भुंजायेल ढेकाया देखत लगीनले गवू
*भुंजायेल ढेकाया देखत लगीनल्हे गवू*
🌞🌞🌞🌝🌝🌞🌞🌞
***************************
... नानाभाऊ माळी
काल्दीन पूनाम्हा थेंब थेंब पानी गायीस्नी ढग नींघी ग्यात,वारावर उडी ग्यात!काल्दीन उनन्ही नको नको करी सोडं व्हतं. दिनभर उकयी ऱ्हायंत.डोकाले चटका बठी ऱ्हायंता.आंगन्हा घाम नींघी ऱ्हायंता.डोकावरना यायं मोठा व्हता.२१ जूनन्हा व्हता.सालन्हा बठास्थिन मोठा दिन व्हता.चटका देत मायनी याद दि, झिरीमिरी पानी गाई उडी ग्या.पुरा मिरीग कोल्ला खटक नींघी ग्या.मिरीगना शेवटला दिनल्हे.आथा तथा फवारा मारी, हाजेरी लायी नींघी ग्या.काल्दीन पानी आठे पूनालें हलका फुलका, नाचत वाजत उना, फवारा मारी नींघी ग्या.🌞
गावले कशा सें?निस्ता धुराळा उडी ऱ्हायना.मी परोनंदिन सनवारना दिन २० तारीखले, सक्कायम्हा धु्यातून मेहेरगांव, चिंचवारमार्गे लामकांनीवरतून *म्हसाळे* गावले गयतु.रंगतन्हा नातानं एक लगीन व्हतं.म्हसाळे पाच-सव हजार लोकसंख्यांनं गाव व्हयी.धुयातून म्हसाळे गावं ५२ किलोमीटर दूर सें.मी धुयातून लामकांनी एसटीवर बसनू. कंडक्टर-ड्रायवर उनात. ड्रायवर दादांनी इंजिनन्ही चाबी फिराई तशी उफडाईस्नी इंजिन घुरंघुर्र सुरु व्हयन.सक्कायलेचं हेट्यान्हा यायं चटकाडाले लाग्ना व्हता.तो कोनी मुर्वत ठेवनार हो?त्याले बठ्ठाजन सारखाच सेतस.मी जेवना बाजूनं सीट सोडी,डावा बाजूनां सीटवर जायी बठनू.जेवना बाजूलें सूर्य देवन्हा चटका सुरु व्हता.आंगले घाम सुटी ऱ्हायंता.त्या लालपरिले चार-पाच खिडक्याचं नही व्हत्यात.हुनी हुनी वार्गी एसटीम्हा घुसी ऱ्हायंती.चालती एसटीनां तुटेल खिडखी म्हायीन वार्ग मझारमा घुसी ऱ्हायंतं.
एसटी हार एक गावंनां इस्टॅंडवर थांबनी का चढ-उतर करनारा परवासी घाई गर्दीम्हा एक दुसराले नीस्ता ढकली,धडश्या मारी, जागा सापडावागुंता पयी ऱ्हायंतात. सिटले बिलगी ऱ्हायंतात.कंडक्टरनां डबल बेलनी घंटी आयकी का ड्राइवर खड्डा-खुड्डा टायी-टुयी एसटीले तंगाडिं ऱ्हायंता.हेट्यातून सूर्यदेव चटका देत वर वर सरकी ऱ्हायंता.एसटी आपलाचं नांदम्हा पयी ऱ्हायंती.मझारम्हा परवासीस्ना गलका सुरु व्हता.रस्ताना जेवना-डावा बाजुले भर उंडायाम्हा भुऱ्या,काया तपकीऱ्या रंगना उनम्हा भुंजायेल वावरे दिखी ऱ्हायंतात. त्यास्लेभी पानींनी तीस लागेल व्हती.
डोकावर दुरपावूतं एखादा पोक्कयपटक ढग वार्गावर तनगी हेट्या पयी ऱ्हायता.कायजून त्या का वावरेसले दात दखाडी,पाठ दखाडी, वावरले बोटे दखाडी हासी पयी ऱ्हायंतात.गंजज वावरे नांगरी,वखरी पटाशी फिरायी तयार दिखनात. गंजज वावरेस्मझारं बिल्लासभर हुभं नियेगार कामोळे दिखी ऱ्हायंत. ठिबक सिंचनन्हा बारीक बारीक काया पुरन्यास्ना बुंगरास्मायीन कामोळ्यानां मुयासले झिरीमिरी पानी जिरी ऱ्हायंत.कामोळ्यानं कव्वे रोप भुंजेल उंडायाम्हा जित्त ऱ्हावानी कायपात करी ऱ्हायंत.नेम्मन पानींनी व्हडा देयल दिखी ऱ्हायंनां.पानींना कोठेचं सार आकार दिखी नही ऱ्हायंनां.वरसारद ठीक ऱ्हायी ते कामोळ्यालें जीवदान भेटनार सें.मी भुंजायेलं वावरे दखी ऱ्हायंतुं.जीव काल्यावाल्या करी ऱ्हायंता.आवनं पानी नही पडना ते कसं व्हयी?
आवनं जांभूयीनं फय चिक्कार येल सें.झाडखाले जथा बन तथा सडा टाकेल दिखी ऱ्हायना. हायी दुष्कायनं लक्षण ते नही ना?शेतकरीन्या बिबता दखनारा कोन वाली सें?बठ्ठ अधांतरी सें.एसटी पयी ऱ्हायंती.तीनसंगे मन्ह मन आनी डोया दोन्ही पयी ऱ्हायंतात.मव्हरे चिचवार जावावर आंगे पांगे जंगलं लाग्न व्हतं. जंगलंन्हा झाडे भी वरसारदन्हा शीतडांगुंता निमयांगत उभा दिखनात.लामकांनींमव्हरे सापन्हा येटोयांगतं घाट लाग्ना व्हता.जंगलंन्हा मझार शनिमंदिर दिखनं तसं हात जोडी नमस्कार करा व्हता.घाट पार व्हवावर उतारलें लामकांनी गाव एसटीनी वाटचं दखी ऱ्हायंत.
स्टँडवर उतरनूत तव्हयं समजनं सनवारन्हा दिन लामकांनीन्हा आठवडे बजार व्हता.बजारम्हा जथीबन तथी चौमेहेर गर्दी व्हती.त्याम्हा उन चटकाडी ऱ्हायंत.घाम काढी ऱ्हायंत. लामकांनी स्टँडनां आंगे गंजज दुकानें दिखनात घर-संसार, खेती-भाती, कपडा-साड्या,रोजी रोटीलें लागी आश्या दुकानें व्हतात. हालवाईनां दुकानें व्हतात. न्यारा न्यारा दोर आन दोरना मुक्सा दिखनात.एक नजर फिरायी दखी नजर आपोरी पडी इतला दुकानें बजारम्हा मांडेल दिखनात.म्हसालालें जानं व्हतं.लगीनन्ही टाई टयांले नको म्हनिसनी तठेंग एक नातेवाईकन्ही चार चाकी गाडी लामकांनीन्हा स्टँडवर लेवाले उंथी.लगीनन्हा मांडोम्हा बठनूतं तठे भी उन सोय खायी नही ऱ्हायंत. लगीनन्हा मव्हरे जेवनन्ह्या पंगती उठी ऱ्हायंत्यात. वरतून गरम त्याम्हा जेवन गरम, भाजी हुसहुस कराले लायी ऱ्हायंती. तरिभी घामेघाम व्हवा पावूत दोन्ही कुखा भारी कुमचाडी जेवनु. 🌞
दुरतून डीजेन्हा आवाज कान आनी छातीम्हा बठेल कायेजल्हे हादरायी ऱ्हायंता.पार वरतून नवरदेव वाजत गाजत मांडोम्हा घुसना तश्या जेवनंन्ह्या पतरवाया टाकानं बंद कर.लगीनन्हा टाइम दुपारन्हा १२ वाजाना घटिक मुहूर्तवर व्हतं.लगीन २ वाजता लाग्न.बठ्ठा घमेंघाम व्हयी जायेल व्हतात.धूम धडाकाम्हा लगीन लाग्न तशा लगीनल्हे येल पाव्हना टेजवर नवरदेव नवरीसंगे फोटुक काढीस्नी मुंग्यास्ना मायेक एक एक नींघी ग्यात.मांगे खल्ली आटा-साटानां नातलग थांबेल व्हतात.चटकाड्या उंडायांम्हा देवले बरस रें, बरसं मेघू राया बरसं रें आशी हातजोडी रावनाईम्हा लगीन लाग्न.वर आथा दथा आंग चोऱ्या ढग फिरी ऱ्हायंतात पानींना सार आकार दिखी ऱ्हायंता. नागरेल वावरेस्नी तीस कव्हयं भागी हायी चिंता करी, लगीन लायी धुयातून चालतीवर एसटी धरी नि पुनागंम नींघनू.
🌞🌞🌞🌝🙏🌝🌞🌞🌞
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११0२८
मो.नं-९९२३0७६५०0
दिनांक-२३जून २0२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment