कौटुंबिक मेळावा अन विध्यार्थी गुणगौरव

कौटुंबिक मेळावा अन विद्यार्थी गुणगौरव
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी

मेळावे अनेकांचे असतात!अनेक उद्दिष्टांसाठी भरवले जात असतात!सामाजिक,राजकीय, कामगार, सामाजिक संघटना, धार्मिक, अन जाती न्यातींचे मेळावे घेतले जात असतात!मेळाव्यातून नातं घट्ट होऊ लागतं!मेळाव्यातून मंथन होतं असतं!हिताचे निर्णय घेतले जात असतात!मेळाव्यातून माणसं जोडली जातात!संघटन मजबूत होऊ लागतं!अशाचं एका कौटुंबिक मेळाव्याविषयीं!....

             नोकरी व्यवसायामुळे मोठया प्रमाणावर स्थलांतर होत आहे!गावं-खेडी शुकशूकाट होत आहेत!पाऊस पाट दाखवून पळून जात असल्याने शेती करणं कठीण झालं आहे!शेतमजुरी देखील अवघड झाली आहे!लहान शहरं मोठया शहराकडे ओढली जाऊ लागली आहेत!महानगरं फुगत चालली आहेत!गावाकडचा लोंढा शहराकडे वळतो आहे!गाव खेड्यातील अनेक  बांधव पोटासाठी मोठया शहरात येऊन कष्ट करतांना दिसत आहेत!गाव शरीराने दूर झाली असली तरी मनाने झाली नाहीत!जन्म ठिकाणं कोण बरं विसरेल?सुट्टी काढून सणासुदीला,दिवाळीला काही दिवस गावाकडे राहून गावपण अनुभवायचं!सुखाचा,आनंदाचा क्षण उपभोगायचा!सण साजरा करायचा!सुट्टी संपल्यावर पून्हा पोटा पाण्याच्या रहाट गाडग्यात,महानगरात स्वतःला झोकून द्यायचं!राबणं सुरूचं असतं!जगणं सुरूचं असतं!🌹

          पोट भरणे ही प्राथमिक गरज असतें!मनाची गरज वेगळी असतें!तन अन मन दोन्ही समाधानी झाले पाहिजे!थोडाफार पैसा हातीआल्यावर महानगरात स्वतःच्या वास्तुचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते!रोटी,कपडा,मकानचा प्रश्न सुटल्यावर सामाजिक गोष्टींचीं जाणीव होऊ लागते!मुलं शाळेत शिकत असतात!कॉलेजला जाणे सुरू होतं!पुढे मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू होतात!

            गावाकडून शहरात आल्यावर पोट भरणं महत्वाचं असतं!कोणी ओळखीचं नसतं!नंतर एक एक गावाकडील व्यक्ती,नातेवाईक येऊ लागतात!शहरात येऊन राहू लागतात!ओळखी वाढतात!आपलं गावं सोडल्यावर आपला माणूस भेटल्यावर रक्ताचा माणूस भेटल्यासारखं वाटतं!एकमेकांना आधार देत घेत जगणं सुरू असतं!मुलं मोठी होतात!त्यांच्या लग्नाचा विषय निघतो!अलीकडे लग्न हा गंभीर विषय होऊन बसला आहे!मुलांचं बालपण शहरात गेल्यामुळे कदाचित आपल्या गावाला जाण्यास उत्सुक नसतात!गावाकडील नात्या गोत्यातील अनेक कुटुंब शहरांत राहायला आलेली असतात!त्यांच्याकडे जाणं येणं सुरू असतं!

         शहरांत आल्यावर नात्यातील, समाजातील,अनेक कुटुंबातील जिव्हाळा,प्रेम,भेटीगाठी होऊ लागतात!इतक्या लांब शहरात आल्यावर आपलाचं भाषिक, नात्यातील आपलेपणा,ओलावा शोधु लागतात!नातं जपू लागतात!एखाद्याचं घर एकमेकांना भेटण्याचं हक्काचं ठिकाणं होऊन जातं!एकत्र येऊन भेटल्याने कुटुंबाचं गेट टुगेदर होऊ लागतं!महानगरात अनेक कुटुंब विखूरलेली असतात!तरीही सर्वांशी संपर्क साधून त्या नात्यागोत्यातील, जातीतील एक मोठा समूह तयार होऊ लागतो!

          महानगरात एकत्र आलेले समाज बांधव,जन्मभूमी सोडून कर्मभूमीत संघटन करू पाहतात!संघटित होऊन आपल्या मूळ आराध्य दैवताची संतांची, देवदेवतांचीं, महापुरुषांचं पूजन करू लागतात!संतांच्या,महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त एकत्र येणं सुरू होतं!त्या माध्यमातून समाज  संघटित होऊ लागतो!कर्मभूमीत आपल्या संतांची मंदिर,महापुरुषांचे पुतळे उभारून जयंती,पुण्यतिथी साजरी होऊ लागते!त्यामुळे एकत्र येणं सुरू होतं!🌹

         दूर गावांहून आलेला हा संघटित समाज पुढे स्वतःचीं समाज मंदिरं, वास्तू बांधून सामाजिक उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवू लागतातं!सामाजिक बांधिलकीचें अनेक कार्यक्रम आयोजित होऊ लागतात!समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करून आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करीत राहणे, विशेष प्रवीण्य मिळविलेल्या समाज बांधवांचा उचित सन्मान होऊ लागतो!प्रत्येक समाजातील संत महापूरुषांनी सदाचाराचा मार्ग दाखविला आहे!अनिष्ठ रूढीचां त्याग करून चैतन्यमयी सन्मार्गावर चालण्याचा संदेश देत आले आहेत!त्यांनी दाखवलेला सदाचाराच्या मार्गांवर मार्गक्रमण सुरू असतं!त्यांच्या पवित्र पावलांची धूळ मस्तकी लावून प्रवास सुरू राहातो!त्यांचा आदर्श जपत पुढे जात राहणे!त्यांची प्रेरणा घेऊन कर्मभूमीत आपला लौकिक विकास साधत राहणे!समाजाचे ऋण फेडल्याचं यथोचित कार्य करीत राहणे!आत्मिक समाधान मानून जीवन सुखकर करीत जगणे!इतकं सुंदर जग जन्मभूमीतून कर्मभूमीत आल्यावर पाहायला मिळतं!गावाकडून शहरांत स्थलांतरीत झालेल्या अनेक जाती बांधवांचं कार्य स्फूर्तीदायक कार्य सुरूचं आहे!

                     महानगरात आपल्या गावाकडील पारंपरिक प्रथा,रूढी,सण साजरे करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अनेक जाती न्याती मंडळ आहेत!गावाकडे ओढ ठेवून येथील कर्मभूमीत एकजीव होत राहणे!आपल्या बांधवांच्या कल्यांणासाठी कार्य करीत राहणे!वधु-वर परिचय मेळावा आयोजित करणे!त्यातून आपल्या पाल्यांना योग्य स्थळं शोधणे!वधु-वर पुस्तिकेच्या माध्यमातून विवाह जुळण्यास मदत होत असते!समाजहिताच्या कार्यातून कुटुंब अन समाज एकजीनशी होत असतो!निरोगी वातावरण राहण्यासाठी कार्यास समर्पित करणारी अनेक जाती न्याती मंडळं महानगराच्या चळवळीचा आधारअन हिस्सा झालेली आहेत!....🌹

        पिंपरी-चिंचवड,पुणे परिसरात महाराष्ट्रातून आलेले अनेक जाती न्याती मंडळं कार्यरत आहेत!त्यातील एक आहे,'खान्देश माळी मंडळं आहे!'खान्देशातून...अर्थात धुळे,जळगाव, नंदुरबार अन नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील माळी समाज पिंपरी-चिंचवड, पुणे परीसर अन पुणे जिल्ह्यात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे!सन १९९९ साली,२५ वर्षांपूर्वी 'खान्देश माळी मंडळाचीं' स्थापना झाली होती!समाजातील कृतिशील कार्यकर्त्यांनी समाजाची गरज ओळखून 'खान्देश माळी मंडळचीं ' स्थापना केली होती!

      खान्देश माळी मंडळाचं.....        गेल्या वर्षी २५वें रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा झालं!समाजातील धडपडे तरुण एकत्र येऊन अतिविशाल कार्य करू शकतात हा आदर्श नव्या पिढी समोर ठेवला आहे!दर वर्षी कौटुंबिक मेळावा अन विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो!संतश्रेष्ठ, संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या कर्म सिद्धांतावर वाटचाल करीत पुढे जाणे!समाजातील महापुरुष क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी दाखवून दिलेल्या आदर्श मार्गांवर वाटचाल करीत राहणे!दरवर्षी माळी समाजाचा राज्यव्यापी वधुवर मेळावा आयोजित करणे,आपल्याच पाल्यांचा, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करणे... आदी उपक्रम कार्यकर्त्यांना ऊर्जा देत असतात!खान्देश माळी मंडळाने आळंदीजवळ वास्तू उभारणीसाठी ११गुंठे जागा घेतलेली आहे!हा आनंदानुभव ऊर्जा देणारा आहे!!खान्देशातून आलेला समाजबांधव पुण्यासारख्या शहरांत एकत्र येऊन एकमेकांना भेटतात!आपलें भाषिक, जातीय, नातेगोते एकत्र येऊन भेटतात!वेगळाच आनंद मिळतो!समाधान मिळतं!आपसातील परकेपाणाचीं भावना विसर्जित होऊ लागते!यातून नाते,समाज घट्ट वीणला जात असतो!आपण आपलं गाव सोडून आलो!खान्देश सोडून शहरात आलो!महानगरातील कौटुंबिक मेळाव्यातून एकत्र भेटल्याचा आनंद द्विगुणित होत असतो!🌹

            या वर्षी उद्या रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातल्या धायरेश्वर मंदिराजवळ,सिंहगड रोडला खान्देश माळी मंडळाचा'कौटुंबिक मेळावा अन विद्यार्थी गुणगौरव समारंभ'आयोजित केलेला आहे!माळी समाज खान्देशातून येऊन येथील मातीत एकजीव होत आहे!तरी जन्मभूमीचं वैभव जपतो आहे!आपल्या परंपरा जपतो आहे!विद्यार्थी गुणगौरवातून नव्या पिढीस ऊर्जेची मशाल हाती देत आहोत!खान्देशातून पुण्यात आलेला माळी समाज एकत्रित होत आहे!नाती गोती घट्ट होत आहेत!मोठं समाधान अन आनंदही होत आहे!सर्व समाज बांधवाना कौटुंबिक मेळाव्यास अनंत हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ ऑगस्ट२०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol