उन्हात थांबून सावली देणारा वटवृक्ष.. रतन माळी सर

*उन्हात थांबून सावली देणारं वटवृक्ष श्री.रतन माळी सर*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... उत्तमराव जाधव, हडपसर

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन जातात.मानव समाजाला हितकारक हिमालय उंचीच कार्य डोळ्यासमोर उभं करतात. कर्तृत्वाचां विशाल आदर्श समोर ठेवतं असतात.त्यांचं जगणं निरपेक्ष असतं.त्यांचं kary मानव समाजाच्या विकासासाठी असतं.अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात भाग्याने लाभतात, योगायोगाने आपल्या आयुष्यात येतात.हृदयातून त्यांचा अभिमान वाटत असतो.त्यांचीं भरारी फिनिक्स पक्षासारखी असते.राखेतून उंच भरारी असते.उंच शिखर गाठणाऱ्या अशा व्यक्तिमत्वास आपल्या छोट्याशा बोटाचा आधार देता आला.थोडा खारीचा वाटा उचलता आला हे ही विधिलिखित असावं असं वाटतं.

मला बऱ्यापैकी आठवतंय की,सन १९६७-६८ साली मी आमच्या गावी धुळ्याला गेलो होतो,कौटुंबिक भेटी गाठीसाठी गेलो होतो.धुळ्याला माझे मामा कै.श्री.दगा तात्या राहात होते. मनाने श्रीमंत असणारा मामा मित्रासारखे होतें. धुळ्यात मी गेल्यावर ते सहज बोलता बोलता बोलले होतें,'नाना,तू पुण्याला एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर काम करतोसं.मॅनेजर म्हणून काम करतोस.माझ्या सांडूचां मुलगा आहे. आताच मॅट्रिक पास झालाय. इथेचं धुळ्यात सहाव्या गल्लीतल्या एका वकिलाचं घराचं बांधकाम सुरु आहे.तिथं रोजंदारीने कामाला जातोय.माती, वाळू, विटा उचलून मजुरी करतोय.तूझ्या कंपनीत एखादी जागा असेल तर बघ नां? तेवढंच गरीब मुलाचं भलं होईल!' दगा तात्या माझे मामा होतें, मामापेक्षा मित्रासारखे होतें.त्यांचा अधिकार होता, हक्क होता माझ्यावर, जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे मी मामांच्या शब्दाबाहेर नव्हतो.मामांच्या घरी त्या तरुणाला बोलावून घेतलं. अन त्याचं दिवशी अंगावरच्या कपड्यांनीशी त्याला पुण्याला सोबत घेऊन आलो अन मी कार्यरत असलेल्या अक्यूरेट कंपनीत त्याला कामाला देखील लावलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होत *रतन माळी!आप्पासाहेब रतनजी माळी सर!कर्मवीर रतन माळी सर!*.. 🌹

आपल्या अनुभूतीच्या अनंत गोष्टी हृदयात जाऊन बसतात. आपण त्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही. आप्पा पुण्यात आले अन शुक्रवार पेठेतील ओकांच्या घरी राहायला गेले होते.ते शुक्रवार पेठेतून सायकलने हडपसरस्थीत कंपनीत कामाला जात होतें. वेळ पळत असते. घड्याळाचे काटे पळत असतात. समय कोणासाठी थांबत नसते.
पहा नां मी फक्त निमित्तमात्र होतो.त्या तरुणांस एखादी पायरी चढण्यासाठी फक्त माझा बोट दिला होता. दिवस-रात्र कष्ट,प्रचंड मेहनत, सचोटी, जिद्द, अंगी असेल तर माणूस एक एक पायरी चढत यशस्वी होऊन यशशिखरावर पोहचू शकतो.मी ज्या व्यक्तीस पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून धुळ्याहून सोबत आणलं होतं.त्या व्यक्तीची समर्पित वृत्ती निश्चितचं वाखाणण्या जोगी होती.कामाचा आवाका थक्क करणारा होता.तेव्हाचां तो तरुण अजूनही डोळ्यासमोरून जात नाही.आज आप्पाच्या स्वप्न पाहणाऱ्या चेहऱ्याकडे पाहतो तेव्हा श्री रतन माळी सरांचा, अर्थात आमच्या लाडक्या रतन आप्पांचा अभिमान वाटतो.🌹

               तर...रतन आप्पा पुण्याला आल्यावर कंपनी कामात इतका एकरूप झाला होता की स्वतःच्या लग्नाची आठवण करून द्यावी लागली होती.धुळे जिल्ह्यातील न्याहाळोद येथील मुलीचं स्थळ माझे दगा तात्या मामा घेऊन आले होतें.मॅट्रिक पास होती.योग जुळून आला.मुलीचं पूर्वाश्रमीचं नाव तुळसा होतं.तुळससारखी पावित्र्याची देवता होती.एका शुभ मुहूर्तावर न्याहळोद येथे छोटेखानीं लग्नसमारंभ पार पडला.ती मुलगी तुळसाचीं *शैला* झाली होती.छोट्याशा गावातील मॅट्रिक झालेली मुलगी भेटणं ही भाग्याचीं लक्षण होती.भवितव्यातील ज्ञानउजेडाचा जणू प्रारंभ झाला होता!🌹

          आप्पांचं लग्न झालं तसं पुण्यातल्या हडपसर भागातील ससाणेनगर येथे हे कुटुंब राहायला आले होतें.आप्पासाहेब जुनी कंपनी सोडून नवीन कंपनीत कामाला लागले होतें.विशेष म्हणजे ते कंपनी मालक श्री.अरुण कुदळे साहेब माझेच जवळचे मित्र होतें,अजूनही मैत्री आहेचं.आप्पा ज्या कंपनीत कामाला होतें त्याचं कंपनीत  सौ.शैलाताई देखील कामाला जाऊ लागल्या होत्या.नंतर ताईंनी बालवाडीचा कोर्स करून एका शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या ताईंची शिकविण्याची उत्तम हातोटी होती.त्या शाळेत पगार कमी मिळत असल्यामुळे शाळा सोडून ताईंनी ससाणेनगर भागात घरोघरी हिंडून लहान लहान मुलं गोळा करून ज्ञानदानाचां श्रीगणेशा केला होता ससाणेनगर येथील जगताप चाळीतील एका खोलीत बालवाडी सुरु झाली होती.वर्गात बालकांची संख्या फक्त नऊ होती.स्वतःचां आत्मविश्वास अन जिद्द म्हणून पटसंख्या वाढत गेली होती. बालवाडी कोर्स केल्यांचा हा  मोठा फायदा होता.पुढे ताईंनी डी.एड केलं आणि जीवनाकडे शिक्षक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला होता.🌹

कष्टाची लाज का बाळगावी? सत्कार्माची लाज का बाळगावी? ज्ञानदानाचं पवित्र कर्माची कसली लाज? ज्ञानज्योती सावित्रीबाईनीं तर अंगावर टाकलेल शेण,माती सहन केली होती.पण त्यांनी आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नव्हती.फुले दापंद्याचां वारसा, सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सौ.शैलाताईनीं ससाणेनगरात घरोघरी फिरून इवल्या इवल्या, लहान लहान मुलं आपल्या वर्गात आणून शिकवीत होत्या.मुलं ही फुलांसारखी कोमल असतात. निरागस असतात. लहानपणाचे संस्कार कायम स्वरूपी अंगीकारत असतात.त्यांना बालपणीचं योग्य वळण लावायचे असतात. तेचं खरं वय असतं.तेचं संस्कार ताईंनी केले होतें.शैलाताईंना सर्वजन *माळीणबाई* म्हणून ओळखत असतं.माळीण बाईंची बालवाडी म्हणजे भविष्यातील आदर्श पिढी घडविण्याचं ज्ञानकेंद्र झालं होतं. 

बालवाडी नंतर मुलांचं पुढील शिक्षण महत्वाचं होतं.स्वप्न मोठं होतं. विध्यार्थी घडवायचे होतें.ज्ञानहोम चालूच होता.रतन आप्पा देखील मोठ्या टेल्को कंपनीत नोकरीला लागले होतें. आधी ऐकत नसतांना स्वतः शैलाताईनीं आमच्या घरी येऊन सांगितले होतें,' मोठ्या टाटा टेल्को कंपनीत मोठी संधी आली असतांना हे ऐकत नाहीयेत!' मी व माझी पत्नी सौ. सुशीलाने आप्पाची समजूत काढून टेल्को कंपनीत रुजू झाले होतें.दोघे अतिशय कष्टाळू म्हणून एकेक वर्ग वाढत होतें.हा ज्ञानयोग साधा नव्हता. ज्ञानहोम साधा नव्हता.पुढे १ली ते १२वी ज्युनियर कॉलेजपर्यंत विस्तार वाढत गेला होता.आम्ही त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखाचे साक्षीदार आहोत. आम्ही एकमेकांना सर्वं गोष्टी share करतं असू.आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होतें.

मी देखील साधारण त्याचं काळात नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचा कारखाना उभारला होता. पाहाता पाहाता मी देखील उद्योग क्षेत्रात समरस होत गेलो.'स्टारमेक कंट्रोल प्रायव्हेट लिमीटेड' कंपनीचीं स्थापना करून कंपनीचा विस्तार वाढत गेल्याने राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑर्डरी पूर्ण करतांना आमची दमछाकं होत होती.स्वतःच प्रॉडक्ट असल्यामुळे व्यापार क्षेत्रात नामांकित कंपनी म्हणून नाव झालं. अशा वेळेस अनेक राज्यात जावं लागायचं.आप्पांना बऱ्याच वेळेस सोबत नेलं होतं.ते स्वखुशीने तयार असतं.आम्ही सोबतीने कित्येक ठिकाणी सोबत हिंडलो.पण माझा आप्पा जो धुळ्याहून त्या काळी सोबत घेऊन आलो होतो.तोचं आप्पा, तसाच आप्पा आहे. स्वभावात कुठलाही बदल झाला नाही. अंगावरच्या कपड्यांवर आलेला आप्पांच्या आज रोजी पुणे शहरांत १४-१५ शाळा आहेत अन जवळपास २०० कर्मचारी (teaching, non teaching staff )असूनही निर्गवी व्यक्तिमत्व आहे.एकदा तर मी हॉस्पिटललां ऍडमिट होतो.हॉस्पिटलमधून  घरी आल्यावर आप्पाने माझे हात-पाय व्यस्तीत चोळून दिले होतें, दाबून चेपून दिले होतें.खरंच आप्पासारखा नात्याने मामेभाऊ लाभणं योगायोग
दोघे पतिपत्नीचं आमच्या घरी येणं कधीच सुटलं नाही.आम्ही देखील त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत.आम्ही सतत एकमेकांचें सुख-दुःख सांगून एकमेकांना दिलासा,आधार देत आलो आहोत. मन हलके फुलके करीत आलो आहोत.🌹

 एकेक वर्ग वाढतांना जागेचां प्रश्न मोठा होता.जिद्द अन उमेदीला कष्टाची साथ मिळाल्यावर स्वप्न साकार होण्यास साह्य होतं असतं. ससाणेनगरला जागा घेऊन उभयता पती-पत्नी घराचा पाया खोदतांना आम्ही डोळ्यांनी पाहिले होतें.घरटं बनवीण्यास चिमणीला दूरवरून काटक्या गोळा कराव्या लागतात. कष्टाची सवय असलेल्या उभयतांनी शिकणाऱ्या बालगोपालांसाठी, विध्यार्थ्यांसाठी जागा विकत घेऊन, स्वतः पाया खोदून, शाळेचे वर्ग बांधले अन स्वतःच्या इमारतीत शाळा भरू लागली होती.वेळेच नियोजन,दगदग, धावपळ काय असते,आप्पा अन शैलाताईंकडून शिकावं.कष्टाचा आदर्श ज्ञानदानात रुजतो, मुरतो तेव्हाचं आदर्श पिढीचा जन्म होत असतो.थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यां पावलांवर चालणाऱ्या या पती-पत्नीकडून शिकावं.*'महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचा'* प्रारंभ करून ज्ञानदानाचा वसा चालविणाऱ्या या कुटुंबाविषयीं कितीही लिहिले तरी थोडके होईल. शाळे संदर्भात शासकीय कामकाज जिल्हापरिषद, शिक्षण खात्यातून होत असतं.सरकारी कार्यालयात, कार्यालयीन वेळेत आपली कामं करून घेण्यासाठी आप्पानीं टेल्को कंपनीत सतत सेकंड शिप्ट घेतली होती.दुपारी कंपनीत जाऊन रात्री एक वाजता घरी यायचं.पुन्हा सकाळी उठून तोचं शिरस्ता असायचा.शैलाताई शाळेचा कारभार सांभाळत असतं तर आप्पा बाहेरची कामं सांभाळत असतं.दोघांचं ट्यून अतिशय छान जमलं होतं.🌹

त्यांचं आमच्या कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होतें.शैलाताई आमच्या सौभाग्यवतीनां नेहमीचं सांगत असतं,'तुमच्या मुली वैशूताई अन सोनीताईलां आपण आदर्श अन उत्तम संस्कार केले आहेत.ताई मला खरंच अभिमान वाटतो आपला!'
हळूहळू संस्थेच्या शाळा वाढत होत्या.स्वभावाने ताई शांत तर आप्पा थोडे तामसी स्वभावाचे!घर, संसार,संस्था,कंपनी चालविण्यासाठी भिन्न स्वभावी असावं लागतं.दोघांनी संस्था त्यामुळे संस्थेचा कारभार उत्तम हाकता येतो.दोघांनी शिक्षण सेवेत, आदर्श, पवित्र कार्यात पूर्णतः झोकून दिले होतें.आपल्या कार्यात मग्न होतें. कधीकधी ईश्वर देखील परीक्षा घेत असतो.दैव कधी दु:ख घेऊन हिंडत असतं.२५ वर्षांपूर्वी शैलाताईंच, समाजसेविका, आदर्श शिक्षिका,सर्वांच्या आवडत्या माळी बाईंचं गंभीर आजाराने दुःखद निधन झालं.अन आप्पा अन मुलगी सोनुदीदीवर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला होता.सोनू लहानच होती. कदाचित १२ वीला असेल दुःखावेगाने रडत होती. तिची जन्मदेती आई देवाघरी गेली होती. मुलांच्या दृष्टीने हे सर्वात मोठं दुःख होतं. असं दुःख कोणावरही येऊ नये.आप्पा अन सोनू दुःख सहन करीत पून्हा नव्या उमेदीने उभे राहिले होतें.🌹

 अनेक माणसं भेटतात, मोठी होतात अन इतरांना विसरूनही जातात. आप्पा जमीनवरच चाललां आहे. चालतो आहे.आता वयाच्या ७५ व्या वर्षी देखील आप्पा सतत बोलत असतो,'नाना,नानी मी तुमच्यामुळे पुण्यात आलो.आज तुमच्यामुळेचं उभं राहता आलं.आमचे एकत्रित २०० च्यावर नातेवाईक पुण्यात आले आहेत.ते केवळ आपल्या पुण्यातील सहकार्यामुळेचं.' अभिमान वाटावी अशी बाब आहे. आम्ही आप्पांकडून बऱ्याच गोष्टी शिकत आलो, शिकत असतो. आमच्या सोबत येतांना, जेवतांना आप्पाची वेगळीचं खासियत आहे.जेवन झाल्यावर उष्टी ताटं स्वतः उचलून ठेवणारे आप्पासाहेब सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाटतो. माणसं सर्वचं जगत असतात.पण माणूसपण घेऊन कितीजन जगतात हो? मी आप्पात सच्चे माणूसपण पाहिले आहे.

आता आप्पांची मुलगी अन जावाई अर्थात सोनुदीदी अन प्राचार्य रवींद्रजी वाघ सरांनी संस्थेचा कार्यभार उत्तम सांभाळीत आहेत. शाळेच्या,घरगुती प्रत्येक कार्यक्रमाला सोनुदीदी आमंत्रित करून आग्रहाने बोलवत असते. आम्ही वेळात वेळ काढून उपस्थिती लावीत असतो.सोनू दिदी -वाघ सरांच्या अर्थात तरुणांच्या कार्यशैलीमुळे आता आप्पांचां व्याप कमी झालां आहे.आता वेळ काढून आप्पा घरी येत असतात.खूप बरं वाटतं.भेटून जुन्या आठवणीत रमून जातो.आम्हा उभयतास आप्पांच्या येण्याने नेहमीचं आनंद होत असतो. सुरुवातीपासूनचं मैत्री पलीकडचे नातेसंबंध जपले असून ते वृद्धिंगत होत आहेत.आप्पांच्या कष्टाला, लढाऊ वृत्तीला, संयमी जिद्दीला हृदयातून सलाम करतो.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल कितीही लिहिले तरी अपुरे होईल. कदाचित शब्द अपुरे पडतील.आप्पांना दीर्घायुष्य लाभो अन शाळेसाठी नववीन उपक्रम राबविण्यासं परमेश्वर त्यांना प्रचंड शक्ती प्रदान करो याचं शुभेच्छा आम्ही पती-पत्नी व्यक्त करतो!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**************************
... उत्तमराव जाधव
एम.डी, स्टारमेक कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड,हडपसर,पूणे-४११०२८

Comments

Popular posts from this blog

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol