिखरावर  भगवा थोपवूनी हल्ला!🚩 छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला 'लोहगड' किल्ला शौर्याची ग्वाही देत उभा आहे!आकाशाला गवसणी घालणारा हा किल्ला पराक्रमाची ग्वाही देत उभा आहे!अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे!आम्ही ०२ जून २०२४ रविवारी किल्ला पहायला गेलो होतो!सकाळी ०९ तें संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत उघडा असून,पुणे लोणावळा मार्गांवरील मळवली स्टेशन पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अस...

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)

चला जाऊया गड-किल्ल्यांवर        *लोहगड किल्ला*            (भाग-०२) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ********************* ... नानाभाऊ माळी  न थांबता प्रवास हा चाललाय कुणीकडे स्थळ वेळ काळ थेट   उभ्या छातीवर  कडे!🚩 उंच उंच डोंगरावर उभे डोलणारी झाडे घेई अंगडाई सृष्टी ही  येथे शूर शिपाई खडे!🚩 उंच भू माथ्यावरी पडती भिंतीस तडे लढ म्हणता मावळे चाले शस्र घेऊनि पुढे!🚩 लोहगड किल्ला उभा लोह पाऊल तें पडे सुरतचीं लूट सारी  खजिना लोहगड चढे!🚩  रविवार दिनांक ०२ जून २०२४ रोजी श्वास साहसात एकजीव झाले होतें!प्राण कंठात घेऊन शौर्याच्या ढालीवर तलवारीचे वार सहन करीत होतें!डोळे मावळे होऊन इंच इंच पुढे सरकत होतें!होय इतिहासातील पाने जीवंत झाली होती!शौर्याचं एक एक पान फडफडतं होतं!तलवारीचे खन्न खन्न आवाज कानी पडत होतें!तोफांचां बडीमार कानी येत होता!मी इतिहासातील युद्धभूमीवर होतो!चित्त रनांगणावर होतं!घनघोर युद्ध सुरु होतं!मावळे मायभूमीसाठी लढत होतें!शौर्य गाजवीत होतें!शत्रूला अस्मान दाखवीत होतें!पराक्रमाची शिकस्त सुरु होती!जीवन मरणाच्या भिन्न ...