आज आखाजी से

आज आखाजी से!आगारीना सण से!साडेतीन मुहूर्तम्हाना एक सण से!दुपार व्हयीं गयी!आगारी टाकायी गयी व्हयी.खान्देशना बठ्ठा 
भाऊभन,सगासाई, रितिभाती जपनारा जेठा मोठास्लें आखाजीन्या हिरद म्हायीन पल्ल भरी भरी शुभेच्छा सेतीस!💐

आंडरी-पोरी सासरथून जशी सवूड भेटनी तश्या सप्तमीलें, आष्टमीलें, नवमीलें, चावदसलें माहेरले यीं लागेल सेतीस. काल्दीनफाइन धव्या घोडावर बठी शंकर यीं बठेल से.त्याले सांजऱ्या शिय्या खावड्यात. बठ्ठया गवराया माहेरले यीं धाकल्पन्या आपल्या सई बहिनीस्लें भेटाम्हा मशगुल सेतीस. त्या माहेरना वट्टास्लें पाय लायेलं घरे पुंजी 
ऱ्हायन्यात. गल्ल्यास्मझारं भवडी ऱ्हायन्यात.मंनमंन उन चटकी ऱ्हायनं.पाय,डोकं,आंग,जिमीनलें चटकाडी ऱ्हायन.घरमा तें पुरणपोयी, कुल्लाया, भज्या, रशी,पापडेस्ना मगमगात वास यीं ऱ्हायना. गंजज येटोयास्मझार या वरीसले कोनी तरी धल्ला-पल्ला, धयडी-धायडी देवंघरे सर्गे चालना जायेल सेतंस.त्यास्ना घरे-दारे डेरगं भरानी गर्दी उतरेल दिखी ऱ्हायनी.भाऊभन डेरगाम्हा पानी टाकी मोक्या व्हयी ग्यात. सोर्गाम्हा जायेल बठ्ठास्ना आत्माल्हे तयेल तुयेलंनं निव्वद दखाडी आगारीम्हा तूप,रशी,पुरी, आंबानां रस!आखाजीफाइन आंबानां जेवणे चालू व्हतसं.सोर्गाम्हा बठेल वाड वडीलस्लें उलुसं घास निव्वद दखाडी  दोन तीन घास काढात.चेटेल उब्यांनी धुनीम्हा टाकं. वरतीन तुपनी व्हाडी फिरायीं. तुपना मगमगात वासम्हा
सर्गे जायेल वाड वडील गरायी ग्यात व्हतीन.

 आली गलीम्हा उच्चा तडांग निम, पिप्पय, वडना झाडे हुभा दिखी ऱ्हायनात.त्या एक दोन पिढीस्ना साक्षीदार व्हतीनचं.त्यास्ना झोपाया फांट्यास्लें लांबालचक दोर भांदी झोका बनायेंल दिखी ऱ्हायना. माहेरलें येल आंडरी झोकास्वर बठी झोका खेयी ऱ्हायन्यात.मांगे मव्हरे व्हनारा झोकास्वर आखाजीनं गाणं म्हनी ऱ्हायन्यात.बाईंनी जिंदगी झोकांगत ऱ्हास का? कस जगणं ऱ्हास दखाना,जलम माहेरलें,मव्हरे आक्खी जिंदगी सासरले नींघी जास. सासरनां दिवा लायी पोरे सोरेस्ना गोमडाम्हा जिंदगी आथानी कैरी, तथानी कैरी व्हयी जास. 🙏

सासरले राबी राबी उबगेल जिवडाले चार दिन माहेरले येवाले भेटतंस. आखाजी माहेरले बलावंसं. खान्देशन्या आंडेर-बेटीस्ना हिरदम्हा बठेल सन आखाजी से. त्या माहेरलें येवानी आसं ल्ही बठेल ऱ्हातीस. आंडरीस्लें वरीसम्हा दोन दावं माहेरलें येवाले भेटनं तरीभी सुख, आनंन मानी ल्हेतीस.दिवाई आखाजीलें सासूरवासीनलें माहेरना व्हडा ऱ्हास. हासी खुशी, दोन आसूं गायी पोर माहेरनं दार सुनं करी सासरले चालनी जास. 

आज आखाजी से!गावंन्या गल्ल्यास्मझारं जथाबन तथा आनंनं भवडी ऱ्हायना.या वरीस्लें देवंघरे जायेलस्न डेर्ग भरायी गये. बठ्ठा भाऊभन मोक्या व्हयी ग्यात व्हतीन. आगारी टाकी टुकी पुरन पोयी, आंबा नां रस रशी,कुल्लाया,भज्यास्न जेवणे करी घरना काना कोपराम्हा आंग टाकी आराम चालू से. भायेर दुन्यानं उन पडेल से. खान्देशनं नव्व साल आजफाइन सुरु व्हयी जायी. जो तों काल्दीन फाइन आपला कामेस्लें, गिरजदारीम्हा लागी जातीन.मांगे मव्हरे व्हनारा झोकास्वर बठेल आंडरी शंकरसंगे नींघी जातीन.चिमण्या उडी जातीन. टिपऱ्या कोपराम्हा ठेवण्या पडतीन. आज आखाजिना दिन मन मोके व्हयी जायी. जिंदगी आशीच ऱ्हास नही का!चटकाडे उन ऱ्हास.त्याम्हा दूर

Comments