निवडणूक खुर्चीनं वार्ग

🌹*निवडणूक खुर्चीनं वार्ग* 🌹
💐💐💐💐💐💐💐💐
            (*भाग-०१*)
*****************************
... नानाभाऊ माळी

         राम राम मंडई!.... मांगला तीन चार महिनाफाइन कान ठनंठनं ठंनंकी ऱ्हायंतात.जथ तथ निवडनुकनं वारं व्हतं. खुर्चीनीं लह्यरं सुटेल व्हती का वार्गी व्हती पन भलतं जोरमां सुटn व्हतं.कोनले पुरं भुईसपाट करी गें. कोनले तारी गें.पहिले वार्ग व्हायी ऱ्हायंत.नगरपंचायत,नगरपालिका, महानगरपालिकान्या निवडणुका व्हत्यात.हारऐकले नगरसेवक व्हवानं सप्पन पडेल व्हतं.गंजज भाऊ बहिनीस्नी म्हने गणपती पानिम्हा टाकेल व्हतात.देवनी कृपादृष्टी ऱ्हावो म्हनीस्नी गंजज शप्पता लेहेले व्हत्यात.सत्तानीं किल्ली आपला जोगे येवागुंता व्हडातांनी चाली ऱ्हायंती!निवडणूकम्हा हुभा ऱ्हायेल भाऊ-बहिनीस्नी बॅनर, गाना, पत्रके घरेंघर जायीस्नी एक दिनन्हा राजालें भेटागुंता परचार फेरीनीं धामधूम करी व्हती.त्या कायम्हा सोता उमेदवारस्लें खाव्हा पेवानी सुद नही व्हती हो!रात दिन निस्ती दूध बंन्नीमांयेक पैसास्नी खर्ची चालू व्हती.पैसा ते पानी व्हयी व्हायी ऱ्हायंता.आथा तथा झिरपी ऱ्हायंता.लोंढा व्हयी व्हायी ऱ्हायंता!कार्यकर्ता राबी ऱ्हायंतात!रात दिन भवडी ऱ्हायंतात!संविधाननीं देयेल मतदाननां हक्क बजाडासाठे रावनायी करी ऱ्हायंतात.🌹

आपलं *मत* कितलं महत्वान ऱ्हास दखा  नां!!खरं खरं दुन्यान्ह काम करनारा नेतालें निवडी देवागुंता रंगतनं पानी करनारा कार्यकर्ता रहातंस.पन आते तंतर बदली जायेल सें.कायेज फाटी जास, दुःखन्ह खड्ड पडी जास!मतदार राजा भी कोनले निवाडो हायी सुधबूद इसरी जायेल सेतस!🌹

              गंजज उमेदवार एक एक मत लेवांसाठे मतदार राजालें भुलाडी ऱ्हायंतात!लोकेस्ना नजरम्हा येवागुंता बीन चप्पलनां भवडी ऱ्हायंतात. टायनीलें व्हयेलं जखम तद्दन येडी मत्थीकरी दखाडी ऱ्हायंतात.दारेदार कंबर वाकाडी पाय पडी ऱ्हायंतात. देर रात घरमा जायीस्नी हुनहून पानीवती आंग शेकी ऱ्हायंतात.पाच वरीस राज्य करागुंता दहा पंधरा दिन पायनं कातडं झिजांडी ऱ्हायंतात. गंजज उमेदवार ते आशा व्हतात, का *एक दिनन्हा मतदार राजा* कोठे काने कोपरे ऱ्हास?त्यास्न घर भी दखेल नयी व्हनार.बापनी दखेल व्हयी पन पोऱ्या शिरीमंतनां आंडोर निवडणूकम्हा हुभा त्याले काय माहीत.तो कार्यकर्तामांगे चाली चाली थकी ऱ्हायंता.नीट्टचं भानसीन पावूत भिडी ऱ्हायंता.माज गल्लीनां व्हाती गटारनां वास सुंगी ऱ्हायंता चाली-भवडी ऱ्हायंता.मत जिकनं व्हतं ना!!काय करी भाऊ? त्या गटारन्हा वासम्हा नाक-तोंड वाकडं करानीं भी चोरी व्हती.मोबाईलवाला पटकन फोटो टीपी लेतात नि आखों मीडिया समोर बदनामी व्हयी जाती! *एक दिनन्हा राजानां* घरम्हा घुसी बोंबीलनां भुंजेलं वासभी सुंगी ऱ्हायंतात.सुंगानीं आदत नही व्हनार पन पोक्कय हास्सीस्नी मते उपाडनां व्हतात.काही उमेदवार तें एखादानां घरम्हा खुडमिर्चीनं पानिना खकानां सुटेल ऱ्हाये.तरिभी खोकली खोकली चुलांजोडे भिडी जायेत.घरमा एखादी माऊली भाकर ऱ्हाधिं ऱ्हायें.कोन श्याकम्हा चायटी फिरायी ऱ्हायेंतं. उमेदवार ती चायटी व्हडी सोता हातम्हा धरी बोघानाम्हा फिरायी ऱ्हायंतात.पीठमां पानी टाकी हातघायी पीठ रगडी मुसडी नेम्मन पिठना गोया करी ऱ्हायंतात.आखों काही दुन्याना हुशार उमेदवार ते पीठनां गोया हिस्कायी भाकरी रांधालें बठी ऱ्हायंतात.कोनी ते श्याकगुंता बोघनांम्हा तेल टाकी कांदा,मिर्चीनीं फोन्नी देवालें बठी ऱ्हायंतात.खाकानां सुटी ऱ्हायंता खोकली ऱ्हायंतात.*पन मन आनी मत जिकनं व्हतं. *खुर्चीनं वार्ग भलतं टुक्कार ऱ्हास.कथ भी व्हास.खुर्चीनंभवते गुर्मयी खुर्ची हालावत ऱ्हास.पाय व्हडत ऱ्हास.
  (आपोरं ऱ्हायेल क्रमश: भाग-२ म्हा दखूत)
🌹🌹💐💐💐💐🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol