चला जाऊया गड -किल्ल्यांवर (वसई, अर्नाळा किल्ला जि पालघर )
*चला जाऊया गड-किल्ल्यांवर*
(वसई,अर्नाळा किल्ले,जि.पालघर)
(भाग-०१)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
एका दिवसात दोन किल्ल्यांवर चढाई?तेही मुबंई पार करून पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात? पुण्याहून २१० किलोमीटर लांब जाऊन पुन्हा २१० किलोमीटर परत येणे!घामात चिंबचिंब भिजणे!समुद्रातील खारट पाण्यासहित जिकडे तिकडे फक्त माशांचाचं वास नाकांच्या दोन छिद्र्यातून आत धडकणे!समुद्रात बोटीतून चढ-उतर करतांना होणारी दमच्छाक,परीक्षा!गुडघाभर पाण्यात पुढे जाऊन बोट पकडून,गर्दीत जागा पकडणे!हा नकोसा तरीही हवाहवासा वाटणारां साहसी प्रवास!हृदयाला भावला हो!
समोर अथांग समुद्र पहुडलेला!जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय!किनाऱ्यावर कोळी बांधवानी आडव्या उभ्या लाकडी दांड्यांवर वाळायला ठेवलेली मासळी, सुकट, बोंबील!माशांचे भिन्न प्रकार,त्यांचां नाकाला येणारा भिन्न उग्र वास!अशी साहसी दर्यावर्दी सफर स्वप्नात तरी पाहाता येईल का?प्रत्यक्षात अनुभवनं थोर भाग्य असतं. खरंच दूरवर अथांग समुद्राकडे पाहात रहावस वाटतं असतं.जिकडे तिकडे समुद्रात दिसणाऱ्या मोटर बोटी. किनाऱ्यावर देखील प्रचंड वर्दळ.उन्हाळ्यातील चटका न देणारं उन पण घामाचा ओघळ काढणारा प्रवास म्हणजे खुल जां सिम सिम अशी न्यारी, वेगळी अनुभूती देऊन गेली.
समुद्रावर तरंगणाऱ्या अनंत मच्छिमारीं बोटी!इतर प्रवासी बोटी!सभोवती समुद्राच्या आत, बेटावर असणारा प्राचीन किल्ला!त्याची भक्कम तटबंधी, बुरुज!कित्येक शतकं नैसर्गिक संकट झेलणारा हा निधड्या छातीचा जलदुर्ग!आम्ही साहसी ट्रेकर, पर्यटक जलदुर्गावर स्वार झालो होतो.आमच्यातील उत्साह जागवीत होते तें आमच्या टिमचे कमांडर आदरणीय वसंतराव बागूल सर!आमचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता!जलदुर्ग पाहणे म्हणजे नवीनच अनुभव होता आमच्यासाठी.आम्ही रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी वसई अन अर्नाळा अशा दोन वेगवेगळ्या किल्ल्यांवर सफारीला गेलो होतो. भले तें किल्ले जलदुर्ग प्रकारात मोडत असले तरीही ट्रेकिंगचा अनुभवसिद्ध आनंद तसूभरही कमी झाला नव्हता.
किल्ला चढाई ही, एक पर्यटक लढाई असते.याला काय म्हणावे बरं? आपला जन्म सिद्ध होण्यासाठी अनुभवांचं भांडार होणे जरुरी असतं.किल्ला सफर आत्मिक सहनशक्तीचा विजय असतो. आपल्या कार्यशाक्तीची कसोटी असते. मार्गदर्शकाची अनुभवसिद्ध शक्तीप्रेरणा असतें. होय आम्ही 'चला जाऊया गड-किल्ल्यांवर' या ग्रुपतर्फे वसईचा अन अर्नाळा किल्ल्यांवर गेलो होतो.
किल्ला डोळ्यासमोर येताचं रक्त सळसळ करू लागतं.मंनगटी ताकद वाढू लागते.देश प्रेमाची हाक कानी पडू लागते.ढोल,नगारा, तुतारीचां प्रचंड आवाज कानी पडु लागतो!आसमंतांत कांनठंळी बसवणारा तोफांचा आवाज घुमू लागतो!शत्रूवर चाल करून, तोफ-तलवारी घेऊन त्यांच्यावर तुटून पडावंसं वाटतं. मनचक्षुतून स्फूर्ती,शक्ती नंग्या तलवारींचां सफासप वार दिसू लागतो.मनगटी बाहुबली उतरू लागतो!मरणाची तमा न बाळगणारा सह्याद्रीचां मावळा स्वराज्यासाठी त्वेशाने लढू लागतो.विशाल बुरुज दिसू लागतो.हळूहळू किल्ल्याची तटबंधी ढासळू लागते.पडघम वाजू लागतांत.किल्ला जिंकणे नाहीतर मरणे हेचं दिसू लागतं.आपल्या स्वराज्यांची स्वप्न साकार होऊ लागतात. स्वतःच्या पौलादी छातीवर वार झेलणारा मराठा मावळा शत्रूवर तुटून पडतो!शत्रूला सळो की पळो करून सोडणारां चवताळलेला सिंह दिसू लागतो. होय आम्हाला शूर लढवंय्या मराठा मुलखाचा सेनापती चिमाजी आप्पा दिसू लागतात. आसमंत दुमदुमून टाकणारां बुलंद गर्जना कानी पडू लागतात.होय समुद्राच्या दलदल काठावरती प्राचीन काळी बांधलेला अभ्यद्य *वसईचां किल्ला* दिसू लागतो.अर्नाळा गावासमोर समुद्रबेटात भक्कम तटबंदीचा जलदुर्ग *अर्नाळा किल्ला* दिसू लागतो.....
वसई अन अर्नाळा असे दोन्ही किल्ले पाहातांना काही मौलिक ऐतिहासिक घटना नजरपानातून सुटले नाहीत......हें किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होती असा इतिहास सांगतो.पोर्तुगीजांशी झालेल्या तुंबळ युद्धात पोर्तुगीजांकडून किल्ले जिंकून घेतला होता.मराठ्यांकडून आक्रमक धोरण वापरले गेले होते. पोर्तुगीज्यांच्या आधुनिक तोफानां न डगमगता मराठे चिवट झुंज देत राहिले,लढत राहिले.दोन तें तीन वर्ष किल्ल्याबाहेरून शत्रूवर हल्ला करीत राहिले.निकराचां लढा सुरु होता.अंतिमत: मराठ्यांचा प्रचंड विजय झाला होता.
इतिहासाची पानं लिहिली जात असतात. किल्ल्याचा आत्मा त्यातून प्रकट होत असतो.राज्यकर्ते इतिहासासोबत देह ठेवून निघून गेलेली असतात.प्राचीन भग्न अवशेष राज्यकर्त्यांचं कर्तृत्व बयानबाजी करीत असतात.तें जणू जीवंत होऊ पाहतात.मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेले वसई अन अर्नाळा किल्ला अजूनही आपल्या भग्न अवशेष घेऊन उभी आहेत.पर्यटक,ट्रेकर, इतिहासकरांना आपल्या अस्तित्वाची माहिती पुरवीत असतात.त्यांच्या काळजाला स्पर्श करायला सांगीत असतात.
(विशेष इतिहास भाग-०२मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
*****************************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-९९२३०७६५००
दिनांक-१९ मे २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment