उनन्हा चटका झेली लगीनलें जावो

*उनन्हा चटका झेली लगीन लें जायी दखो!*
  💐💐💐🌹🌹💐💐💐
*****************************
...नानाभाऊ माळी
        
      दुपारनांभरे तावांमायेक भुंज्या उनन्ही लुं चाली ऱ्हायनी.सुनसुनाट डांबरी सगरवर कान, नाक, तोंड भुंजायी ऱ्हायनातं!४४ डिग्री तपमानम्हा चटकाड्या सूर्यदेव आग वती ऱ्हायंनां. लोके तोंड, नाक, डोकालें गमचां गुंढायीं जोर जोरम्हा दोन चाकी हेंडाली ऱ्हायनात.घामवरी आंग धवानीं येय येल से.लब्बरन्हा टायर भुंजायीं, चुर्मायी-चार्मयी सोताले चटकाये दुःख ल्ही,गाड्या हेंडांलंनारस्ना आज्ञान्ह पालन करी ऱ्हायनात.तीन चाकी पयी ऱ्हायन्यात.कान, तोंडमां हुन्हडाव वार्ग घुसी ऱ्हायनं पन लगीन यावं टायता यीं का?लोके तोंडहाजेरी लायी ऱ्हायनात!दोन चाकीवाला डोकालें गमचा बांधी गाड्या हेंडाली ऱ्हायनात.गाड्या रवसडी-रवसडी रस्ता आवरी ऱ्हायन्यात.मानोस्लें कोन आवरी बरं? आते मानोस दिय्यावर ऱ्हायना नही बरं!चार चाकी गाड्या उनन्हा भरे टायरनां चर्रर्र-चर्रर्र आवाज करी गियर टाकी टाकी,हॉर्न वाजी पयी ऱ्हायंन्यात.या उंडायांम्हा मानोसन्हा जीव हुना,लाल इस्तोलें बांधेल से.आते मानोस झिरोयानंमायेक व्हयी जायेल से. कोंता भी तपमानम्हा देवनी देयेलं शरीरल्हे कुमचांडी ऱ्हायना!सहीन करांनी आदत टाकी ऱ्हायना.पानी पी पी जित्ता ऱ्हावानां भरोसा, धीवसा दी ऱ्हायना.पानी पी पी डेडोरनां मायेक फुगी ऱ्हायना.तपमाननां घाम डेडोरनं पोट चिप्पट करी ऱ्हायना. आवन्नां साललें हुनानी धुनी जास्तीचं मज्या ली ऱ्हायनी.लगीन यांवम्हा जेवणे कमी, पानी जास्ती व्हडी ऱ्हायनात.मठ्ठा पी ऱ्हायनात.पानी इकनारस्ना धंदा भलता तेजीम्हा से.थंडगार पानीं पीस्नी तीस भागत नही.फिरी फिरी नल्ल कोल्ल व्हयीं मुसडाम्हा पानी वती ऱ्हायनात.यां बठ्ठया बिपता सेतीस नातं गोतं समायान्ह्या.उन येडांगे ऱ्हास.मानोस येडांग्या से.हायी दुन्या येडांगी कोना तालवर नाची ऱ्हायनी व्हयी बरं?

                    हुनांडाव उनलें इच्चूनं मायेक आंगवर ल्ही बिपता व्हडी लेनारा आपुन मानसे सेतस.दूर दूर पावूत नजर टाको तटपावूतं  धरतीमाय भुंजायी ऱ्हायनी. रोडवरनां,वावरनां बांधवरनां निम,चिचा,बाबुईन्हा झाडेस्वर हाड्या चिड्या,व्हलगा सावली दखी बठेल दिखतंस,एक दुसरासंगे कावं-चिंवन्या गप सप मारी ऱ्हायंनांत.तथा कोना नांगरटी व्हयेलं वावरे भुंजायी ऱ्हायंनांत.गहू नींघी ग्यात.मक्की,दादरी काढानं चालू से.कोना वावरेस्मझारं पपयीं हुभी दिखी ऱ्हायनी.उंडांयी बाजरी, भुईमुंग हुभा दिखी ऱ्हायनात.आथा उनल्हे सुमारा नही से. तथा गाड्या घोड्यास्लें सुमारा नही से,दोन्ही पयी ऱ्हायनात.यांय बुडापावूतं हुंनडावं धपस-धूपसलें तोंड देत पयी 
ऱ्हायनात.मानसेस्लें ढंग नही.यांय ढंग नही.दोन्ही एक दुसराले पर्जानी ऱ्हायनातं. हावू एक दुसरास्लें पर्जानांन्हा खेय कव पावूत चाली पन?मानोस उनम्हा सुकायी आवठायेल डांगरन्हामायेक व्हयी जास.घामाघूम व्हयी दिन मावयांनी वाट दखत बठस.आम्ही भी पुनातून शिनखेडांलें (पाटण)येल व्हतुत.श्री आशापुरी मातांजोगे मंगल कार्यालयम्हा काल्दीन आयतवारन्हा दिन २६ एप्रिलल्हे घटिक मुहूर्तावर लगीन व्हतं.आमन्हा मित्रान्हा पोरन्ह लगीन व्हतं.श्री. रमेशदादा सोनवणे यांस्ना पोरनं लगीन व्हतं.लगीन भलतं दनकेबाज व्हयनं.दुपारन्हाभरे लगीन व्हतं. वऱ्हाडी लांब लांबथून येल व्हतात. कार्यालयम्हा गर्दी म्हायी नही ऱ्हायंती.

         ४४ डिग्री तपमान व्हतं. इतला तपमानम्हाभी लोके लगीन लावालें येल व्हतात.तशी पोरनां बापनी पहिरेलं ऱ्हास तव्हयं इतली दुन्यानं भाहीर गर्दी नवरदेव-नवरीना डोकावर अक्षदा टाकाले, आशीर्वाद देवाले येल ऱ्हातंस.पोरना बाप पहिरत ग्या!पहिरत ग्या!पहिरेल २६ एप्रिलन्हा इस्तोभुंज्या उनम्हा भी उगेल व्हतं.लगीन दनकेबाज व्हयन.मी भी पोरना डोकावर अक्षदा टाकी आशीर्वाद देवालें जायेल व्हतु. २६ एप्रिललें भलती मोठी तिथ व्हती, मुहूर्त व्हतं. माले चार ठिकानन्ह नियुतं व्हतं.पाचोरा, पाटण, बोरकुंड, रामबोरीस. जमी का बठ्ठा ठिकाने जावान?कस शक्य व्हयी? डोकानीं बत्ती चमकनी व्हती, तीन ठिकाने हायेद आनी एक ठिकाने लगीनलें जावो!४४ डिग्री तपमान!!खान्देश भुंजायी ऱ्हायना!कस करो बवा!!शिरपूरथून सासरानी हिरोहोंडा गाडी काढी, एकला जीव सधा शिव व्हयी गाडीले किक मारी,दुपारन्ह ताता बयेतान्ह उन व्हतं.डोकालें गमचा भांदेलं व्हतं.गाडी पये तशी हुनी वार्गी डोयाम्हा घुसी ऱ्हायंती.दणका खायी खायी हिरोहोंडा पयी ऱ्हायंती. शिरपूर, शिंदखेडा,चिमठाने, आमराये मार्गे तामथर वलांडी मव्हरे राम बोरीस्लें भिडनू तव्हयं दिनमाव्यानीं येयलें पाच वाजी ऱ्हायंतात.हुनी हुनी लूं संगे-मांगे व्हती लागेल व्हती.गंजज ठिकाने रस्ता उचडी जायेल व्हता,खड्डा पडेल व्हतात.त्या टायत,आंगे पांगेनां गावे दखत, एकादावन्हा रामबोरीस्लें भिडनू.

             साखरपुडानीं तयारी चालू व्हती. नवरदेव-नवरी, दोन्हीस्ना माय-बाप सवरी-सुवरी टेजवर यीं बठेल व्हतात.बामन सांगी तश्या विधीस्मझार गुंग व्हतात. नाता-गोतानां लोके साक्षी व्हतात. साखरपुडा व्हवावर हायेद लागनी. जेवणे खावणे उरकी डीजेवर नाचानी धूम सुरु व्हती.रातना पवणे दहा वाजता नवरदेवन्हा काकालें सांगी धुयालें जावाले नींघनू.आंतर व्हतं आंगे पांगे ४०किलोमीटरन्ह. रातनां सुन्नाट रस्तावर मी एकला हिरोहुंडा गाडी चालांयी ऱ्हायंतू. जीव मुट्ठीम्हा धरी रातले साडे आकरा वाजता धुळाले याहींगंम भिडनू. दुसरा दिन शिंनंखड-पाटनलें लगीन व्हतं. सक्कायम्हा आंगतोंड धोयी गाडील्हे किक मारी व्हतु. मुंबई आग्रा हायवर सक्कायंनीं थंडीम्हा गाडी भिन्नाट पयी ऱ्हायंती. मी हवाम्हा व्हतु.मूठ फिरायी गाडीना टायर ढागें ढागं पयी ऱ्हायंतात. मव्हरे गोराना फाटा फायीन डावा आंगे गाडीनं हॅण्डल मयड.शिंनंखडं रस्ताले हिरोहुंडा पयी ऱ्हायंती.सक्कायनां नऊ वाजाल्हेच सूर्यदेव डोया तानी दखी ऱ्हायंता. मव्हरे *व्हय* गावले न्हायीदादाकडे दाडी उरकी ठस्सायवार मव्हरे नींघनू. 

       शिंनंखडालें पयभारा मयाम्हा गवू.धाकल्पनीं याद यीं गय थी. मी वावरगंम दखत ऱ्हायनू. थोडीसी माटी उखली कपायलें लायी.एकलाचं हेरनां आंगे, निमना झाडंनीं सावलीम्हा हुभा व्हतु.धाकल्पनां सोनाना दिन डोयानंमव्हरे यीं ऱ्हायंतात.हेर ढूकी दखी.तयल्हे पानी जायेल व्हतं. त्या सोनानां दिन मव्हरे  येवावूत नहीत.आपुनभी ऱ्हावावूतं नहीत.वल्ला डोयास्नासंगे धीरे धीरे पाय गाडीगंम व्हडायी ऱ्हायंतात. साडे आकरा व्हयी ऱ्हायंतात. तास-मिंटावर लगीनन्ही येय जोगे जोगे यीं ऱ्हायंती.उन धर्तीले भुंजी ऱ्हायंत, मानसेस्लें भुंजी ऱ्हायंत.मी बुराई नदीनां पूल वलांडी शिंनखडालें गयतू.उनन्हा कडाकाम्हा घरे दारे बंद दिखी ऱ्हायंतात.नवीन कपडा बदली भर उनम्हा पाटनलें लगीनलें नींघनू. रस्ता सुनसान दिखी ऱ्हायंता. आशापुरी माता मंदिरनां जोगे दुरतून लगीननां वाजा वाजत दिखी ऱ्हायंता. ४४ डिग्री तपमानम्हा घामाघूम व्हयी वऱ्हाडी नाची ऱ्हायंतात.नवरदेव रथवर बठेल व्हता.बट्ठी धामधूम, वरात वाजत गाजत कार्यालयगंम जायी ऱ्हायंती. मी सावली दखी गाडी स्टॅंडलें लायी आनीं कार्यालयम्हा घुसनू. पवणे दोन व्हयी ऱ्हायंतात.बामन दादा मंगलाष्टक बोली ऱ्हायंता. जोरजोरम्हा बँडवाजा वाजना तसा नवरदेव-नवरीना बापनां चेहरावर *बाप* दिखी ऱ्हायंता.कर्तव्य पालनना आनंद दिखी ऱ्हायंता.मी भी नींघनू. काल्दीस्ना आयतार लगीनन्हा आनंद दी नींघी ग्या. जराखा उनन्हा चटका दी नींघी ग्या!
जगानां आल्लग निरोप दि नींघी ग्या.
💐💐💐🌹🌹💐💐💐
**************************
... नानाभाऊ माळी 
मु. पो. ता. शिंदखेडा जि. धुळे 
(हल्ली मुक्काम हडपसर, पुणे)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२७ एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments