वैशाखी वादळवारा कवी संमेलन -2026

*वैशाखी वादळ वारा काव्य संमेलनं २०२६*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी
        
        सध्या धोंड्याचा महिना,अधिक जेष्ठ मास सुरु आहे.घरोघरी जावाई मुलगीचां सन्मान सुरु आहे.सर्वजन देवपून्य पदरात पाडून घेण्यासाठी श्रद्धेनें देवद्वारी नतमस्तक होत आहेत. पाहुण्यांच्या आदर सत्कारात मग्न आहेत. काही दिवसांपासून निसर्गाने आपला खेळ प्रारंभ केलेला दिसतोय.वादळ, वारे वहायला लागले आहेत.सोबतीला चटकेंदार उन आहे...खरंच या अद्भुत विशालकाय आकाश कुपीत काय काय दडलेलं असावं माहीत नाही!विश्वनिर्मात्याने या आकाशी विवरात, अद्भुत पोकळीत अनंत ग्रह तारे भरलेले असावेत.सर्वचं स्वतःचा तोल सांभाळून,अंतर ठेवून आकाशविवरात आपल्याचं नादात भ्रमण करीत आहेत.त्या भ्रमणकारी ग्रह-ताऱ्यांमध्ये पृथ्वी देखील असावी.विश्वनिर्मात्याने त्यावर प्राणवायू,पाणी उपलब्ध करून दिलं असावं.जीवांची निर्मिती झाली असावी.सगळं सगळं बदलून गेलेलं असावं.पृथ्वीच्या आशिया खंडात, भारतातील महाराष्ट्र भूमीत,प्राचीन काळापासून अनेक वादळं येऊन गेली असावीत.काही वादळं घोंगावत आहेत.शब्द हत्यारानें कित्येकांना विचारमृधेतून उपटून,आदळून काढलं असावं. काही स्वत्वाचा शोध घेत जागेवरचं घोंगावत असतील. भविष्यातील परिवर्तनाला इंधन पुरविणारे हे वादळं कवितेत रुजून परिवर्तनाची भाषा शिकली असावीत...🌹

                 भूतकाळात नैसर्गिक, ऐतिहासिक, राजकीय,सामाजिक, साहित्यिक वादळं येऊन गेली असतील.काही वादळ घोंगावून, घोंगावून कुठेतरी आदळून,बदडून, हासडून, बदल घडवून, परिवर्तन घडवून शांत शांत झाली असावीत. विचारवादळ असेच असतात. पक्क्या तात्विक घट्ट पवनाधार घेत घोंगावून मंथनात्मक प्रचंड परिवर्तन घडवून,उलथापालथी करून निघून उजेड पसरवीत थांबले असतीलही

...असंच एक विचारवादळ घोंगावत होतं.कमी पर्जन्यछायेतील मराठवाड्यात सुप्तपणे तें वादळ उठलं असावं.समतेच्या, बंधुत्वाच्या भक्कम शिकवणुकीतून, चळवळीतून,*राष्ट्रसेवादलातून* वंदनीय सानेगुरुजी, आदरणीय ना ग गोरे सर, आदरणीय एस एम जोशी सर, प्रा. ग प प्रधान सर, भाई वैद्य सर, आदरणीय डॉ.दादा गुजर सर, आदरणीय विठ्ठरावजी तुपे पाटील साहेब अशा महनियांच्या तालमीतं शिकून चळवळीतून,डफ, कलगी तुऱ्यातून, पथ नाट्यातून, समाज जागृतीतून हळूहळू बहुजनांच,अभिजनांचं साहित्य क्षेत्र पदाक्रांत करीत वेगाने पुण्यातल्या हडपसर भागात स्थिरांवलं असावं!पुण्यनगरीत आस्वादक होत बहुजनांच्या हृदयी विसावलं असावं.होय गेल्या नऊ वर्षांपासून पावसाळारंभी हे वादळ प्रचंड ताकदीने उठतं.मनावर राज्य करीत निघूनही जातं. दर वर्षांप्रमाणे या वर्षी  देखिली पुण्यातील गांजवेचौकातील एस एम जोशी रविवार दिनांक ०७ जून २०२६  रोजी *वैशाखी वादळवारा काव्य महोत्सव २०२६चां* वादळी अनुभव आम्ही घेतला.

                वादळाला शब्दवाऱ्याची साथ मिळाली होती.शब्दपवन उंच भरारी घेत होतं.खरं म्हणजे या *वैशाखी वादळाला नऊ वर्षांपूर्वी जन्म देणारे पिता,* त्याचे जन्मदाते, हर्पणमौला कवी,हास्य शीतलता प्रदान करणारे *चंद्रकांत जोगदंड सर* सरांचा एक महिन्यांपासून काव्य नियोजन झंजावत सुरु होता. स्वतः लहान होऊन इतरांना मोठेपण देणारें व्यक्तिमत्व लाखात पन्नास असतात.जोगदंड सर माणसं पेहरीत माणसांना, कवींना, लेखकांना माणुसकी अमृत पाजून संजीवनकडे निघाले आहेत.कवींना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत, येथोचित सन्मान करीत आहेत. कवी, लेखकांने अभिव्यक्ती जागरण करीत राहावे म्हणून सरांनी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले होतें.पुण्यातील गांजवे चौकातील निवारा केंद्राजवळ *एस एम जोशी सभागृहात* वैशाखी वादळ काव्य संमेलन आयोजित केलं होतं. महाराष्ट्रातील नामवंत कवीनीं आपल्या कविता सादर करून एस एम जोशी सभागृह वादळात तरंगत ठेवलं होतं.कवितेचे प्रत्येक जन्मदाते आपलं अपत्य घेऊन वादळ वाऱ्यात नेटाने उभे होतें.वातावरण हलकं-फुलकं होत राहिलं.संमेलनास अध्यक्ष म्हणून लाभले होतें प्रमुख महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक,  थोर विचारवंत, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचें अध्यक्ष *श्रीपाल सबनीस सर* होतें. प्रास्ताविक *चंद्रकांत जोगदंड* सरांनी समोर ठेवले अन दोन सत्रांचे सूत्रसंचालन करीत होतें प्रसिद्ध कवी *सीताराम नरके सर अन तरुण मित्र गजाननजी उफाडे सर.*

                *वैशाखी वादळ वारा* उत्तरोत्तर रंगातदार होत गेलं. प्रमुख पाहुणे अन कवी शेख मॅडम, संजयजी धन गव्हाळ सरांनी कवितेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.मिटकरी सर अन देशमुख सरांनी आपल्या प्रवाही विचारांनी सभागृहातील रसिकजनांचे कान तृप्त केले होतें. वादळ होतं. वारा होता.उन देखील होतं.अन मावळती संध्याकाळ देखील होती.वेळ, ऋतू बदलत असतांत.रात्र देखील डोळ्यासमोर आली होती अन वैशाखातील वादळी व्यक्तिमत्वानें कवी चंद्रकांत जोगदंड सरांनी मनाची, हृदयाची तृप्ती करीत असतांना आस्वाद,सुरुची भोजनाचें आयोजन करून पोटाची देखील भुक भागवली.सर्वसामान्य व्यक्तीमत्व आपल्या कलागुणांनी कवितेच्या ओढीने झपाटतो पुरस्कार देऊन गौरव, सन्मान करतो अशा कवी मित्राचे, *चंद्रकांत जोगदंड सरांनां शुभेच्छा देत असतांना मनःपूर्वक आभार देखील मानायला हवे!आपण वैशाखी वादळ वाऱ्याचं आयोजन करीत राहावे.असंच १०० संमेलनं घेऊन कीर्तिमान व्हावे याचं शुभेच्छा!💐🌹🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे ४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -१० जून २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol