केवळ भीमा तुझ्यामुळे

*केवळ भीमा तुझ्यामुळे*
💐💐💐🙏💐💐💐
*********************
... नानाभाऊ माळी 

अत्याचारी साखळी तोडून
आत्मा जोडीला संविधानासं
केवळ भीमा तुझ्यामुळे!🌹

शिक्षणातूनी श्वास घेतला
जातीयेतेची केली हो होळी 
केवळ भीमा तुझ्यामुळे..!🌹

भारतरत्न स्फूर्तीदाता तू
संघर्षालां शक्ती मिळाली
केवळ भीमा तुझ्यामुळे!🌹
 
महामानवा मुक्तीदाता
जगण्याचां श्वास घेतला
केवळ भीमा तुझ्यामुळे!🌹

अंध:कारी बुरखा फाडूनि
सूर्य उगवला तेजाचां
लढाई जिंकलो तुझ्यामुळे!🌹

ज्ञान संघर्ष अटळ होता
वज्रमूठही बळकट केली
केवळ भीमा तुझ्यामुळे..!🌹

  दृष्टीदाता हो ज्ञानदाता
अस्तित्वाचा शिक्का बसला
 केवळ भीमा तुझ्यामुळे!🌹

अंधःकारानें मेंढरं केली
यातनांनां नसे हो सीमा
 उभे राहिलो तुझ्यामुळे!🌹

आनंदाची असे हो जयंती 
महामानवा नमन करतो
आम्ही उभे राहिलो तुझ्यामुळे

मुक्तीदाता तू विश्वमानवा
आम्ही वंदन करितो दिनरात
नवसूर्य दिसला तुझ्यामुळे

केवळ भीमा तुझ्यामुळे!
महामानवा तुझ्यामुळे
संविधान रचिता तुझ्यामुळे
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१४एप्रिल २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments