चला जाऊया गड -किल्ल्यांवर, लोहगड किल्ला (भाग-०३)

चला जाऊया गड-किल्ल्यांवर
       *लोहगड किल्ला*
             (भाग-०३)
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
... नानाभाऊ माळी

उंच उभट बुरुज हा 
धमणीत दम भरतो
जिंकूनी पायऱ्यांनां 
कातळ पाषाण हरतो.!🚩

उंच पर्वतावरी उभा
विशाल ढाल किल्ला
चौफेर स्पर्शूनी अंगी 
 वाराही घेतो सल्ला..!🚩

झाले खडा मिठाचा
भूमीत दडले नारद 
आलेत तुफान किती
 झालीतं येथे गारद...!🚩
 
गेलीत शतकं निघूनी 
दडल्या स्मृती अजुनी
देईल इतिहास ग्वाही
पुढे वर्षानुवर्षे मोजूनी.!🚩

 सह्याद्री ताठ छाती
संदेश देतसे किल्ला 
फडकतोय शिखरावर 
भगवा थोपवूनी हल्ला!🚩

छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला 'लोहगड' किल्ला शौर्याची ग्वाही देत उभा आहे!आकाशाला गवसणी घालणारा हा किल्ला पराक्रमाची ग्वाही देत उभा आहे!अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे!आम्ही ०२ जून २०२४ रविवारी किल्ला पहायला गेलो होतो!सकाळी ०९ तें संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत उघडा असून,पुणे लोणावळा मार्गांवरील मळवली स्टेशन पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले विसापूर,तिकोना, तुंग अन लोहगड किल्ले सह्याद्री पर्वत रांगेत एकमेकांच्या जवळपासचं आहेत!आम्ही मात्र पौडरोड मार्गे गेलो होतो!कमी गर्दीचा मार्ग निवडला होता!

तर... लोहगडाची एक एक पायरी चढत होतो!किल्ल्याला गणेश, नारायण, हनुमान असे महाद्वार आहेत!गणेश दरवाज्यावर प्रचंड मोठे,अनकुचिदार खिळे ठोकलेले दिसलें!दरवाजा जबरदस्त मजबूत होतें!शेजारीचं देवळी आहे!हा किल्ला ७०० वर्षांपूर्वीचा असावा नंतर मलिक अंबर राज्य करीत होता!त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला होता!मिर्जाराजे जयसिंग यांच्या मध्यस्तीने झालेल्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला औरंगजेबकडे गेला!पण अवघ्या पाच वर्षांत पुन्हा लोहगड किल्ला जिंकून स्वराज्यात घेतला होता!🚩

 तर....गणेश दरवाजा पार करून आत गेलो!आत एक खोली दिसली!त्यात कदाचित दारुगोळा ठेवण्याचं कोठार असावं!आतल्या बाजूस छोटीशी गुहा देखील दिसली होती!दगड चुन्यात भक्कम बुरुज अन तटबंदी बांधलेली दिसतं होती!त्यावर मान वाकवून खाली जमिनीकडे लक्ष केंद्रित केले असता चौकोनी बोगदे दिसलें!कदाचित त्या छिद्रातून शत्रूवर मारा करण्यासाठी तोफ गोळ्यांचा वापर करीत असावेतं!आतल्या अंगाने सपाट जागेवर तोफा ठेवलेल्या दिसतं होत्या!आत अजून गुहा दिसत होती, कदाचित चोर दरवाजा असावा!त्यातून बाहेर लक्ष ठेवण्यासाठी बाह्य गुप्तद्वार असावं!तेथे काही उत्तम स्थितीत असलेल्या तोफा दिसल्या!त्या तत्कालीन संरक्षक कवच असाव्यात!🚩

आम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर जात होतो!आश्चर्य वाटेल अशा विस्तृत दगडी पायऱ्या होत्या!डोक्यावरून मागे खाली टोपी पडेल अशी मान वरती करून पाहिले असता किल्ल्याचा उभट बुरुज अंगावर येत असल्याचीं भीतीही वाटत होती! भक्कम,मजबूत बांधकाम असलेला बुरुज  कदाचित आम्हाला चिडवत असावा!पायऱ्यावरून वेड्या वाकड्या मार्गाने वर चढत असतांना समोर महादरवाजा दिसला!अतिभव्य दरवाजा प्राचीन वास्तुकलेच उत्तम उदाहरण होत!अजून पुढे गेल्यावर नारायण दरवाजा दिसला!तेथे एक धान्य कोठार सारखे भव्य दिव्य भुयारी भाग जाणवत होता!कदाचित लक्ष्मी कोठी असावी!छत्रपती शिवारायांनी सुरतची लूट केली होती!तो सर्व खजिना याचं लक्ष्मी कोठीत ठेवल्याचीं नोंद असल्याचे दिसते!

पुढे वरती चढतांना दरवाज्याच्या दोन्हीबाजूच्या दगडात हनुमाचीं मूर्ती कोरलेली दिसली!दरवाजा अतिशय भव्य दिव्य होता!हाच हनुमान दरवाजा होता!अतिशय उंच,विशाल, भव्य दिव्य हनुमान दरवाजा प्रचंड मोठया दगडात बांधलेला होता!बुरुजाच्या आतील बाजूस शिलालेख ही दिसला!लोहगड स्वराज्यासाठी अतिशय महत्वपूर्ण किल्ला होता!सुरक्षा अन राज्य कारभाराच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजाविलेला लोहगड किल्ला अनेक किल्ल्यांच्या परिघातील महत्वपूर्ण समजला जातो!थेट तटबंदी पर्यंत प्रचंड झाडांनी वेढलेला हा किल्ला शक्ती, युक्ती, सामर्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण किल्ला होता!असा हा किल्ला स्वराज्याची शान होता!वैभवी प्रतिष्ठेचा लोहगड किल्ला इतिहासातील पानांवर ठळक उठून दिसतो!🚩
(लोहगड किल्ल्याचा अपूर्ण भाग-०४ मध्ये पुन्हा पाहू!)
🚩🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-०५ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊ गडकिल्ल्यांवर(नारायणगड)