सिंहासनाधीश्वरांचा राज्याभिषेक सोहळा
*सिंहासनाधिश्वर राजयभिषेक सोहळा*
(शिवनेरी तें रायगड स्वराज्याची लढाई)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
***************************
... नानाभाऊ माळी
आज छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक सोहळा महामंगल दिवस त्या निमित्ताने.. 🚩
जेव्हा जेव्हा राजसत्तेचा दंभाचार, अनाचार,अत्याचार,अनाठाई शिगेला पोहचतो तेव्हा तेव्हा शोषित शक्तीचा अचानक असहनीय स्फोट होत असतो.स्फोट अतिभयंकर असतो. एकवटलेल्या शक्तीचा प्रतिकार असतो.महाभारतात सांगितल्याप्रमाणे जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुषाचां जन्म होत असतो.अधर्मीचां अस्त होत असतो.विनाश होत असतो. दबलेल्या आवाजाचा एकवटलेला प्रचंड स्फोट होत असतो.शोषितांचीं दैवी शक्ती उदयांस येत असतें.त्याचं वेळेस शोषक, अनाचारी,अत्याचारी असुरांचा नायनाट होत असतो,संहार होत असतो.असुरांच्या संहरासाठी श्रीहरीविष्णूसं अनेकदा जन्म घ्यावा लागला.श्रीमहादेवांनीं बोकाळलेल्या अनाचारी शक्तीचा शिवतांडवातून संहार केला होता.हे प्राचीन शीव-भागवत पुराण संदर्भ आहेत शोषितांच्या लढाईसाठी!माणसाला स्फूर्ती, शक्ती देणारे अध्यात्मिक शिवपुराण संदर्भ आहेत.हा अधर्मावर धर्माचां विजय असतो.दैवतं हे आदर्श प्रतीकं आहेत.🚩
सत्याचा सात्विक भाव सोन्यास चकचकीत करीत असतो. दिग्विजयी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचां जन्म अधर्माच्या विनाशसाठीचं झाला होता.म्हणूनचं त्यांना दैवी अवतार मानलं जातं. महाराजांचं रूप *सूर्यासम तेजस्वी* होतं.छत्रपतीचं पृथ्वीवरती येणं असुरांच्या वधासाठीच झाला होता, हे ठामपणे अंतःकरणातून सांगावसं वाटतं.या दैवी युगपुरुषांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्यां,उंच उंच किल्ल्यावर झाला होता. तत्कालीन सत्तेच्या अधीन असलेल्या *शिवनेरी* किल्ल्यावर झाला होता!युगपुरुषांचा जन्माने शिवनेरी किल्ला पावन झाला आहे.आम्ही या महापुण्यभूमीसं, शिवनेरी किल्ल्यावर जाऊन सतत पूजत असतो!माथा ठेवण्यासाठी जात असतो.महाराजांच्यां किल्ल्यास प्रचंड उभट कडे अन भक्कम तटबंदीच्या आहे.किल्ल्याला महाद्वारापासून सात दरवाजे आहेत आम्ही या दिग्विजयी किल्ल्याला पूजत असतो!वंदन करीत असतो, मुजरा करीत असतो.भगवी पताका सतत आमच्या हृदयात हिंदवी स्वराज्याची मशाल पेटवीत असतें.
रयत यवनांच्या छळानें नरक यातना भोगत असतांना मातोश्री जिजाऊंआई साहेबांच्या पोटी जन्म झालेल्या सह्याद्री सिंहाचं नाव, सूर्यासम तेजस्वी पुत्राचं नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवबा ठेवले होतें.रयतेच्यां जान-मालाच्या रक्षणासाठी स्वतःच्या छातीची ढाल करणारे, रयतेवर होणारा अत्याचार निपटून काढण्यासाठी अत्याचारीनां अद्दल घडविणारे हिंदवी स्वराज्य रक्षक *छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता!*
डोळ्यादेखत यवनीं अत्याचारानें दुःखी माँसाहेबांच्या हृदयात खोलवर जखम जाऊन पोहचली होती.यवन डोळ्यादेखत अत्याचार करीत होतें. हा इतिहास डोळ्यांतं कानांतं,मनातं पक्का जाऊन बसला होता. रयतेवरील बोकाळलेल्या अनाचारी, सुलतानी, मोघलाई, निजामी, जुलमी अत्याचाराने माँसाहेब अत्यंत दुःखी होत्या.शहाजीराजे दुःखी होतें.
माँसाहेबांच्या मनात दबलेला सुडाग्नी रौद्ररूप घेत होता.मनात दबलेली वेदना मनातच घर करून वाढीस लागत होती.ती सल भरून काढण्यासाठी त्यांच्या डोळ्यातं भवितव्याचं स्वप्न पडत होतं,'रयतेचं सुख जाणणारा आपलाचं राजा असावा!' शिवनेरी किल्ल्यावर बाल शिवबांना जन्म देणारी माता व्याकुळ होत होती. 🚩
बाल शिवबांच्यां मनावर प्राचीन ग्रंथ रामायण,महाभारतातील सत्यमार्गावर चालणाऱ्या श्रीराम, श्रीकृष्णआदर्श कथांचा न्याय्य, शूर इतिहास संस्कारातून बिंबवू लागल्या होत्या.वर्तमानातील दाहक वास्तव बाल शिवबांना कळू लागलं होतं, 'रयतेचं,आपलंच राज्य असावं!न्याय्य राज्य असावं!बहुजनांचा राजा असावा!' या विचारांचीं धगधगती मशाल शिवबांच्या काळजात पेट घेत होती धगधगू लागली होती.काही वर्षांत काळजातील पेटलेल्या मशालीने रौद्ररूप धारण केलं होतं. बालमावळ्यांना, संवागडयांना सोबत घेऊन युद्धाभ्यास सुरु झाला होता. पाहाता पाहाता वाऱ्यासम झंजावात पसरून सह्याद्रीच्या काना कोपऱ्यात, दऱ्या खोऱ्यात शूर,वीर मावळे शिवबांसाठी स्वतःचा प्राण त्यागण्यास पुढे सरसावले होतें. येथूनच जळत्या मशालीने मना मनात स्वराज्य संकल्पना दृढ होत लढाईची फळी उभी झाली होती. या शिवबांच्या या साहसाने चौफेरच्यां यवनी सलतनत हादरून गेल्या होत्या.शिवबांचा प्रचंड झंजावाताने, लढायांनी चौघी सलतनत काळजीत पडल्या होत्या. 🚩
स्वराज्यासाठी आता थांबणं नव्हतं. एक एक किल्ले जिंकून त्यावर राज्य करण्याची धमक शिवरायांच्या अंगी आली होती.मोघल, निजाम, अन अन्य सलतनींना पाहाता पाहाता जेरीस आणलं होतं.सह्याद्रीचा सिंह प्रचंड आक्रमक झाला होता. चौबाजूनी शत्रू असूनही त्यांना धडा शिकवीत पाहाता पाहाता ३५० किल्ल्यांचे स्वामी असणारे छत्रपती शिवराय धर्म रक्षणासाठी लढत होतें, पौलादासारखे उभे होतें.जुलमी राज सत्तेशी लढत होतें.शूर-वीर योद्धे, संवगडी छत्रपती शिवरायांसाठी आनंदाने वीर मरणास सामोरे जात होतें.सहकाऱ्यांच्या वीर मरणाने दुःखी, कष्टी,एकांती अश्रू ढाळणारे राजे उद्दिष्टासाठी,ध्येयासाठी, स्वराज्यासाठी इतिहास रचित होतें होतें.पाहाता पाहाता आयुष्यातला तो दिवस उगवला होता.तेजस्वी सूर्य उगवला होता.नवा सूर्य उगवला होता. *०६ जून १६७४* च्या महामंगल दिनी रायगडावर शंख, संभंळ,नगारे, ढोल वाजत होतें.छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक समारोह सुरु होता.देश विदेशातील राजे,प्रतिनिधी हा सोहळा याचं देही,याचं डोळा अनुभवण्यासाठी उपस्थित होतें.🚩
कुलभूषण, भूपती, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावंतस, सिंहासनाधीश्वर, न्यायप्रिय, गडपती, अशा आकाश हृदयी,रयतेच्यां हृदयातील राजांचा राज्याभिषेक सोहळा सुरु होता.ज्या विशाल हृदयी मातेने शूरवीर पुत्र रयतेच्या स्वाधीन केला होता, त्या माँसाहेब जिजाऊंच्यां डोळ्यात समिश्र अश्रू वहात होतें.त्यात आनंद होता, सहलेल्याचीं वेगळी आठवण होती.!राज्याभिषेक सोहळ्याने दिग्विजयी राजांचं नवं रूप दिसतं होतं,तेजस्वी रूप दिसतं होतं. शिवनेरी किल्ल्यावर युगपुरुषांचा जन्म झाला होता. रायगडावर राज्याभिषेकानंतर नवाविष्कार रयतेला दिसतं होतं. अनुभवत होतें.अशा विश्वजयी राजांना कोटी कोटी नमन करतो..🚩
शिवनेरी कुशीत जन्म घेणाऱ्या अन रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडलेल्या छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आज ०६जून रोजी शेवाळवाडी,ता. हवेली जि पुणे येथे राज्याभिषेक सोहळायनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होतें.छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व बांधवाना, भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं -९९२३०७६५००
दिनांक -०६ जून २०२६
(राज्याभिषेक सोहळा दिवस)
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment