बीज फुगेल डेडोरं
🌱🌱🌨️🌨️🌱🌱
*******************
... नानाभाऊ माळी
गाडं चालनं चालनं
खांदे दुसरेन्ह व्हजं
शिंगं हालांयी चाले
सांगे खांद्यानी सूजं!🌱
हाल्या डुल्या पाऊस
पखे लायीसनी येस
कायी माटीन्या भेगा
जिरी एकजीव व्हस!🌱
सोडे नां भुरभूरं पाठ
पानी पये काढी वाट
मझार आडाउभा धुरा
वावर तलावनां थाट !🌱
इघरें माटीना चिखूल
बीज फुगेलं डेडोरं
हासे निय्यानां कोंब
उभा आडंरी आंडोंर..!🌱
करे घाऱ्यावाऱ्या देव
दिखे उभा चाचंनं दैव
चाव्वयं चालनी चालनी
वारगी काढस रें भाव!🌱
डभूयी पानींना व्हडा
देस उभा गावलें येढा
धसे रद्दामाटीनं भीतडं
सोडे सवसारनां पुडा!🌱
🌱🌱🌨️🌨️🌱🌱
********************
... नानाभाऊ माळी
मु पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११ जून २०२५
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment