सौ. स्मिता दिदी, प्राचार्य रवींद्र वाघ सर २५ व्या विवाह दिनाच्या शुभेच्छा.
*सौ.स्मिता दिदी-प्राचार्य रवींद्रजी वाघ सर*
(*२५ व्या लग्नदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*)
🌹💐💐🍫🎂🍫💐💐🌹
*****************************
...नानाभाऊ माळी
आज २५ जून!निर्जला एकादशी विठ्ठलरूप दर्शनाचां पवित्र दिवस.आज गुरुदत्तांचा वार गुरुवार आहे.२५ संख्येची फोड वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करता येईल. सकारात्मक श्रद्धेतून २५चां सुंदर मुखडा सजवता येतो.२+५ बेरीज केल्यास ०७ होतात.अंक शास्रानुसार ०७ अंक अतिशय शूभ मानला जातो.शुभांकरं शुद्ध श्रद्धेचं प्रतीक असतं.दोनावर पाच २५ होतात.ही संख्या अलौकिक,अगम्य, चमत्कारीक वाटते.ही संख्या नवनवीन चमत्कार दाखवते.२५ संख्या वैभव,संपन्नता अन यशस्वीतेचं प्रतीक असतं. उंच शिखराचीं पहिली पायरी मानली जाते.सळसळत्या तारुण्याचं प्रतीक मानलं जातं.वर्षांचां विचार केल्यासं २५ वर्षांची कारकीर्द नवचैतन्य देतं असते.ऐन पंचवीशीतीलं व्यक्ती अनेक स्वप्न पाहणारी असते.मग ज्यांचं जवळपास पंचवीशीतील सळसळत्या तारुण्यात,वयात लग्न झालं अन त्यासं २५ वर्षं पूर्ण झाली आहेत त्याला काय म्हणावं? *लग्नाचं पंचवीसावं वर्षं.* अजून कसं स्पष्टीकरण देऊ शकतो. *लग्नाचं रौप्यमहोत्सवी वर्षं?* होय *विवाहाचं रौप्यमहोत्सवी वर्षं!*
ज्या जोडप्याने २५ वर्षांपूर्वी एकमेकांचां विश्वास संपादन करून आत्मविश्वासाने पवित्र,अग्नीसाक्षी, सर्व आप्त,सखे सोयऱ्यांच्या साक्षीने, लोकसाक्षीनें,अतूट मंगलाष्टकांच्या उच्चारातून विवाह बंधनात बांधले गेलेत,एकरूप झाले.उभयता पती-पत्नीचा *२५ वा लग्नसोहळा दिवस* असेल तर त्या उभंयताना होणारा स्वर्गीय आनंद वेगळीचं अनुभूती देणारा असेल नाही का!..... 🌹
होय!.आज २५ तारीख आहे, अर्थात २५ जून २०२६.अन २५ वर्षांपूर्वी ज्या दोघांनी एकमेकांवर प्रेम,विश्वास ठेवून विवाह बंधनात अडकले तें जोडपं आहे पुण्यातील एका प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अन सचिव!संस्थेचे हडपसर येथील प्रशासकीय मुख्यालय असलेल्या *महात्मा फुले विद्यानिकेत संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता रविंद्र वाघ मॅडम अन सचिव-प्राचार्य श्री. रविंद्रजी पोपटराव वाघ सर*
आज २५ जून रोजी उभयतांच्या विवाहास २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. २५ भाग्यांक संख्या असावी.२५ वर्षं म्हणजे संस्कार, प्रेम विश्वासाचं नातं. नाते संबंध जोडत एक एक दिवस मागे निघून गेलीत!कार्य बाहुल्य होऊन एकेक वर्षं निघून गेलीत. उभयता दोघेही मागे वळून पाहतात तेव्हा खरंच कष्टाचं मोल झाल्याच समाधान त्यांना वाटत असतं.गेल्या २५ वर्षांची समृद्ध शिदोरी त्यांच्या जवळ आहे.या काळात उभयतांनी एकमेकांना सांभाळून घेत, एकमेकांचां आदर-सन्मान करीत,तडजोड करीत संस्थेचं प्रचंड मोठं कार्य सांभाळीत आहेत.अनेक घटनांच्या साक्षीने कधी हसू, कधी ताणतणाव,कधी एकांती अश्रू गाळीत दोघांनीही एकमेकांना ऊर्जा, ताकद,बळ,साथ संगत देत आज २५ जूनला त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रौप्यमहोत्सव साजरा करीत आहेत.
मोठया बाई..समाजसुधारक स्व. शैलाताई रतन माळी मॅडम,मोठे सर.. कर्मवीर श्री.रतन माळी सरांच्या अथक परिश्रमातून महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था स्थापन केली होती.त्यासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केले होतें.संपूर्ण जीवन वाहिले होतें. शिक्षण संस्थेचं छोटंसं रोपटं लावलं होतं.पुढे रोपट्याचां वृक्ष झाला.आता त्यांचं भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी उभयता सौ. स्मितादिदी अन प्राचार्य श्री. रवींद्रजी वाघ सर प्रचंड मेहनत घेत आहेत. दगदग,धावपळ करीत आहेत. परिश्रम घेत घेत आहेत. मोठ्या बाईंचा आदर्श अन आठवणी हृदयात साठवून आदरणीय मोठ्या सरांचा आशीर्वाद डोक्यावर घेऊन सौ. स्मिता दिदी अन प्राचार्य वाघ सर संस्थेच्या कार्यात पूर्णतः मग्न आहेतं.उभयता संस्था समर्पित आयुष्य जगत आहेत.*त्यांच्या अथक कष्टातून ज्ञानवृक्ष विस्तारतो आहे.* अनेक फांदया विस्तारत आहेत.ज्ञानवृक्ष लहान होता.आता मोठया बाई आनी मोठ्या सरांचा कष्टाचा वारसा उभयता पती-पत्नी चालवत आहेत.उत्तम प्रशासक म्हणून ठसा उमटवीत आहेत.ही अभिमानास्पद गोष्ट आहे.संस्थेचं कार्य पार पाडणे मुळात कठीण असतं. सहज,सरळ नसतं.प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढणारी ही जोडी महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचां कार्यभार सांभाळीत आहेत.🌹
सुख-दु:ख,चढ-उतार,मानापमान सहन करीत महात्मा फुले-सावित्रीबाई फुलें दापंत्याचां शैक्षणिक, सामाजिक वारसा चालवीत आहेत.मानसिक स्वास्थ्य सांभाळून संस्थांरूपी विस्तारलेला जग्गनाथाचा रथ हाकीत आहेत. संस्थेतील सर्व कर्मचारी, शिक्षक यांची उत्तम साथ मिळतेय.सहकारी स्टाफ वेळोवेळी धावून जाणारा असून संस्थेसाठी जीव ओवाळून कर्म करीत आहेत. दिलेली जबाबदारी पार पाडीत आहेत. महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था चालवतांना कामाच्या व्यापात २५ वर्षें मागे निघून गेलीत.लग्न होऊन २५ वर्षं देखील झालीत.उभयतासं आपल्या लग्न सोहळ्यानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा देतो.पुढील काही वर्षांत आपल्या लग्नाचां सुवर्ण महोत्सव saj
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -२५ जून २०२६
nanabhaumali.blogspot. com
Comments
Post a Comment