आई देवाची लेक

आई देवाची लेक
🌷🌷🌷🌷🌷
***************
.... नानाभाऊ माळी 

*मातृ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*

माय देवाचीही लेक
फिरे संसाराचं चाक
होई लेकुरवाळा देव
आई संसाराच नाक!🌷

देव उगे युगे उभा
घेई ममतेचा ठाव 
होई विटेलाहीं भार
देव वसवितो गावं..!🌷

माय ममतेची वात 
आत उजळतो देव
माय जळणारी ज्योत
होई गाभाऱ्याचं नाव!🌷

आई देवाची सावली
त्याचं चालवीते नाव
कधी होई धावाधावं
लागे संसाराची हाव!🌷

आई अनमोल हिरा 
कोण करील रें भाव 
नाही भेटला तराजू
...आई तरंगती नाव


आई विसावा ठिकाण
माथा टेकन्याची जागा
तूझ्या कुशीच्या उबेत
माय वाहते चंद्रभागा.!🌹

आई होतेस जागल्या
......रात्रंदिन तू जागते
   सु-शी भरते दररोज
......देवरुपी तू वागते..!🌹

आई खोल खोल बोल
आयुष्य बाळाचं मागते
.....श्वास देतेस अर्पुनी
आई कुणासाठी जगते?🌹
********************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं- ९९२३०७६५००
दिनांक-१० मे २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol