गुलमोहरा तू जाग जरा

गुलमोहरा तू जाग जरा
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी

चटक्यासही गळा भेटतो
वरुनी म्हणतो आहें बरा
उन्हातही हसतो मित्रा
 अरें सहनशील तू खरा..!🌹

सुष्कतेचे राज्य चौफेर 
सूर्य ओकतो आग तऱ्हा 
निष्पर्णावर लाली हसते
गुलमोहरा तू जाग जरा...!🌹 

वैशाखाचां वणवा तप्त
वेड्या हसूनी देतो खरा
मूळ्या रोवूनि उभा एकटा
तूझे सांग मित्रा राज जरा!🌹 

केशरी लालबुंद फुलतो 
तू सांभाळूनी घेतो धुरा 
टिच्चूनी सामोरा रें जातो 
हसुनी देते तप्त धरा!🌹 

हसरें दान तुझे दे आता 
उघड्या पाकळ्यातील तुरा
लालकेशरी उघड पिसारा
 भरुनि गुलमोहरीं झरा!🌹
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ मे २०२५
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol