कानिफनाथ गड कष्टाचा देव (भाग-३८)

*कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
                  (भाग-३८)
***************************
... नानाभाऊ माळी

            विकास शब्दात खूप मोठी ताकद आहे.पूर्वी आपण आदिम अवस्थेत होतो.नंतर आम्ही civilised होतांना विकास प्रक्रियेचा भाग होत गेलोत.नैसर्गिक जे होतं ते नष्ट होत जात आहे. कृत्रिमतेचा आधार घेत विकासाकडे निघालो आहोत. मोठ मोठे रस्ते तयार होत आहेत. त्या कडेला असलेली जुनी १५०-२०० वर्षांची झाडं तोडून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. transportation सुलभ होण्यासाठी निसर्गाचा ऱ्हास होत आहे.झाडांच्या ऱ्हासाऐवजी विकासाला प्राधान्य देण्याला महत्व प्राप्त झालेलं आहे.विशाल जंगलं तोडून नागरी सुविधाचां मारा सुरु आहे.त्या माऱ्यात निसर्गाचा तोल सुटतो आहे याची काळजी प्रत्येक नागरिकांने घेतली पाहिजे. जंगलाच्या कुशीत मोठ मोठे घरकुल प्रोजेक्ट्स उभी राहात आहेत. निसर्गाला आव्हान देत आहेत. मानवाने केलेलं अतिक्रमण निसर्ग कुठवर सहन करणारं आहे.?

                   काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसर नैसर्गिक अवस्थेत सुंदर जंगलांनी सजलेला होता.उंच उंच पर्वतांवर झाडं, वेली, पक्षी, मोर, छोटे मोठे वन्यजीव निसर्गत: विहार करीत होती. एकजीव झालेली दिसत होती.पुढे शहरांच्या वाढीमुळे मानवी अतिक्रमण वाढलं.एक एक झाडं अन निसर्गसंपन्न भाग विकास प्रक्रियेमध्ये नष्ट होऊ लागली.त्या भागातील नैसर्गिक संपदेवर कुऱ्हाडीचे घाव बसू लागले. झाडं,जंगलं जी स्पंदनं समजली जातात.शुद्ध प्राणवायू प्रत्येक जीवांसाठी हितकारक असतो.गेल्या काही वर्षांपासून बोपदेव घाट परिसर,उंच डोंगरावरील कानिफनाथ मंदिर परिसर बोडका होऊ लागला आहे.आता उन्हाळा सुरु झाला आहे.जंगलांना आगी लागतं आहेत. कोण जबाबदार आहे याला? सर्वस्वी आपणचं आहोत.आर्थिक विकास साधणारी पर्यावरणाचं संतुलन बिघडवत आहेत.आम्ही काही वर्षांपूर्वी कानिफनाथ गडावर जात होतो तेव्हा जंगलातील हरणं, मोर अन्य वन्यप्राणी मुक्त संचार करतांना दिसायची.तेव्हा होळकरवाडी मार्गे कानिफनाथ गडावर जातांना उंच पर्वत,झाडांचीं गर्दी दिसायची.आता काय झालं मग?

           आता स्वयंचलीत चार चाकी वाहनं, दोन चाकी गाड्या जीवांच्या एकांताने ओरडून, धूर सोडून वर कानिफनाथ मंदिरावर पोहचत आहेत.पूर्वी वर जायला धड रस्ता नव्हता ट्रेकिंगंचा कठीण अनुभव घेत वर गडावर पोहोचायचो.आता मला वाटतं आता चौपदरी घाट रस्त्याचं काम जोरात चालू आहे.दगडं धोंडे उस्कटून रस्ता तयार होत आहे. सासवडला जातांना दिवे घाटाला पर्याय म्हणून या रस्त्याचं काम जोरात चालू असावं.पर्यावरणाची नासाडी करून पर्यटन साधलं जात आहे.आम्ही दर रविवार होळकरवाडी मार्गे कानिफनाथ गडावर जात असतो. स्वतःच्या फुफुसाची परीक्षा द्यायंला जात असतो. श्वासात दम भरायला जात असतो.शुद्ध प्राणवायू घ्यायला जात असतो.

             नेहमीप्रमाणे काल रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पहाटे ०५ वाजता कानिफनाथ गडावर चढाईला निघालो. पहाट शुद्ध, स्वच्छ होती. दिवसा कडक ऊन असूनही पहाट हलक्याशा गारठ्याने मन गुलाबासारखे प्रफुल्लित होतं. पहाटेच्या अंधार समयी कानिफनाथ पायथ्यापासून चढाईला सुरुवात केली होती.सभोवती अंधार पसरलेला होता.काही भटकी कुत्री भुंकत होती.त्यांनाही माणसाचं सानिध्य हव असतं.टॉर्चच्या उजेडात जवळ आली तशी शेपटी हलवून त्यांनी मैत्रीचा प्रस्ताव मांडला होता.आम्ही तात्काळ स्वीकारला अन आमच्या सोबतंच शेपटी हलवत चालू लागली.ती काळी,पांढरी कुत्री जणू आमचे रक्षक झाली होती. डोंगर उतारावरून अंधारात एखादा बिबटया देखील येऊ शकतो.पण कुत्रें माणसांचे मित्र असतात. आम्हाला सुरक्षा प्रदान करीत सोबत चालत होती.

               गुढघ्याला मनाचा आदेश होता, चलते रहो!चलते रहो!छातीत दम लागल्यागत होत होतं.ट्रेकिंग म्हटलं की शरीराचे अति लाड करू नये म्हणतात.आम्ही देखील आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल वाटचाल करीत होतो.डोळ्यासमोर उंच पर्वत शिखरावर वसलेलं कानिफनाथ मंदिर दिसत होतं. चालण्यातून सर्वांग सुंदर व्यायाम होतं असतो. आम्ही वेळेच नियोजन ठरविल्या प्रमाणे चढाची वेडीवाकडी वळणं पार करीत कानिफनाथ मंदिराजवळ येऊन पोहचलो होतो.पर्वतावरील उंच शिखरावर लाइटिंग चमकतं होती.हृदयात भक्ती अन मनाची शक्ती एकत्र आली की श्रद्धेजवळ जाणं सोपं जात असतं. आम्ही भक्ती मंदिराजवळ पोहचलो होतो.

            कानिफनाथ महाराजांचं दर्शन समाधानाचं सर्वोच्च भक्ती आनंद होता.आम्ही त्या अनुभवाचा आनंद घेत होतो. देवदर्शन आनंद देत असतं, त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. आम्ही घाम गाळून चंदनाच्या सानिध्यात स्वतःस हरवून बसलो होतो. ही अनुभूती कधी विसरता येईल का??
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक- १६ मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol