Posts

Showing posts with the label मराठी देशभक्ती कविता

अनाम वीरा

🇮🇳अनाम वीरा🇮🇳 💐💐💐💐💐 ...नानाभाऊ माळी पुत्र आमुचे आम्ही देश वंशाचे एव्हरेस्टच्या शिखरावर डोले तेज तिरंग्याचे!धृ!!🇮🇳 गोठल्या हृदय ज्योती, सांडू दे अश्रू मोती संगिणीस चढली कांती, अभंग आमुची माती दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम,हिंदवी नाम त्याचे!🇮🇳 हिमालय कठोर छाती, जोडुनी सीमेशी नाती हरहर महादेव गर्जती, त्रिभुवनी नाचे किर्ती चंद्र सूर्यही दिपूनी जाती, निरोप आमुचा पोहोचे!🇮🇳 काश्मीर आमुचा बाणा, कन्याकुमारीस फुटतो पान्हा सुभाषचंद्र बोस राणा,टिळकांची सिंहगर्जना मातृभूमीच्या उद्धारास्तव शपथ आमुची खेचे!🇮🇳 अभिनव आमुचा भारत, नवक्रांतीचा वारस आशेच्या हिंदोळ्यावरी,संगिनीतुनी जिंकू पारस पुत्र आमुचे आम्ही देश वंशाचे एव्हरेस्टच्या शिखरावर डोले, तेज तिरंग्याचे!🇮🇳 💐💐💐💐💐💐💐 ****************** ....नानाभाऊ माळी हडपसर, पुणे-४११०२८ मो.नं-७५८८२२९५४६         ९९२३०७६५०० दिनांक-१५ऑगस्ट२०२२