मित्र असावा असा

*मित्र असावा असा*
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी

             काही 'नाते' चालता बोलता, सहज-सहज, नैसर्गिक जुळून येतात! मिळून एकजीव होतात!घट्ट होतात.आपल्या जीवनात त्या नात्याला अतिशय महत्व प्राप्त होतं. ' *ते नातं असतं मैत्रीचं*!मैत्री जीवा भावाची असते.बऱ्याचवेळेस मित्र भावापेक्षा उजवा वाटतो,जवळचा वाटतो.सुख-दुःख,चढ-उतार प्रसंगी मदतीला आधी धावून जातो *तो खरा मित्र असतो* ! नेहमी हृदयातून सांगावें असं हक्काचं नातं मित्राचं असतं.घट्ट मैत्रीला *लांघोटी यार* म्हणतात.हृदयातून जन्म घेतं ते रक्तापेक्षा जवळचं असतं.प्राचीन काळी महाभारतातील.... *कृष्ण-सुदामा* यांची मैत्री अवघ्या विश्वात प्रसिद्ध आहे.मैत्रीत गरीब-श्रीमंत भेदभाव नसतोच मुळी. बेंबीच्या देठातून,मुळापासून जुळलेले पवित्र नातं अनेक कसोट्या पार करीत घट्ट होत जातं.मित्र कुणाला म्हणावा मग? मित्राच्या कुठल्याही कठीण,अतिप्रसंगी धावून जातो तो *खरा मित्र असतो*! 

            मैत्रीचां धागा एकमेकांविषयी असलेला अस्सल *विश्वास* असतो. निर्मळ,स्वच्छ मन विश्वास दृढ करीत असतो.आदरभाव घट्ट करीत असतो. हाचं मैत्रीचा धागा आयुष्यभर साथ संगत करीत असतो.मैत्री जगत विस्तारत असते.मित्रासाठी अनेक मोहांचा, प्रलोभनांचां त्याग करावा लागतो. त्यागात निखळ झरा खळखळतं वाहात असतो.खरी जीवाभावाची मैत्री आयुष्याचा सेतू होऊन जातो.हा विश्वासाचा सेतू दोघांच्याही आयुष्यात देह निरोपापर्यंत टिकून राहते.मैत्रीतं श्रद्धा अर्पित झालेली असते.श्रद्धा चौफेर संचार करीत राहते.

                माझ्या आयुष्यात मित्रांचा अथांग सागर भेटला.त्याच्यात डुबकी मारत आलो. त्या विश्वास सागरातून २-३% उंच उंच लाटांसोबत बाहेर फेकले गेले असतील.शिल्लक ९७% मित्र  हृदयात जाऊन बसले,घर करून बसले आहेत.मी निर्मळ, स्वच्छ, पवित्र मनाने,श्रद्धेनें विश्वास ठेवून जगणारा माणूस.अपेक्षित मित्र भेटत गेले. ऋणानुबंध वृद्धिंगत होत गेलेत. पवित्र, निष्कलंक भावभावनांचे ओलसर नाते जुळत गेले.नाते कमळाच्यां पाकळ्यांसारखे उमलत,फुलत गेले.मैत्री वैकुंठस्वरूप होऊन गेली.मैत्री अनेक कसोट्या उत्तीर्ण करीत वाटचाल करीत असते.निर्व्व्याज्य भाव,आतून जन्म घेतात.मी देखील खूप भाग्यवान आहे.जिवाभावाचे मित्र सोबतीला आहेत.विश्वास, निखळ,हृदयनिकट मैत्रीचा धागा जुळत गेला अन निसंकोचपणे मैत्री फुलत गेली,वाढत गेली.

                    अनेक मित्रांपैकी असाच एक मित्र दूर गुजरातमध्ये व्यवसायानिमित्त स्थिरस्थावर झाला आहे.नवसारीमध्ये ज्वेलर्स शॉप्स आहेत. स्वतः साहित्यिक आहेत.योगाभ्यास करून प्रचार-प्रसार करीत आहे.*योगा* म्हणजे आरोग्य रक्षक गुरु असतो. माझ्या व्यावसायिक मित्राने व्यवसाय मुलांच्या स्वाधीन करून दिला.योग्य वयात योग्य निर्णय घेणारे हे मित्र आपलं आरोग्य सांभाळून *नावीन्यपूर्ण कविता पेहरीत साहित्य क्षेत्राला नवी नजर देत आहे.* *श्री. संजय सोनार* हे मूळ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका ठिकाणचे माझे बालमित्र पुण्यातले कविराज अन सत्यशोधकी विचारवंत श्री.विजय वढवेराव यांनी आयोजित केलेल्या भिडेवाडा काव्य संमेलनासाठी आले होते.दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी पुण्यातल्या एस.एम.जोशी फौंडेशन येथे भरलेल्या या भव्यदिव्य काव्य संमेलनात कवी संजय सोनार सरांची कविता रसिक जणांच्या हृदयावर वेगळा ठसा उमटवून गेली.

               कवी संजय सोनार माझा बालमित्र पण कवी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, गुजरातमध्ये नावलौकिक मिळवलेला पाहून मनापासून आनंद आणि अभिमान देखील वाटला. मित्र असा असावा ज्याच्यामुळे आपली देखील ओळख व्हावी.*संजय सोनार* आतून बाहेरून अस्सल सोनं आहे. २४ कॅरेट शुद्ध मैत्रीचं नाणं आहे. असा मित्र लाभणं हे भाग्य असावं माझं. कविता अन साहित्यावर भरभरून बोलणारा हा मित्र व्यावसायिक कसा असा प्रश्न पडला होता.*व्यवसाय सांभाळणारा नेहमी नफा-तोटा डोळ्यासमोर ठेवून व्यवसायात रममान असतो. नफा-तोटा कवितेत चालत नसावा. कवितेत भावना ओतावी लागते तेव्हा तिला भाव येतो. संजय कवितेत भाव खाऊन गेला* उत्तमोत्तम रचना लिहून कवितारूपी अपत्य सादर करणारा संजय दृष्टी देणारा महाभारतातील संजय तर नाही नां!!मित्र घरी आला!मला अनेक रचना ऐकवून गेला.त्यांच्या *रातराणीच्या कळ्या* तून डोळ्यात अश्रू ठेवून गेला.कविता कशी असावी मूर्तिमंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवून गेला.जाताजाता माझं हृदय घेऊन गेला.*मित्र असा असावा जो भावनेला चकाकी देणारा असावा. प्रकाश देणारा असावा. डोळस करणारा असावा.संजय डोळ्यांना नजर देऊन गेला.*
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक - ०९ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol