कविता मना मनात रुजत गेली
*कविता मनामनातं रुजत गेल्या*
(कविसंमेलन,पनवेल,जि.रायगड)
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
*****************************
...नानाभाऊ माळी
कोकण म्हटलं सृष्टी सौंदर्याची खान दिसते.हिरवाईचा अनोखा अविष्कार
मनाला उत्साह भरत असतो. हिवाळ्यात ऊबदार पण थोडं दमट ही वातावरण असतं. अशा कोकणातील पनवेल सारख्या ठिकाणी प्रसिद्ध कवी नागनाथजी डोलारे सरांनी आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावले होते.प्रेमळ आग्रहामुळे जाणं भाग होत.कोकण भूमीत मन रमून गेलं होतं!तेथील अनुभव डोळस करून गेलेत.त्याविषयी खूप काही 🙏.......
......काही प्रसंग,घटना अशा असतात की त्याचा आघात त्वरित होतो.मानसिक होतो.शारीरिक होतो.त्याचा थेट संबंध मनात सुप्तपणे कार्यरत असलेल्या संवेदनेशी येतो.मनुष्य संवेदनशील असल्यामुळे त्याच्या मनावर एखाद्या घटनेचा खोलवर परिणाम होतो. घटना आकस्मिक घडून जाते.कधी नियोजित घटत असते.काही व्यक्तींवर त्याचा परिणाम जलद गतीने होतो.व्यक्ती कधी वेदनेने तळमळते,हळहळते तर कधी दुःखी होते.कधी हर्ष होतो.घटनेची प्रतिक्रिया तात्काळ येते.संवेदना जागृत असणाऱ्या व्यक्तींच्या मनावर त्याचा दुरगामी परिणाम होत असतो.
लेखक,कविंच्या भावना अत्यंत संवेदनशील असतात.त्यांच्या प्रतिक्रियेचा उमाळा मुखातून, शब्दातून व्यक्त होत असतो.विषय अंतःकरणातून उसळी घेत असतो!मनात विचारांच्या प्रचंड उंच लाटा उसळी घेऊ लागतात. दबलेल्या भावनांची प्रचंड लाट काठावर आदळू लागते.शब्द जन्म घेऊ लागतात. भावनेचा बंदिस्त उमाळा शब्दात उतरू लागतो.तिलाचं *कविता* म्हणतात.कधी *कथाही* म्हणतात.व्यक्तीच्या मनात आंतरिक द्वंद्वं उफाळून येत असतं.कवी-लेखक त्या घटनेचां साक्षीदार होऊन जिवंत शब्दांचं धुमसत सत्य समोर ठेवत असतात.आंतरिक उफाळून आलेल्या संवेदनशील भावनांना शब्दरूप दिल्यावर कवितेचां आत्मा शब्द *स्फ़ोट* होतो.
कविता कल्पना अन घटनांचं विस्तारित प्रतिबिंबरूप असतं. प्राचीन काळापासून सामाजिक दरी वाढत गेली.त्यात धार्मिक अन जातीयवादी समस्या मूळ होत्या अन आहेत देखील.शोषक वर्ग शोषितांच्या मानगुटीवर बसून शोषण करीत राहिला.जसा सुप्त, तप्त लव्हारस पृथ्वी गर्भातून उफाळून वर यावा तसा शोषितांचा प्रचंड यातनानीं दबलेला आवाज एकमुखी आला होता.एकत्र येऊन न्याय हक्क मागू लागला होता. 'मानवाने मानवासारखे जगू देण्याची' हक्काची मागणी करू लागला होता. जातीयेतेच्या प्रचंड जोखंडात आवळलेलें एक होऊन मानगुटीवरील जोखंड प्रचंड ताकदीने फेकून दिले होते.त्यात पिडा होती, दुःख होतं. यातना होत्या.'माणसानें मानसासारखे' जगू देण्याची हक्काची मागणी केली होती.पृथ्वीतून लालभडक तप्त लाव्हारस आतून गुदमरून उफाळून वर यावा तशी पिडीत,शोषित,अत्याचारग्रस्त शूद्रादिशूद्र यांनी सामानतेचा आवाज बुलंद केला होता.भारतभर एकत्र येऊन धार्मिक दंभाचार विरुद्ध ठाम उभे राहिले *तिथे वास्तव, दाहक कविता जन्माला आली होती!*
विस्तवावर चालणाऱ्या,अखंड चटके सहन करणाऱ्यांचा विस्फोट कवितेतून जिवंत होत आहेत.छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,माय रमाई यांच्या जीवन संघर्षाची कहाणी ज्वलंत कविता आहेत.....१८ जानेवारी २०२६ रोजी पनवेल येथे कोकण मराठी साहित्य परिषद अन पंचशील तरुण मंडळ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध साहित्यिक, कवी नागनाथ डोलारे सर यांच्या *मानवतेचे सिंहासन अन लावण्य लेणी* या दोन पुस्तकांचे प्रकाशन,साहित्यिक पुरस्कार अन कवी संमेलन आयोजित केलें होते.मानवतेचे सिंहासन मधून कवी नागनाथ डोलारे सरांच्या कवितेतून पदोपदी संघर्ष दिसून येतो. जाती संघर्षाची तीव्र वेदना त्यांच्या कवितेतून दिसून येते.तर लावण्य लेणीतून,चारोळीसंग्रहातून प्रेमाचीं उत्तम सांगड घातलेली आहे.
साहित्यिक पुरस्कार प्रदान करतांना कवी नागनाथ डोलारे सरांच्या चेहऱ्यावर विशेष कृतज्ञता भाव प्रकट झालेले दिसत होते. आम्हाला देखील राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारतांना आदर्श जीवन मूल्यांच दर्शन होतांना दिसत होतं.जगण्याचा अर्थ त्या पुरस्कारात दडलेला दिसला.आदर्श मूल्य डोळ्यासमोरून तरळून जात होती.पुरस्कार स्वीकारतांना राज्यघटनेचे शिल्पकार दिसत होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज दिसत होते.सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले दिसत होते. मानवतेचे पूजारी दिसत होते.मनुष्यधर्म पाळणे हाचं खरा धर्म दिसत होता.आदरणीय डोलारे सर परोपकारावर विश्वास ठेवणारे खरे विचारवंत असल्याने समोर आदर्श ठेवून आमच्या हृदयात जाऊन बसले. थोर विचारवंत श्री.शिवदास महाजन सरांच्या सामाजिक दायित्वाची ही ओळख होती.
पुरस्कार सोहळ्यानंतर कविसंमेलनातून जीवन दृष्टी देणाऱ्या अनेक कवितांनी प्रत्येक रसिक अन कविमनाच्या हृदयावर राज्य करीत राहिल्या.कविता शोषितांचा हुंकार बनून हिंडत राहिली.अंतरात्म्याला भिडत राहिली.कवी आपल्या अपत्याकडून जातीव्यवस्थेवर प्रहार करीत राहिले.मानवतेच्या पुजारीची हाक देत राहिले.कविता समरसता, सद्भाव, समानता, शिक्षण, संविधान या तत्वानां आपल्या कुशीत घेऊन हिंडत राहिली.कविता असमानतेच्या बिजाला शोधत राहिली. माणसाला मिळालेला हक्क, अधिकार यावर वास्तव भाष्य करीत राहिली. विषमतेवर प्रहार करीत राहिली. कवी दाहकतेच वास्तव दर्शन घडवून नव्या दमाच्या कविता सादर करून होत राहिल्या.संमेलनास उपस्थित रसिकजनांना डोळस करीत राहिल्या. कविता डोळे, कान अन अंतरात्म्यात घुसत राहिली.नजर देत राहिली. समाजाच्या उन्नतीसाठी शब्द कवितेतून वाहात राहिले.पनवेलच्या या अनोख्या काव्य संमेलनातून ज्ञान घेत सर्वचं उपस्थितांनी उगवणाऱ्या उद्याच्या नव्या सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे!समतेची, सद्भावाची, समरसतेची, नैसर्गिक मिळालेल्या हक्कांची, संविधानाने दिलेल्या अधिकाराचीं वाटचाल सुरु झाली आहे!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक -२१ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment