मन्हा मनन्हा बोल

*मन्हा मनन्हा बोल*
   🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**************************
... नानाभाऊ माळी

राम राम मंडई!अहिराणी भाषा दिनन्ह्या शुभेच्छा!💐

                           गंजज दाव लोके बोलतंस,'तो आते भलता बदली ग्या बरं का!' बदली ग्या यान्हा आर्थ ठोकरा खावावर बदल घडना आसं व्हस.आनभव भेटावर बदल घडत ऱ्हास.मानोस बदलतं ऱ्हास. येय-कायनां आसर ऱ्हास.दिनमान बदलत ऱ्हास, आपलाच नांदे पयत ऱ्हास.नांद हावू बदलनां परकार से.कोन कोन्हा नांदे लागी यान्हा भरोसा नही.मानोस बदलत ऱ्हास.काल्दीन काय व्हता, आते काय व्हयी ग्या.काल्दीन काय घडनं व्हतं,आते काय घडी ऱ्हायन? हावू बठ्ठा खेय ऋतू बदल निसर्गदेवनां चमत्कार से,त्यान्ही देनगी से. 

         निसर्गांमायेक मनोसना सभाव बदलत ऱ्हास. दसरा, दिवाई, उत्रान, महाशिवरातीलें थंडी कुंमचाडी ऱ्हायंती.व्हयी गयी नि चटकाड्या यांयं मांगे लागी ग्या.आजून गुडीपाडालें पाच-सव दिन बाकी सेतस.पन आतेफायींन वून झामलायी ऱ्हायन.वूनन्हा चटका जिमीनलें बठी ऱ्हायना.ज्यास्ना वावरे नागरी ठेयेलं सेतस त्या बांधवरन्हा निमना झाड खाले बठी सावली खायी ऱ्हायनात.वूनन्ह्या झया चाली ऱ्हायन्यात.दूरदूर पावूतकिरकोडास्ना किर्रर्र आवाज कानवर पडी ऱ्हायना. त्या किरकोडाभी झाडेस्नी सावलीम्हा जिमीनखाले काने कोपरे बठी उजागरा करी ऱ्हायनात.गहू हरभरा,पये घरले भिडी जायेल से. घरतीन पोतडीस्न्या चुंग्या न चुंग्या बजारम्हा जायी ऱ्हायनं.🌹

 वरीसना साफटा भरानां कामे चालू सेतस. माया -बहिनी, व्हवू-बेटी शिय्या, काटका पाटवर वयी ऱ्हायन्यात.गहू,मठन्या वड्या,पापडे कराम्हा गुंग सेतस.त्याम्हा लगीनयांव मझारम्हा घुसी जास.वूनन्हा चटका बठ्ठा खे कराले लायी ऱ्हायना. सहेरम्हा मशिनीस्वर शिय्या,पापडे व्हयी ऱ्हायंनात.काय चव ना धव त्यास्लें!!गांवेगाव उंडायांना सारसामान करानी बट्ठी पद्धत आनी हौस मशीन लयी पयी ग्या.पैसा फेका का आयतं भेटी ऱ्हायनं.घरमा पुरणपोयी करांनं कामचं ऱ्हायनं नही.इकत पुऱ्या ली लेवो.संगे दायनं उकयेलं पानी भेटस. रसी वरपी वरपी खावाsss! घरमा गदारा व्हयी ऱ्हायना.भाहेर वून भुंजी ऱ्हायनं. पुल्ला गुरुवारले गुडीपाडा यीं ऱ्हायंना.वूनम्हा झाडनी फांटीस्वर सावलीले बठी हाड्या,चिड्या त्यास्नी भाषा बोली ऱ्हायनात.🌹

     वसरीम्हा बठेल धल्ला-पल्ला ताता बायेतां यांयन्हा खे दखी गुच्चूप खाटलावर बठेल सेतस.त्यास्नी जुनी याद हिरदले दनकारी सांगी ऱ्हायनी,'धयेंडपनन्ही हातमा धरेल काठी सोडीस्नी पयेत नींघो.हेर, वावर दूर पावूतं बांधेबांध भवडी येवो. बठ्ठ जुनं ते मांगे ऱ्हायीं गें.बीन कसन्ह मव्हरे मांडेल से!आस्सल सरी ऱ्हायन!' 
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी 
मु पो ता शिंदखेडा, धुळे 
(ह.मु. हडपसर,पुणे)
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक -१२ मार्च २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol