निवडणूक खुर्चीनीं वार्गी

*निवडणूक खुर्चीनं वार्ग*
            (भाग-०२)
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
************************
... नानाभाऊ माळी

        राम राम मंडई!....🙏
निवडणूका वार्गींसंगे उडी ग्यात!वार्ग थमी गये!जिकणारा जिकी ग्यात.हारणारा हारी ग्यात.आते जिकणारा पदन्हागुंता व्हडा तानी करी ऱ्हायनात.पैसास्ना चुराडा व्हयी पाच वरीस्न हक्कान पद भेटी. निवडणूक गरीब दुब्यान्हा चार रोज पोटनी हामी व्हती.निवडणुका लोकमतन्हा निर्णय नेम्मन पट्टावर चालनारी लोकशाही ऱ्हास.भरोसा ऱ्हास.सरकार,आनी बट्ठया स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीन्हा पत्तावर पयेत ऱ्हातीस.कव्हयं मव्हयं पत्ता भेटत नही.लोके झामली तठे पोहचाना,हक्कानं ठिकानं धुंडत ऱ्हातंसं.मतदार पत्ता इचारत ऱ्हास. अवकाया करी तठे भिडस... पत्ता राजमहाले सापड्स.तठेचं मत *दान* न्हा खरा अर्थ मतदारन्हा खोल खोल जायेल नजरे पडस.लोकशाहीन्हा पत्ता बदली ऱ्हायना तें नही नां!!!!

             निवडणूक रस्तावरतून,पाय दुखाडी लोकशाहीन्ह घर भिडान्या आवकाया सेतीस.मतदार अन्नाडू, नासमज नही सें हायी पक्क सें.भूल पडी मतदान तें नही व्हस नां?लोकशाहीन्ह जुन्नाट झाड जित्त ऱ्हायीं जगालें जोईजे. चांगला गोड चिट्टीगं फये तयपावूतं भिडालें जोईजे. चखालें भेटाले जोईजे..*मन्हा मनन्हा बोल मांडी ऱ्हायनू*..... 🙏

             *मांगलां लेखना आपोरा सपोरा तुकडा आते मव्हरे चिटकायी ऱ्हायनू*.......'उमेदवारनां गोडंब्या सभावलें माया-बहीनीं साखरनां मायेक पघयी जातीस. कायेज उज्जी कच्च ऱ्हास हो त्यास्न!दया, माया, छाया, किव या बठ्ठा गूण लयी फिरणाऱ्या माया -बहिनी उमेदवारनां मत जिकानी टेक्निकलें भू भारी फसतीस.याले म्हंतंस मत जिकानां येडाचाया.पोटम्हा घुसी मत गुंढावानीं टेक्निक.माया बहीनींस्लें नेम्मन आपला सबदम्हा झुलाई-भुलायी खेय जिकानां ऱ्हास!उमेदवारनी हालकी वडाँग नेम्मन माया-बहिनी ऱ्हातीस!उमेदवार तें दखी कोल्ला मोल्ला धीरेजकरी वडाँगवर पाय दि दखतंस. मंग रंगतेभोम पाय दखाडी मतदारलें भुलाडी डोयांनां आसूं देखाडतं बठो. आसूंलें मतम्हा बेरजा करी टाकांना आन मत मांगी दखाना.माय माऊलीस्न कायेज भलतं कच्च ऱ्हास.जल्दी गह्यर दाटी येस.मंग दखो...एक दिनन्हा राजा-राण्या पाच वरीसपावूत निवडीयेलनां दारे  चपला घसत ऱ्हावो.🙏

            एक माऊली बोंबीलनं बट्ट करी ऱ्हायंती.ऱ्हायीं ऱ्हायीं बट्टान्हा वास घरमा सुटेल व्हता.उमेदवार वकू वकू करी ऱ्हायंता.पन मत लेवागुंता बठ्ठ सहेनं पडस हो..!दुसरी गल्लीम्हा तोंडावरनं घर डबुकडीस्न बट्ट उकयी ऱ्हायंतं.एकदम मगमगात वास सुटेल व्हता.उमेदवारलें काय वाटनं कायजून  घरम्हायीन खुशाल थाटी मांगी लिधी. चायटीघायी उकयतं बट्ट थाटीमां वती लिध.भांनंसीनवर ठेयेलं हुनीहुनी बाजरीनी भाकर उखली मोडी जेवाले बठी गयतां.ती माऊली इतली खुश व्हयनी का आपला गरीब दुब्यानां घर शिरीमंत उमेदवार उना बवा.त्या बहीननं मत पक्क व्हयी गयथ.हायी कायेजलें भिडनांरी गोट तरकीबनां हिस्सा ऱ्हास.उमेदवार आशा ऱ्हातसं.

          एक गल्लीम्हा,पार अडचिनन्ह घर एक शानी सुरती मावली ते निट्टज बोली पडनी व्हती,'काय रे भो!पाच वरीसम्हा आते घर दिखनं का तुले? आज दिन कता उगनारें भो?' भाऊ माऊलींगंम दखत ऱ्हायना.त्यानं तोंड पुर्र उतरी गयेतं.तोंड मिटी हुभा व्हता. कोल्ल-मोल्ल उस्न हासनं तोंडंवर व्हतं.गालवर मारी हासी लावो तसं. त्याले उडती माखी चायी गयी जशी काय!व्हटम्हा दात व्हतात.तोंडावर गाल चिटकेल व्हतात.तद्दम लब्बाड हासनं व्हतं.

           गंजज उमेदवार एक एक मत गुंता, मतदार राजालें भुलाडागुंता बीन चप्पलनां भवडी ऱ्हायंतात.दारेदार कंबर वाकाडी पाय पडी ऱ्हायंतात. काही उमेदवार ते आशा व्हतात... एक दिनन्हा मतदार राजा कता काने कोपरे ऱ्हास त्यास्न घर भी दखेल नयी व्हनार.पन कार्यकर्तामांगे मांगे चाली नीट्टचं भानसीन पावूत भिडी ऱ्हायंतात.गल्लीनां मझारम्हायीन गटारनां वास सुंगी ऱ्हायंतात.वासम्हा नाक धरी तोंड वाकडं करानीं भी चोरी व्हती.मोबाईलवाला पटकन फोटो टीपी लेतात.एक दिनन्हा राजानां घराम्हा घुसी बोंबीलनां वासभी सुंगी ऱ्हायंतात.एखादानां घरम्हा खकानां सुटेल ऱ्हाये.खोकली खोकली चुलांजोडे भिडी ऱ्हायंतात.एखादी माऊली भाकर ऱ्हाधिं ऱ्हायंती.कोन श्याकम्हा चायटी फिरायी ऱ्हायंती. उमेदवार चायटी हातम्हा धरी बोघानाम्हा फिरायी ऱ्हायंतात.पीठमां पानी टाकी हातघायी पीठ रगडी 
ऱ्हायंतात.आखों दुन्याना हुशार उमेदवार ते पीठनां गोया हिस्कायी भाकरी रांधालें बठी ऱ्हायंतात.कोनी ते श्याकगुंता बोघनांम्हा तेल टाकी कांदा,मिर्चीनीं फोन्नी देवालें बठी ऱ्हायंतात.खाकानां सुटी ऱ्हायंता खोकली ऱ्हायंतात.पन मन आनी मत जिकनं व्हतं.व्हटम्हा दात व्हतात. कायनी हो भलता हुशार ऱ्हातसं हो. त्यांनी कंबर वाकाडी माऊलीनां पायवर डोकं ठेवं.मनम्हा न मनम्हा धल्लीलें गाया दिध्या व्हतीन.तरिभी पाय पडी लिदा.पाय पडेल दखी मावलीना संताप थंडा व्हयी गयतां. माय माऊलीनां डोयाम्हा हुना हुना आसूं यीं लागातं.तिन्ही उमेदवारलें कायेजथून आशीर्वाद दिनंथात. 
पानीम्हा साखर टाकी का पघयी  जास.माऊलीलें जिकानी शक्कलं व्हती!याले म्हंतंस पक्का गुरुनां पक्का चेला. 🙏🌹

                          निवडणूक व्हयी गयी.बासिंग भांदेलंस्नी बासिंग उतारी ठेवं. जिकणारां जिकी ग्यात.गुलाल उधयी उधयी गुलाल्या व्हयी ग्यात. हारी ग्यात त्या गह्यरा दुःखम्हा सेतस. डोकावर कितलं कर्ज व्हयनं त्या हिसेंबना चक्करम्हा सेतंस!लेन देननं व्हझ निक्खारं जड ऱ्हास.हारी ग्यात त्या गह्यरा दुःखम्हा सेतस.सप्पन आनी पैसा लायेल दोन्ही व्हायीं ग्यात. पानीम्हा सप्पन व्हायी गये.डोकावर कर्ज व्हयनं.त्या हिसोबनां चक्करम्हा सेतंस.पैसावाला तगादा लायि ऱ्हायनात.सावकारनां वावर-घरवर डोया सेंतसं.बाबा भी ग्या.दशमी भी गयी. दोन्ही हातथिंन चालनं गें. राजकारणन्ही नशा उज्जी बेक्कार ऱ्हास.काही भुईसफाट व्हयी उलगी ग्यात ते काही जिकी ग्यात त्या उज्जी मव्हरे चालना ग्यात. वडिलोपार्जित घरे-वावरे इकी निवडणूकनीं खर्ची भागाडानं चालू सें.निवडणूकनी खुमखूमी मिटाडी हात चोयत बसनात.खुर्चीनी नशा मानोसलें कथी भी नाचाडस... सत्ता सोता शिरीमंत व्हवानी किल्ली व्हवालें नको. जनतान्ही किल्ली समायंनांरा खराखती जागल्या ऱ्हायी तव्हयं विकासन्ही गंगाम्हा जनता आंग धोयी!लोकशाही हासत ऱ्हायी. आते मव्हरे Z P न्या निवडणुका सेतीस. मतदार राजा डोया हुगाडी मतदान करा भाऊ बहिनीस्वन!
🌹🙏🌹💐🙏🌹🙏🙏🌹
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -२५ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol