साहित्यिक सद्गुरू दर्शन
*साहित्यिक सद्गुरू दर्शन*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री.रमेश आप्पासाहेब बोरसे सर
***************************
... नानाभाऊ माळी
सध्या जग अनेक गुरूंच्या पाठीमागे लागलं आहे. त्यातील सद्गुरू किती?असा अवघड प्रश्न पडत असतो.सदगरू सदाचरणाचा मार्ग धरायला लावतात.समाजालां सतसंगतीचां मंत्र देत असतात.गुरु आपल्या शुद्धाचरणातून दुःखीतांच दुःख हलके होण्यासाठी धडपडत असतांत.मलाही साहित्यिक गुरु लाभलेत!गुरुवारी, दत्तगुरुंच्या वारी आदरणीय रमेश आप्पा बोरसे सर आपल्या घरी आले होते.त्यांच्याविषयीं काही अंतरीचे बोल..... 💐
जगातील सर्व *गुरु* ज्ञानजिज्ञासूंचें पोशिंदे असतात.ज्ञानाकलनाची उत्सुकता ज्यांना असते त्यांचे पाय आपोआप गुरूंकडे ओढ घेत असतात.आपल्या मनात घर करून बसलेल्या अज्ञानाची उकल गुरूंच्या अमोघ कृपेनें होत असते.ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जात असतं. सदगुरूंकडून मिळालेलं अनमोल जगदंकल्याण ज्ञान *संचित* करून ठेवल्यास शिदोरी रूपात आयुष्यभर थोडंथोडं सोबतीला ज्ञानउजेड देत राहतं. कुठल्याही जनसामान्य व्यक्तींनी देव कधी पाहिला आहे का हो?देवाचा स्पर्श कुणाला झाला आहे का?ते कार्य सद्गुरू करीत असतात. सद्गुरू देवाची सर्वोच्च पायरी असते.सद्गुरू देवरुप घेऊन मार्ग दाखवीत असतात.आपणास नवीन डोळे देणारे गुरु सतत आपल्या पाठीशी उभे असतात.गुरु वेळोवेळी शिष्याच्यां नजरेत देवास्तित्वाची ओळख करून देत असतात.त्यांचं महदाविष्कारीं देवकार्य आपल्या हृदयाला भावंतं.तेच देवदर्शनाचे मध्यस्थ असतात.सद्गुरू आपल्या कठीण वाटेवरचां वाटाडया असतात. वेळोवेळी मार्गदर्शकाची भूमिका बजावीत असतात.ज्ञानभांडार होऊन सतत आपल्या शिष्यानां अमृतकुपी वाटीत राहतात.गुरु हें ज्ञानसूर्य असतात.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अध्यात्मिक जगद्गुरूपद मिळवलं होतं.माऊली ज्ञानदेव महाराजांनी कठीण अन अवघड ज्ञान, सहज सोपे करून दाखविले होते.भक्तीचा साधा सरळ,धोपट मार्ग दाखविला होता.श्रीहरी विठ्ठलाच्या हृदयांतरी जाऊन बसण्याची प्रचंड अध्यात्मिक शक्ती माऊलींनां प्राप्त होती. म्हणून ते अध्यात्मिक आई स्वरूप माऊली होते.देवरूप होते. देवास्तित्व होते.देव स्वतःचा प्रतिनिधी म्हणून सतगुरूंना सत्कर्मासाठी पाठवित असतांत.माऊलींनीं सत्कृतीतून जगाच कल्याण व्हावे अशी देवाजवळ मागणी केली होती.
प्रत्येक क्षेत्राप्रमाणे सद्गुरूंचं मार्गदर्शन लाभत असतं. राजकीय, सामाजिक, व्यावहारिक,चालता बोलता प्रत्येक प्रसंगी अनुभवसंपन्न गुरूंचं मार्गदर्शन लाभल्यावर आपलं जीवन आनंदी, समाधानी, धन्य होऊन जातं.मलाही अनेक क्षेत्रातील सद्गुरूंनी नजर दिली आहे.डोळस केलं.मी तसा व्यवहार शून्य माणूस आहे!आई वडिलांच्या पुण्याईने सतमार्गांवर चालण्याचां उत्तम संस्कारीं मार्ग सापडला.कधी परिस्थिती सुद्धा सतमार्गावर चालण्यास भाग पाडीत असते. *आपण प्रत्येक व्यक्तीत गुरुरूप पाहात गेल्यावर पावलोपावली सदाचारण घडू लागतं.गुरु वयाने लहान असो वा मोठा,समवयस्क असो,त्यांचं सत्कार्य देवरुप दाखवू लागतं.सतमार्ग दाखविणारे गुरु सतत पूजनीय असतात. देव्हाऱ्यातल्या देवागत हृदयातून जपून ठेवावेसे वाटतात.त्यांच्या सानिध्याने मन हलकं होत जातं. दुःख हलके होऊ लागतं. मग कधी आनंदाश्रूच्यां धारा डोळ्यातून वाहू लागतात.डोळे चिंब भिजून थेंबथेंब उष्णाश्रू गाळू लागतात.कधी मन सद्गदित होऊ लागतं,हलकं होऊ लागतं.माझ्यातील गर्व आपोआप कमी होऊ लागतो. स्वार्थ दूरवर लोटण्यास मनाला बजावलं जातं.ही किमया सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामुळेचं घडत असते.आई -वडील, गुरु संगतीने कच्च मडके पक्के होऊ लागतं.आपलं जीवन आयुष्यभर ज्ञानभट्टीवर भाजायला ठेवलं आहे.दररोज शिकायला मिळत असतं.मी सुद्धा उगवत्या सूर्यदेव साक्षीने आयुष्यभर शिष्य,विध्यार्थी राहून ज्ञानकण वेचीत राहावे अशी प्रार्थना करीत असतो.शुद्ध चारित्र्य देह ठेवीपर्यंत राहावे अशी प्रार्थना करीत भेटलेल्या अनेक क्षेत्रातील गुरूंना हृदयातल्या खोल कप्प्यात जपून ठेवावेसे वाटतात.
गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी धुळ्यातील माझ्या साहित्यिक गुरूंचे पाय आमच्या घराला लागले होते. योगायोग म्हणजे महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा *सौ. स्मिताताई रविंद्र वाघ* या आल्या होत्या.आपण मागतो एक देतो दोन असं झालं होतं.आदरणीय बोरसे सरांचं वय ७८ वर्षांचं असून या वयातही शिष्यानां हेवा वाटेल असं कार्य करीत राहतात. त्यांच्या पायांच्यां धुळीने जणू आमचं घर पवित्र झालं होतं.वार गुरुवार होता.गुरुदत्तांचा चंदनीस्पर्श वार होता.भाग्य असं की माझे साहित्यिक गुरुवर्य आदरणीय *श्री रमेशआप्पा बोरसे सरांचं* आपल्या घरी आगमन झालं होतं. प्रत्येक शिष्याला वाटत असतं आपल्या गुरूंना 'कुठे ठेऊ नं कुठे बसवू!' माझही तेचं झालं होतं जणू!आमच्या कुटीत आलेल्या गुरुवर्यांना कुठे बसवू नं कुठे नाही!' असं झालं होतं.
सन २०१३ साली माझा अहिराणी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित झाला होता.*लाह्या* त्याचं नाव होतं.त्यावेळी आदरणीय सुभाष नानासाहेब आहिरे सरांसोबत आदरणीय बोरसे सरांनी प्रचंड मेहनत घेतली होती.मला लेखनास प्रोत्साहित केले होते,मार्गदर्शन केलं होतं.अशा अनेक गुरुवर्यांपैकी श्री.रमेश आप्पा बोरसे सर एक होते.तत्पूर्वी काही वर्षे आधी त्यांचं गावकरी वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवणीतील *आप्पाण्या गप्पा* हें सदर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. लिहिण्याची उत्तम हातोटी अन विचार मांडण्याची दृढता त्यांच्यात उपजत असावी.माध्यमिक शाळेतील शिक्षकी नोकरी सांभाळत अनंत विध्यार्थी घडवणारे आदरणीय आप्पासाहेबांचं साहित्य क्षेत्रातील योगदान दिपस्तंभासारखे आहे. अशा या महान साहित्यिक गुरूंचे पाय आमच्या पुण्यातील हडपसरच्या घरी लाभले हें मी भाग्यशाली समजत होतो.सरांच्या आगमनाने अतिशय आनंद झाला होता.तो वर्णन करता येणार नाही एवढा झाला होता.आदरणीय आप्पासाहेब सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले होते.ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती.सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. पण राहणं अतिशय साधं सरळ!शांत संयमी वृत्ती!सर्वांना सतत मार्गदर्शन करीत राहण्याची बांधिलकी असल्यामुळे माणसं जोडण्याची किमया स्वभावातच असावी. अशा व्यक्तिमत्वाच्या पायांवर डोकं ठेवण्याचं भाग्य लाभलं होतं. अशा साहित्यिक गुरूंना शत शत नमन करतो. त्यांच्या ऋणात राहून आशीर्वाद घेतो.
🌹🌹🌹💐💐🌹🌹🌹
**************************
..नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२३ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment