समाजसुधारकांच्या २६व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

*समाजसुधारकांच्या २६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी 

          सूर्य दररोज उगवतो, जवळपास १२ तास प्रकाश देत मावळतीला निघून जातो.जीव जीवांना जीवन देणे हेचं उद्दात कार्य त्याचं आहे.तो कुठलाही मोबदला न घेता आपलं कर्तव्य बजावून दररोज मावळतीला निघून जातो. अर्थात सूर्य थांबला आहे आहे का? अजिबात नाही!!तो २४ तास अहव्यातपणे राबतो आहे.पृथ्वी गोल असल्यामुळे ती सूर्याभोवती २४तासात एक फेरा पूर्ण करते असं भौगोलिक कालमापकं सांगतात. पृथ्वीचं सूर्याभोंवतीचं फिरणं थांबलं आहे का? पृथ्वी थांबणारं तरी कशी? सर्व अनर्थ घडेल.पृथ्वीचा सूर्यभोवती फिरण्याचा समर्पित भाव जगातल्या कुठल्याही मोजमापात बसणार नाहीयें.

              एखाद उद्दात्त व्रत, हेतू स्विकारून जीवनभर त्यासाठी झटणे, कष्ट करणे,राबणे,कार्यास समर्पित होणे त्यासाठी साध्याची साधना कठीण असते.मानवी जन्म घेऊन पूज्य पदापर्यंतचां प्रवास महाकाठीण असतो.असे कित्येक महामानव या पृथ्वीतलावर होऊन गेलीत. या देशात होऊन गेलीत.या महाराष्ट्रात होऊन गेली.महराष्ट्र मातीचं सोनं करून निघूनही गेली.छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगेबाबा,बाबा आमटे,पूज्य सानेगूरुजी, थोर तपस्वी कर्मवीर भाऊराव पाटील..... ही महाराष्ट्राची नररत्ने, महामानव कुठल्या मोजमापकात मोजले जातील का?त्यांचं महान कार्यचं uncountable असं आहे.अनमोल आहे.

                  याचं पिढीला आदर्श मानून झपाटलेली अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्यासमोर आदर्श ठेवून उभी आहेत.त्यांचं अथक कष्ट डोळ्यासमोर आहे. त्यातील काही व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत ईश्वर आमंत्रणावरून काळ पडद्या मागे निघून देखील गेलीत. माणूस येतांना काहीही घेऊन येत नसतो. जातांना देखील काहीही सोबत घेऊन जात नसतो.मागे असतं केवळ गुणात्मक नाव,सत्कर्म. कर्तृत्वकिर्ती कार्यस्वरूपात लौकिक अर्थाने समाजासमोर असते.थोर समाजसेविका *कै.सौ.शैलाताई रतन माळी* त्यातील एक आहेत.

              काही व्यक्ती स्वप्न घेऊन जन्माला येत असतात.तें साध्य करण्यासाठी अतिशय कष्ट घेतात.परिश्रम घेत विशिष्ट ध्येय गाठून समाजासमोर आदर्श ठेवत असतात. ऋषितुल्य श्री.रतन माळी सर अन थोर समाजसेविका कै.सौ.शैलाताई माळी या दांपत्यानें पुण्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले अन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारकांचं कार्य हाती घेत निष्ठेने सामाजिक बांधिलकी योगदान दिलेलं आहे. शिक्षण हेचं माणसाच्या प्रगतीच गमक आहे हे यांनी जाणलं होतं. या दांपत्याने पुण्यातील हडपसर भागात ससाणेनगरला सुरुवातीला सन १९७४ बालवाडी सुरु केली होती. मुलांवर उत्तम संस्कार करणाऱ्या या कुटुंबानें स्वतःस ज्ञानसंस्काराला झोकून दिले होते. एक एक वर्ग वाढत होते.जबाबदारी वाढत होती.विविध ठिकाणी ज्ञानरोपटे लावत गेलेत.पाहता पाहता लावलेल्या रोपट्याचे विशाल ज्ञानवृक्ष होऊन गेले.अथक श्रम, त्यागवृत्तीमुळे ज्ञानशाखांचा विस्तार होत राहिला.💐

            उभयतांनी *महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था* स्थापन करून वारजेमाळवाडी, दत्तनगर, कात्रज, कदमवाक वस्ती, लोणी, साडेसतरा नळी, ससाणेनगर अशा ठिकाणी त्यांनी ज्ञान शाखंचा विस्तार केला. बालवाडी तें १२ पर्यंत शाळांची गुणवत्ता वाखाणण्या जोगी होती.हे खूप धडपड, कष्टाचं फळ होतं.विशाल ज्ञानवृक्ष ज्ञान देण्यास उभा असतांना पुण्यात धुळे जिल्ह्यातील केवळ अंगावरील कपड्यांवर आलेल्या ज्ञानवंतांच्या एकजीव  झालेल्या रथाचं एक चाक अचानक मोडलं. समाजसेविका, कर्मयोगिनी *कै.सौ.शैलाताईचं २३मार्च २००० या वर्षी दुःखद निधन झालं होतं.कन्या स्मिता, पती श्री रतन माळी सर संपूर्ण संस्था दुःखात बुडाली होती.आपली काळजातील व्यक्ती जाण्याचं दुःख काय असतं हे त्यांनाचं कळत असतं.💐

        समाजसुधारक कै.सौ.शैलाताई यांच्या जाण्याचं दुःख सहन करीत. त्यातून सावरत,उभे राहतं ताईंच्या आदर्श कार्याचं स्वप्न मनाशी बाळगून कुटुंब, संस्था पुन्हा उभी राहून वाटचाल करू लागली.वर्ष जात राहिली.संस्था ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास समरस झाली.संस्थापक कर्मवीर रतन माळी सर, कन्या अध्यक्षा सौ. स्मिताताई रविंद्र वाघ, सचिव जावाई प्राचार्य रविंद्र वाघ सर यांनी बाईंच्या स्वप्नातील *महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचां* नावलौकिक वाढविला आहे. सर्वांच्या वाढत्या *माळी बाईंना* जाऊन २६ वर्ष पूर्ण झालीत. संस्थेचा कायापालट होतं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान सौ.स्मिताताई अन वाघ सर उपयोगात आणून संस्थेला अग्रगण्य स्थानावर आणून ठेवलं आहे.

       दरवर्षी समाजसुधारक कै. सौ. शैलाताई माळी यांच्या स्मृतिदिनी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेसारखाच भव्यदिव्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतं.या वर्षी देखील बाईंच्या स्मृतीनां उजाळा देण्यासाठी २२-२३ मार्च रोजी अनेक सांस्कृतिक, साहित्यिक, प्रवचन, कथाकथन, कवी संमेलन, गुजगोष्टीचं आयोजन केलं जात असतं. विविध क्षेत्रात कार्यरत उत्तुंग व्यक्तिमत्वाचां महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचा *समाजसुधारक कै. सौ. शैलाताई रतन माळी* पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सन २०२५-२६ या वर्षाचें पुरस्कार देऊन अनेक विचारवंतांचा सन्मान करण्यात आला.थोर समाजसुधारक कै.सौ शैलाताई रतन माळी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. अन शब्दांना विराम देतो. 💐
💐💐💐💐🙏💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२५ मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol