योगा देहास सजवितो
*योगा देहास सजवितो*
💐🌹🙏🚩🙏🌹💐
(भाग-०१)
***************************
... नानाभाऊ माळी
मन अन शरीराचं नातं भाव भावनाचं असतं.कृष्ण-राधेसारखं असावं. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीतं.एकमेकांतं पूर्णतः एकरूप झालेले असतात, समर्पित असतात.शरीर आधारवड असतो तर मन चंचल मोहिनी म्हणून कार्यरत असतं.एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे.शरीर तंदुरुस्त असलं की मन आतून आनंदाने उसळी घेऊ लागतं. 'एक दुजे के लिए' असं ओवाळून टाकणारं प्रेमळ नातं असतं.मनुष्य देह कृतिशील असतं.देह-मनाचं चिरकाल टिकणाऱ्या नात्यासाठी माणसाने त्यां दोघांची निगा राखली पाहिजे,काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक मनुष्य सुदृढ,आनंदी,सुखी, दीर्घायुष्य होण्यासाठी धडपडत असतो.दिवसभर इतरांसाठी राबणारा देह कुठवर साथ देईल? साथ संगत करत राहील बरं?प्रत्येक दिवसाच्या २४ तासांपैकी कमीत कमी दोन तास शरीरासाठी, मनासाठी दिला पाहिजे. त्याकडून व्यायाम,योगासनं करवून घेतली पाहिजे. योगासन अन प्राणायाम सारख्या योगिक क्रियांवरचं शरीर क्रियाशील राहतं असतं.उत्तम कार्य करू लागतं.मन प्रफुल्लित होऊ लागतं. हे दोघेही मन अन शरीर काही गुलाम नाहीयेत माणसाचे!
मन अन शरीराची शुद्धी होण्यासाठी योगासन हा रामबाण उपाय असतो असं अनेक प्राचीन योगीं, मुनी, साधूंनी सांगितलं आहे.अनेक ग्रंथात योगासनांतून देह देवापर्यंतचां सुंदर प्रवास वर्णन केलेला दिसून येतो.खर्च एक रुपयाचा येत नाही. योग्य योग शिक्षकांकडून योगासन करीत राहिलो, शिकत राहिलो तर शारीरिक व्याधीवर सहज विजय मिळवू शकतो.आम्ही देखील पुण्यातल्या हडपसर भागातील महानगपालिकेच्या आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रात योगासनासाठी जात असतो.सकाळी सूर्योदयाआधी ०६ वाजता शांत, एकांत अन पक्षांच्या कुजबुजणाऱ्या कर्णमधुर किलबिलाटात योगासनं सुरु होतात. निशुल्क योगासन शिकविणारे,वय वर्ष ८१ असलेले,रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री.प्रल्हाद देवघरे सर आहेत!🚩
वयाच्या ८१ व्या वर्षी,२५ वर्षांच्या तरुणांना लाजवतील अशी सहजरीत्या योगासन करणारे अन आम्हास निशुल्क शिकवणारे योग शिक्षक श्री.देवघरे सर अतिशय आनंदी व्यक्तिमत्व आहेत.भारतीय योग संस्थानद्वारा क्रमिक योगासनं अन प्राणायामच्या माध्यमातून शरीराला मिळणारी बळकटी,फायद्या विषयी आपल्या कृतीतून सहजरीत्या शिकवत असतात.दररोज सकाळी ०६ वाजेपासून तें सकाळी ०८ वाजेपर्यंत योगासन,प्राणायाम करून आम्ही मन अन शरीराला घेऊन आनंदाने, नाचत,बांगडत घरी पोहचतं असतो. फक्त दोन तासात दिवसभराची ऊर्जा,उत्साह अंगी मिळत असतो.🚩
*भारतीय योग संस्थानद्वारा* जवळपास दर सहा महिन्यांनी *शंख प्रक्षालन शिबीर* आयोजित करीत असतात.शंख प्रक्षालन म्हणजे शरीराची पूर्ण शुद्धी होय.पोट,छाती, नाक,डोळ्यांची शुद्धी होण्यासाठी या शिबिराच आयोजन होत असतं.हे शिबीर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत आयोजित केलं जातं असतं.आळंदी-चाकण रस्त्यावर 'करवा धर्मशाळेत' शंख प्रक्षालन शिबीर आयोजित केलं जात असतं. दिनांक २८-२९ मार्च २०२६ रोजी भारतीय योग संस्थाननें हे शिबीर आयोजित केलं होतं.आमच्या योग शिक्षकांसोबत आम्ही देखील गेलो होतो. आमच्या देहाच्या शुद्धीसाठी गेलो होतो. देह मंदिर व्हावे म्हणून आम्ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीला गेलो होतो. 🚩
मनुष्य देहाची शरीर शुद्धी *शंख प्रक्षालनातून होत असते* देह देवापर्यंत पोहचावा,आरोग्यदायी, सुदृढ देहासाठी,शिबिरात निर्देशांनुसार क्रमिक क्रिया करीत राहिलो.दोन दोन ग्लास मीठ टाकून कोमट गरम पाणी पिऊन ताडासान,तिर्यक ताडासान, भुजंगासनात मागे वळून पायांची टाच पाहणे.. असे विविध आसन करून करीत होतो....(अपूर्ण...पुढील ०२ भागमध्ये पाहू)
🚩🌹🚩🌹🙏🚩🌹🚩
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३० मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment