शिरपूर जत्राम्हा राकेशभाऊ शिरसाठ

*शिरपूर जत्राम्हा राकेशभाऊ शिरसाठ*
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
...नानाभाऊ माळी

               
           परोदिंन ०८ फेब्रुवारीनां आयतवारे सक्कायम्हा जयगावथून नींघनू. एरंडोललें प्रसिद्ध कवी-लेखक आदरणीय प्रा. वा. ना. आंधळे सरस्नी अहिराणी लिखायीथून *बा तथागता!विवेकी जणिवांचा प्रज्ञा प्रवाह...* या अहिराणी लिखायीनां समीक्षा ग्रंथनं प्रकाशन व्हतं.अहिराणी साहित्यांम्हा हाऊ पहिलाचं प्रयोग से आसं बठ्ठा तत्वग्यानीस्न मत पडनं.बा तथागता पहिलाम्हा अहिराणी साहित्याम्हा नावकरी व्हयी ऱ्हायना.*बा तथागता नां* मराठी मुय लेखक प्रा. म सु पगारे सर सेतस!....🚩

                   एरंडोलथून धुयेमार्गे शिरपूरलें गयथू.कोंथाभी जवाईलें सासुरवाडीनां उज्जी व्हडा ऱ्हास.मन्हा नात-नातरें मोठा व्हयी ग्यात तरिभी मन्ही सासुरवाडी काय सुटनी नही. आते मन्ह ६४ वं वरीस चालू से, तरी धल्ला-पल्ला ८०-८१ वरीसनां सासरांगंम पाय व्हडी लयी जातंस. आसं काब्र व्हस व्हयी बरं?आथा माय -बाप,भाऊस्नासंगे वाकडा-तीकडा वागत ऱ्हास.त्यास्नाफाइन दूर चालना जास.आथ बाईनं माहेर आंगनजोगें यीं जास.याले म्हंतंस गुयींचीटिंग व्हडा.हावू व्हडा दुन्या ऱ्हायी तवपावूतं ऱ्हायी.दुन्या गोल गीटिंग व्हतं ऱ्हायीं.सासुरवाडीनां झोयीम्हा जवाई-आंडेर झोका लेत ऱ्हातीन.... तर मी एरंडोलथून शिरपूरनां इस्टँडवर उतरनू. संगे मांगे घरधनीन व्हतीचं. माले काय माहीत,शिरपूरन्ही खंडेराव महाराजनीं जत्रा से आसं? इस्टॅन्डफाइन जत्रा दाखनारस्नी गर्दी दखी खटलालें इचार,'कावं इतली काय गर्दी से हायी?🚩


         गर्दीम्हा काय सांगो? भय लोके चालू दि नही ऱ्हायनात आपले.आज सोमवारन्हा बजारन्ही गर्दी दिखस.' बाई माहेरम्हा उमटी पडी न्हा हो. म्हनस कशी,'आहो शिरपूरनीं जत्रा से ना.तुम्हले मालूमात नही जशी?' माले काय माहीत माहेरन्ह खेन्ट बाईलेच माहीत ऱ्हायीं नां!बाया भलत्या चत्र्या ऱ्हातीस पन,उमटतीस नही.मी आम्हनं व्हझ पाठगोयी मारी चाली ऱ्हायंतू.गर्दीम्हा मव्हरे जावानी मारामार व्हती. तिरपा-तारपा हेंगडा-वाकडा व्हयी घरगंम चाली ऱ्हायांतुत.जत्राम्हा काय नही व्हतं? बट्ठ्या वस्तू व्हत्यात. बाई, मानोस, सवसारल्हे लागी आशा बट्ठ्या चिज-वस्तू व्हत्यात.श्रीखंडेराव महाराज मंदिरम्हा दर्शन लेवागुंता हुडवर धूड गर्दी व्हती.आम्ही गर्दी दखी भाहेरथूनचं,दर्शन ली मव्हरे नींघनूत.थोडीशी जिलबी-गोडशेव लिधी.

                जत्राम्हा उसनां रस पी मव्हरे जायी ऱ्हायंतुत तितलम्हा एकाएक अहिरानी अँकर, तोंडेतोंड करनारा सुरतन्हा अहिरानी मुलाखतकार आनी नामदार मानुस,राकेशभाऊ शिरसाठ त्यास्ना खटलांसंगे शिरपूरनीं जत्राम्हा दिखनातं.मी त्या राकेश भाऊले फेसबुक पांटावर दखेल व्हता.जीवानलें दखी उज्जी आनंन व्हयनां व्हता.मी सोतालें इसरी त्यांगम पयत सुटनू व्हतु.

मन्ह खटलं माले येडांग्या, बांग्या समजी मनगंम दखत ऱ्हायनी.तिन्हा हात सोडी राकेश भाऊजोगे गवू. त्याले फेसबुक फ्रेंड सांगीस्नी चांगला न्यामिनां तीन-चार फोटूके काढी लिदात बरं!!!राकेशभो सोशल मीडियानां नावकरी मानोस से.आपलं काय कर्तुक से नाव कमावा सारखं? त्यांजोगे हुभा ऱ्हायीं फोटूक काढाले भेटनं हायी नसीब व्हतं.एक अहिराणीना लाल गुजरातम्हा माय बोलींना डांख्या वाजी ऱ्हायना. अहिराणी मायना गाजावाजा करी ऱ्हायना, छाती फुगाडी अभिमान वाटना.पापनी हुघडझाप करो तितला सेकंदम्हा राकेशभाऊ गर्दीम्हा दिखेनासे व्हयी ग्या.मी मातर त्यान्हा मोबाईलम्हा काढेल फोटूक दखी खुश व्हयी ऱ्हायंतू.बाईं मन्हा हात धरी मव्हरे व्हडी लयी गयी.मी व्हडात ऱ्हायनू.अंधारांम्हा चमक्या हलता, हिलता, फिरता पायना दखत  ऱ्हायंनू.पायना गोल गोल फिरी ऱ्हायंतात. मन्ह डोकं गरगर फिरी ऱ्हायंत.माले दखी खटलं रागम्हा बोलनं,'तुम्हले काय सुमारा से का नही हो? तुम्हना पोऱ्यांवयना तो पोऱ्या. त्यांसगे काब्र फोटूक काढी ऱ्हायंतात? इतला कोन व्हता तो?' मी काय सांगू तिले? व्हटनीं गोट पोटम्हा दाबी धरी व्हती. सासुरवाडीलें बाईंमांगे व्हडात ऱ्हायनू.जत्रा जागी ऱ्हायंती.मन जत्राम्हा भवडी ऱ्हायंत. 
🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी 
शिंदखेडा, जि. धुये 
ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol