अनाम वीरा
🇮🇳अनाम वीरा🇮🇳
💐💐💐💐💐
...नानाभाऊ माळी
पुत्र आमुचे आम्ही देश वंशाचे
एव्हरेस्टच्या शिखरावर डोले तेज तिरंग्याचे!धृ!!🇮🇳
गोठल्या हृदय ज्योती, सांडू दे अश्रू मोती
संगिणीस चढली कांती, अभंग आमुची माती
दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम,हिंदवी नाम त्याचे!🇮🇳
हिमालय कठोर छाती, जोडुनी सीमेशी नाती
हरहर महादेव गर्जती, त्रिभुवनी नाचे किर्ती
चंद्र सूर्यही दिपूनी जाती, निरोप आमुचा पोहोचे!🇮🇳
काश्मीर आमुचा बाणा, कन्याकुमारीस फुटतो पान्हा
सुभाषचंद्र बोस राणा,टिळकांची सिंहगर्जना
मातृभूमीच्या उद्धारास्तव शपथ आमुची खेचे!🇮🇳
अभिनव आमुचा भारत, नवक्रांतीचा वारस
आशेच्या हिंदोळ्यावरी,संगिनीतुनी जिंकू पारस
पुत्र आमुचे आम्ही देश वंशाचे
एव्हरेस्टच्या शिखरावर डोले, तेज तिरंग्याचे!🇮🇳
💐💐💐💐💐💐💐
******************
....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१५ऑगस्ट२०२२
Comments
Post a Comment