अष्टविनायक दर्शन भक्ती आनंद सहल(भाग -०४)

*अष्टविनायक दर्शन भक्तीआनंद सहल*
👍🚩🚩🚩🙏🚩🚩🚩💐
                   (भाग-०४)
*****************************
... नानाभाऊ माळी 

              श्रीविघ्नेश्वराचं दर्शन घेऊन ओझरलाचं रात्री मुक्कामी होतो. दिवभर श्रीगणेश दर्शनामुळे धावपळ झाली होती.अंथरुणावर अंग टाकलं अन काही वेळातच झोपेच्या अधीन झालो होतो.जागेपणी श्रीगणपतीचं रूप अंतःकरणी अवतरलं होत. स्वप्नात देखील श्रीगणेश दिसत होते.११फेब्रुवारी २०२६ रोजी *पाच* गणपतीचे दर्शन झालं होतं. मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी अजून *तीन* श्री गणेशाचं व्हायचं बाकी होतं.श्री गणेशाची कितीतरी नावं आहेत.असं म्हणतात की श्रीविनायकाची १०८ नावं आहेत. एवढ्या नावांनी देव हृदयात विराजमान आहे.शुभ कार्याचा प्रारंभ श्रीगणेशाने होत असल्यामुळे जी नावं आठवतात ती स्वप्नात देखील येऊ लागली होती.साक्षात देव अंतकरणात विसवला होता. हृदयातून देवाला हाक दिली होती. देव भक्ती भक्तीत देह भक्तिमय होऊन जातो.

                 १२ फेब्रुवारी रोजी पहाटे लवकर उठलो.स्नानाधी आटोपून सकाळी सूर्य उगविण्याआधी पुन्हा भावभक्तीने ओझरच्या श्रीविघ्नेश्वराचं दर्शन घेतलं. उगवतीच्या पिवळ्या- तांबूस प्रकाशात,हृदयी आनंद घेऊन बसमध्ये जाऊन बसलो होतो.आम्हा भक्तांच्या हृदयी भक्तीसागर उसळी घेत होतां.बस लेण्याद्रीच्या दिशेने निघाली होती.श्रीगीरिजात्मज गणपती बाप्पाच्या दिशेने पळत होती.अंतर खूप होतं,साधारण १५० किलोमीटर असावं.रस्त्याच्या कडेने निसर्ग नानाविविध रूपातं दर्शन देत होतां.फेब्रुवारी असतानाही उन्हासोबत सुष्कता जाणवत होती. सूर्यनारायण देवभूमीस तापवू लागला आहे.निसर्गरंग रंगात रंगलाहोतां.बसमधून दूरवर उंच उंच पर्वतरांगा दिसू लागल्या होत्या.उंच पर्वतात अखंड कातळ फोडून लेण्या कोरलेल्या दिसत होत्या.दूरवरून दुसणारं ते मनोहारी सुंदर कलाशिल्प म्हणजे मानवाने आपल्या कलागुणांनी साकारलेला  विस्मयकारी चमत्कार आहे.

          उंच डोंगर पोखरणे म्हणजे तत्कालीन आद्ययावत तंत्रज्ञानाचा अद्भुत नमुना असावा.बसने त्या डोंगर पायथ्याशी पोहचत असतांना त्या लेण्या ठळक दिसू लागल्या होत्या. डोंगर उतारावरील जंगलात ते ठिकाण दिसत होतं.*लेण्याद्री* त्याचं नाव.लेण्याद्रीला उंच डोंगरावरील गुहेत अष्टविनायक पैकी एक श्रीगिरीजात्मज देवबापाचं मंदिर आहे.उंचावरील साधारणत: ४०० दगडी पायऱ्या चढून गेल्यावर एका गुहेत विराजमान असलेल्या श्रीगणेशाचं दर्शन झालं होतं.पायऱ्या उंच असल्यामुळे दम लागत होता.उंच डोंगरावरील एका गुहेत देव विराजमान होते.विशाल कातळ कोरून लेणीरूप अतिभव्य शिल्प साकारले होते.लेण्याद्रीला अष्टविनायक पैकी एक श्रीगिरीजात्मजचं दर्शन झालं होतं. पायऱ्या चढून,घाम टिपित गणपती बाप्पाचं दर्शन झालं होतं.'कष्टविना देव नाही माणसा का करितो घाई!'अशी आमची मनोअवस्था झाली होती.देव प्राप्तीसाठी,देव कृपेसाठी स्वतःस विसरावं लागतं. भक्तीत व्याकुळ व्हावं लागतं. *आम्हाला उंच पर्वतावर, गिरीशय्येवर  विराजमान श्रीगिरीजात्मजचं दर्शन झालं होतं.*
(क्रमशः भाग -०५ मध्ये पाहू)
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
*****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१६ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol