अस्तित्वाच्या खाणाखुणा
*अस्तित्वाच्या खाणाखुणा*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
अस्तित्व काय असतं बरं? अस्तित्वाची ओळख तरी कशी असावी?निर्मिती अस्तित्वासं जन्म देत असते.जीवसृष्टीत प्रत्येक जीव आपलं अस्तित्व घेऊन आलेला असतो.डोळ्यांना हालचाल दिसते. कानांनी ऐकण्यातून, मुखवाणीतून आपल्या अस्तित्वाची जाणीव होत असते.हा 'जीव जीवस्य जीवनमचां' महत्वपूर्ण भाग आहे.प्राकृतिक भौतिकरूप अस्तित्वाचीं खरी ओळख असते.💐
विशाल सृष्टीत माणूस नावाचा जीव देखील आहे.मनुष्य प्राणी इतर सर्व प्राण्यांना आपल्या नियंत्रणात ठेऊ शकतो. बुद्धी चतुर्याच्या माध्यमातून माणसाच्या वेगळेपणाची ओळख असते. बुद्धीचातुर्य, भावना, स्पर्श,जाणीव अन श्रद्धा -विश्वासाच्या जोरावर मनुष्य कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो!माणसाला स्वार्थ,संपत्ती, प्रसिद्धीचां मोह असतोचं.स्वतः स्वतःच्या अनेक पिढ्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी धडपडत असते.त्यापायी माणूस माणसाशी वागणे बदलतो.वेगळेपण सिद्ध करीत असतो.अहंमिका,स्पर्धा,जय-पराजया च्या कृतीतून हक्काचीं मागणी सुरु होते.स्वार्थी पोटाची मागणी पाठीपर्यंत पोहचते.हव्यास वाढत असतो.हव्यासापोटी माणूस माणसाशी जोडला जातो, तोडलाही जातो.माणूस माणसाला जोडत श्रीमंत होऊ पाहतो.ही श्रीमंती श्रेष्ठ असते.💐
माणसाजवळ अति पैसा, संपत्ती प्रसिद्धी मिळायला लागल्यावर त्याची भूक वाढत जाते. माणुसकी विसरून मग ओरबाडनें सुरु होतं.तेथे स्वअस्तित्वाची कसोटी सुरु होते *अहंमं* जन्म घेतो.येंथूनचं अनैतिकतेच्या मार्गांवर चालणं सुरु होतं.पळणं सुरु होतं.धावणे सुरु होतं.कोण माझा? कोण परका?मी कुठे चाललो? सारं तत्व गुंढाळून व्यवहारीपणाचे संबंध सुरु होतात. मनुष्य अतिहव्यास, लोभात अडकतो.माणुसकी विसरून जगतो. अस्तित्व सकारात्मकतेकडून नाकारत्मकतेकडे वाटचाल सुरु राहते.अस्तित्वाच्या खाणाखुणा मागे राहतात.माणसाच्या चरित्रात्मक इतिहासाकडे लक्ष गेल्यावर कळतं ती व्यक्ती कशी होती.💐
परवा २५ जानेवारीला माझे साहित्यिक गुरुवर्य आदरणीय प्रा. उद्धव महाजन सरांचं अल्पशा आजाराने निधन झालं.*'निधन'* शब्द मनात उतरण्यास नकार देत होता.मन मानत नव्हतं.'निधन' झाले याचा अर्थ यापुढे पुन्हा कधीही भेट होणे नाही असं होतं!माघारी न येणे हा शास्वतं पक्का शिक्का होता.या कल्पनेने मन व्याकुळ होऊन तळमळू लागले होते.ज्यांच्याकडे आठवाडयातून हमखास जाने-येणं होतसें.ज्यांच्याशी मनाच घोळणाऱ्या अनेक समस्यांचं उत्तर मिळत असे असं निर्गवी व्यक्तिमत्व 'आता येणे नाही' असं सांगून निघून गेलं होतं. नेहमी त्यांच्या घरी गेल्यावर विशेष साहित्यिक गुरुमंत्र घेऊनचं आत्मानंदाने परत आपल्या घरी येत असे.असे आदरणीय व्यक्तिमत्व हरपले यावर विश्वास बसत नव्हता.
प्रा.उद्धवराव महाजन सरांशी आता कधीही भेट होणार नाही? ही कल्पनाचं हृदय मान्य करायला तयार नव्हती.मन मानायला तयार नव्हतं. डोळे अन मन अंधारात कोंडून ठेवल्यागत झालं होतं.अंधार कोठडीतून बाहेर पडण्यासाठी झटपटाव अशी माझी गत झाली होती.💐
कै.उद्धव महाजन सर स्वतःच्या आयुष्यात माणसं जोडत शब्द पेहरीत राहिले.शब्द उगवत राहिले.शब्द हसरी फुलं होऊन डोळस करीत राहिले.साहित्य दृष्टी देत रंजन करीत राहिले.सरांच्या साहित्यातून माणूसकीचा झरा स्वछंदी वाहतांना दिसतो. माणसं अन साहित्य हेचं त्यांचं विश्व होतं. ते ठळकपणे उठून दिसत.साहित्य प्रबोधन करीत असतं. कै. श्री. महाजन सरांचा स्वभाव बोलका अन अतिशय मवाळ होता. ते कधीही रागात दिसलें नाही.
कै.महाजन सर साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात जीव ओतून कार्यरत होते.हृदय ओतून त्यात एकजीव झाले होते.जगण्याचा खरा अर्थ अनुभवणारे निर्मळ व्यक्तिमत्व सर्वांवर अतोनात प्रेम करीत राहिले. ओलाव्याचे शब्द दान देत राहिले. शेवटी न बोलताही सर्व स्नेहीजनांना निर्वांनीच सांगून गेलेत,'पुन्हा येणे-जाणे नाही आता!' माणूस रत्नपारखी आपला देह या भुलोकी ठेवून पारलौकिक तत्वात एकजीव झालेत.विलीन झालेत.इतिहासाचं अमर पान लिहून गेलेत.आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अनेक पिढीपर्यंत साहित्यरूपात मागे ठेवून गेलेत.मागे सर्व स्नेहीजणांच्या डोळ्यात अश्रू ठेवून गेलेत.उद्या दिनांक ५फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचं उत्तर कार्य आहे. स्मृतीत शब्दाश्रू वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो 💐💐
💐💐💐💐🙏💐💐💐💐
*****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०४ फेब्रुवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment