छत्रपती शिवराय जन्मोत्सवनिमित्त ढवळगडावर चढाई
*छत्रपती शिवराय जन्मोत्सवनिमित्त* (किल्ले ढवळगडावर चढाई)
🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
**********************
... नानाभाऊ माळी
*आज १९ फेब्रुवारी २०२६!छत्रपती शिवरायांची ३९६ वी जयंती!* रयतेच्या राजांनां, शिवरायांना कोटी कोटी नमन करण्याचा अतिशय पवित्र,अभिमान, गौरव वाटणारा दिवस आहे.माणसं जातील,माणसं येतील!पिढ्या जातील-येतील!काळ पळत राहिलं!काळ चक्र फिरत राहिलं!युगं येतील-जातील..छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचां,महापराक्रमाचां लढवय्या इतिहास पृथ्वी अस्तित्वापर्यंत प्रकाशमान होत राहिलं.शिवनेरीचां गौरवशाली इतिहास सोनेरी पाना पानातून प्रकाशत राहिलं.छत्रपतींच्या जन्मानें पवित्र पावन झालेली भूमी सतत काळजाला *लढ* म्हणून सांगत राहिलं.हिंदवी स्वराज्याचा भगवाध्वज सतत फडकत राहिल.
*किल्ला* डोळ्यासमोर येताचं शिवभक्तीचीं ओढ लागते.तलवार, तोफांचा आवाज कानी पडू लागतो. स्वराज्यासाठी लढतां लढता प्राण त्यागणारे मावळे दिसू लागतात. शिवशक्तीचां त्यागमय इतिहास आठवू लागतो.छत्रपती राजांच्या स्मृती काळजात कोरून ठेवाव्याशा वाटतात.कुळवाडी भूषण, सिंहासनाधिश्वरांच्या शौर्यानें सुखी -आनंदी झालेल्या रयतेच्या हृदयात नव्या उर्मीनां पालवी फुटू लागते. जाज्वल्य देशभक्तीची उमेद काळजातून दाटून येत असते. सह्याद्रीच्या पौलादी पर्वतरांगा डोळ्यांना दिसू लागतात.सह्याद्री शिखरावर भक्कम बांधलेले किल्ले दिसू लागतात.छत्रपती शिवरायांचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर दिसू लागतं.*शिवनेरी किल्ल्यावरून आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचें पोवाडे कानी पडू लागतात.* आम्हास छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ दिसू लागतं. राजामाता जिजाऊंसाहेबांचे संस्कारी बोल कानी पडू लागतात. आई साहेबांनी बाल शिवबांवर केलेले धर्म रक्षणासाठी त्यागी संस्कार हृदयांत ठायी ठायी वसू लागतात. सह्याद्रीच्या विशाल पौलादी छातीवर उभा शिवनेरी किल्ला दिसू लागतो. उंच उंच ठिकाणी बांधलेला प्रतापी किल्ला डोळ्यासमोरून येऊ लागतो. महाराष्ट्र भूमीलाचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला गर्वाने छाती फुगून जय शिवाजी!जय भवानीचे अंतरीचे बोल फुटू लागतात.निर्दयी,निष्ठुर,अत्याचारी यवनांपासून रक्षण करीत स्वराज्य स्थापन करणारे विश्व पराक्रमी राजे छत्रपती शिवराय दिसू लागतात.🚩
छत्रपती शिवराय आदर्श राजे होते. डोंगर-माथा,गड-किल्ल्यांवरून तत्कालीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या ताकदीवर शत्रूला कोंडीत पकडून नामोहरण करणारे युद्धकुशल योद्धा होते.आम्हा भारतीयांना अभिमान अन गर्व आहे. आदर्श राजांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही देखील..... ढवळगडावर चढाईचीं मोहीम आखली होती.किल्ल्यावर महाराजांकडून घाम, कष्ट, युक्ती, शक्ती,भक्तीचे धडे गिरवायला गेलो होतो.पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील पुणे-सासवड-वाघापूर मार्गे आंबळे गावाजवळ असलेला ढवळगड किल्ला आहे.पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून साधारण ८५० मिटर उंचावर असणारा हा किल्ला पाठीमागच्या बाजूने उरुळीकांचनहून डाळिंब गावातूनही जाता येतं.मागील बाजू उभट, खडकाळ चढाईला अवघड अशी आहे.आम्ही नेमक्या त्याचं पाठीमागील कठीण उभट असणाऱ्या बाजूने किल्ला चढाई केली होती. किल्ला तसा अपरिचित आहे.भुलेश्वर डोंगर रांगाच्यामध्ये हा किल्ला असून इतिहासात तशी नोंद दिसत नाही तरी इतिहास संशोधक कृष्णाजी पुरंदरे यांनी ढवळेश्वर किल्ल्याचा उल्लेख केलेला दिसतो.पेशवाईच्या काळातील हा किल्ला असावा असा अंदाज त्यांनी बांधला आहे.पेशव्यांचे सर लष्कर सरकार खंडेराव दरेकर यांचा आंबळे गावात खूप मोठा वाडा आहे. त्यांच्याकडेचं हा किल्ला असावा. टेहळणी किल्ला म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा.आनंद मंगल किल्ला (भुलेश्वर)या किल्ल्यावरून दिसतो.
ढवळगडावर जायला आता आंबळे गावाकडून अतिशय उत्तम पायऱ्या बांधलेल्या आहेत.रविवाऱ दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या भल्या पहाटे आम्ही हडपसर, पुण्यातील कानिफनाथ ट्रेकिंग अन हेल्थ क्लबचे निवडक ट्रेकर (मावळे) पुण्याहून उरुळीकांचनमार्गे डाळिंब गावाकडून वाटचाल करीत निघालो होतो.सर्वत्र अंधार होता.पुणे-कोल्हापूर रेल्वे लाईन पार करून सरळ किल्ल्याच्या पाठीमागून चढाईला सुरुवात केली होती.रस्ता अजिबात नव्हता.अंगावर येणारा उभट चढ होता.अंधारात टॉर्चच्या उजेडात चढाई सुरु होती. कुणालाही चढाचीं पाय वाट माहीत नव्हती.किल्ल्याच्या पाठीमागून डाळिंब गावाच्या खांबावरील लाईट चमकत होते.अंगावर येणारा तीव्र चढ पहाटेच्या अंधारात घाम काढण्यास पुरेसा होता.छत्रपती शिवारायांची प्रचंड ऊर्जा आमच्या अंगात होती. घसरणारें दगड-धोंडे टाळत आम्ही ढवळगडावर चढलो.छत्रपती शिवरांयांचे मावळे असल्याचा सार्थ अभिमान वाटला.🚩
उंच डोंगर शिखरावर,समोर प्रचंड मोठा दगडी बुरुज उभा दिसला.पडझड झालेला तरीही आपलं अस्तित्व जपून ठेवणारा बाणेदार बुरुज उभा दिसला. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो असता पाहरेंकऱ्यांसाठी देवळी दिसली. पडझड झालेली तरीही शाबूत असलेली देवळी किल्ल्याचा इतिहास घेऊन उभी होती. पुढे गेलो असता पाण्याचे टाके दिसलें.किल्ल्यावर पाणी टिकवून ठेवण्यासाठी हे टाके असावे.अजून एका सफाट भुई भागावर चुण्याचा गोल घाना दिसला. बांधकामासाठी त्या काळी घाण्याचा चुना वापरत असावे.पुढे जाऊन पाहिले असता खूप मोठे मंदिर दिसलें.ढवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे.मंदिराबाहेर नंदी असून आता आत सभामंडम अन गर्भगृह दिसलं. त्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड दिसली.आम्ही भक्तीभावाने नतमस्तक होत महादेवाचं दर्शन घेतलं.रविवारी महाशिवरात्री होती.मंदिर कदाचित पेशवेकालीन असावं.उंच शिखरावरील महादेव कृपा आशीर्वाद देत असावेत. उंच पर्वतःचा आकार हत्तीच्या सोंडे सारखा दिसतो. चालत दुसऱ्या टोकावर आलो असता छत्रपती संभाजी महाराजांचीं खूप मोठी प्रतिमा दिसली.सभामंडप दिसलं छत्रपतीनां मुजरा करून मागे आंबळे गावाच्या दिशेने असलेल्या पायऱ्यावरून खाली उतरतांना अखंड दगडातील गणपतीचं मूर्ती अन मंदिर दिसलं. मनोभावे नमस्कार करून आम्ही पुन्हा काही पायऱ्या उतरून हनुमानाच्या अखंड दगडातील दोन्ही बाजूस हनुमान रूप कोरलेली मूर्तीचं दर्शन घेतलं. पुरंदर तालुक्यातील आंबळे गावचा ढवळेश्वर किल्ल्याची चढाई शिवतत्वाला समर्पित आहे.शिवमहादेव अन छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त!जन्मोत्सव निमित्त कोटी कोटी मुजरा! *आज शिव जयंती निमित्त नमन करतो.* 🚩
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-शिवजयंती १९फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment