एका कर्मयोगीचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळा
*एका कर्मयोगींचा ७५वा अभिष्टचिंतन सोहळा*
💐💐🌹🎂🌹💐💐
***********************
...नानाभाऊ माळी
आपण जन्माने पहिला श्वास घेत असतो.या भुतलावर सजीवांचा जन्म होत असतो, विलय होत असतो. निर्जीव चिरकाल टिकून राहतात. जन्म घेऊन सजीवांची निर्मिती होत असते.निर्मिती अस्तित्व दाखवत असतं.या भुवर,सृष्टीतील प्राणी अन वनस्पती सजीव आहेत.जन्म निसर्गाने दिलेले दान असतं.मनुष्य जन्म हे देखील भाग्याने मिळालेलं दान आहे.म्हणजे आपण दान आहोतं.दान हळूहळू वाढत असतं. जन्माने वय वाढत असतं.वाढत्या वयाबरोबर माणसाला समज येत जाते.मनुष्य जन्माचा वारसा चालत असतो. कोण अतिशय गरिबीत जन्म घेतो तर दुसरा एखादा ऐश्वर्यातं जन्म घेतो.कोणी जन्माने भुकबळी असतो तर दुसरा सोनेरी चमचा घेऊन जन्म घेत असतो.अशाचं एका कर्मवीरांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा ०१जानेवारी २०२६ रोजी साजरा झाला.
जन्मानें अत्यंत गरिबीतून!दोन वेळा पोटाला घास मिळण्याची देखील ऐपत नव्हती.शिक्षण सुद्धा कुठेतरी अर्धवेळ शेतात, धरणावर (भाऊ -बहिणीसह) कामं करून ११ वी इंटर आर्टस् पास झालेले,शिक्षण पूर्ण केलेलं.गवंड्याच्या हाताखाली काम करीत असतांना नोकरी निमित्त पुण्यात आले सुरुवातीला छोट्याशा नोकरींतून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला होता.स्वप्न जिद्दीचं होतं. विवाहसाठी स्थळ आले होते.ते देखील ११ वी पास असलेलं. जेणेकरून दोघे नोकरी करून संसाराचा गाडा उत्तम हाकता येईल. भाग्य घेऊन आलेल्या त्यांच्या सौभाग्यवती होत्या.उभंयता पती- पत्नी माणुसकी जगण्याचं स्वप्न पाहणारी होती.भाग्य कसं असतं पहा ना कर्मवीरांच्यां सौभाग्यवतींनीं असलेली छोटीशी नोकरी सोडली अन राहत्या भाड्याच्या घरात गल्लीतील लहान लहान मुलं एकत्र आणून बालवाडी सुरु केली.अन यजमानांनां देखील टाटा मोटर्स सारख्या विश्व प्रसिद्ध कंपनीतं नोकरी लागली.
स्वप्न पाहणे,समन्वय,कामावर अत्यंत प्रेम, जिद्द,चिकाटीच्या जोरावर उभंयता पती-पत्नी कष्टास ईश्वर समजून वाटचाल करू लागले होते.'ते' टाटा मोटर्समध्ये नोकरी करून शाळेची सरकारशी संबंधित बाहेरची कामं करीत होते.मान्यता,ग्रँटं अशी कामं फावल्या वेळात करून कंपनीतं ड्युटीसाठी पळत होते तर 'त्यां' बालवाडी, प्राथमिक शाळेतील संपूर्ण नियोजन सांभाळीत होत्या. पाहात पाहात 'ते दोघे' या ज्ञानदान यज्ञात इतके एकरूप, एकजीव झाले की तेचं त्यांचं जीवन बनून गेलं होतं. लावलेलं रोपटे नंतर मोठ होऊन विस्तारू लागलं होतं.दोघांचें अफाट कष्ट पवित्र कार्य होऊन गेलं होतं. शिक्षण जगातला सर्वात श्रेष्ठ अन पवित्र सेवा समजली जाते.🌹
कामावर निस्सीम भक्ती होती. कर्म पूजा समजून कार्यरत असणारं हे कुटुंबाने, लावलेल्या वृक्षाचं रूपांतर विशाल वटवृक्षातं होऊ लागलं होतं. विविध ठिकांनी ज्ञान शाखांचा विस्तार होऊ लागला होता.विध्यार्थी संख्या वाढत होती.आदर्श, अभ्यासू शिक्षकवृंद उद्याचे नागरिक घडवत होते.दाता वंदनीय असतात.त्यांचं शिकवणं हेचं व्रत असतं. 'ज्ञानियांच्या संगे अज्ञान दूर पळे'असे शिक्षक सोबतीला असल्याने शाळेचा निकाल पुण्यातल्या उत्तम निकाल देणाऱ्या शाळांमध्ये होऊ लागला होता.
झपाटलेपण काय असतं बरं? शून्यातून प्रगतीचा आलेख वाढता होता. *ज्ञानयोगी*' अन *ज्ञान ज्योतीचा*' अखंड ज्ञानहोम सुरु होता. ज्ञानशाखांचा विस्तार होतांना समाजसेवेचं व्रत दृष्टी देत होतं.स्वप्न साकार करण्यासाठी त्याग अतिशय महत्वाचां असतो.उभयता महान त्याग मूर्तिनीं कित्येक विध्यार्थी, पालकांच्यां जीवनात प्रकाश देण्यासाठीचं जन्म घेतला असावा.या प्रवासात कष्टाचा श्वास घेत वाटचाल करणाऱ्या या विशाल हृदयी महान द्वयींचं व्रतस्त जगणं आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे.*"ते आणि त्यां"* केवळ आदर्शच नाहीत तर पावलोपावली त्यां दोघांनी ठेवलेल्या पावलांची धूळ मस्तकी लावून कृतज्ञता भाव प्रकट करण्यासारखे आहे.त्यांचं ऋण केवळ व्यक्तिगत राहात नाही तर सार्वजनिक होऊन कृतकृत्य झाल्याचीं तृप्ती आहे. आकाशाहून मोठे उपकार आहेत.*ते अन त्यां एकरूप नाणे झाल्या आहेत* हे महान कर्मयोगी अन थोर समाजसेविका म्हणजेचं पुण्यातल्या हडपसर येथील *महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक कै. सौ.शैलाताई रतन माळी अन श्री. रतन नथू माळी सर* 💐
खान्देशांतील अतिशय ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या महानगरात सन १९८४ साली ससाणेनगर येथे लावलेल्या बालवाडीच्या *पहिल्या ज्योतीपासून सुरुवात केली होती*. पाहता ज्ञानविस्तार वाढत गेला.आज रोजी पुण्यातील ११ विविध ठिकाणी बालवाडी ते १० वी पर्यंत *मराठी -इंग्लिश मेडीयम शाळा* असून ससाणेनगर, हडपसर या मुख्य शाखेत १२ वी अन डी.एड पर्यंत ज्ञानशाखा विस्तारलेल्या आहेत.
एक स्वप्न होतं ज्ञानसूर्य-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले अन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिलेल्या सात्विक अन पवित्र ज्ञानमार्गावर स्वतःस अर्पित कर्मयोगिनी समाजसेविका कै. सौ शैलाताई माळी अन कर्मयोगी आदरणीय श्री रतन माळी सर!यां विशाल कार्यात स्वतःस पूर्णतः वाहिलेल्या "मोठया बाईंनी"आपला देह ठेवला.संस्थेवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलां होता.दुःखाने झालेली प्रचंड मोठी हानी भरून निघत नसते.दुःख हृदयी ठेवून ज्ञानहोम थांबणारं कसा. ज्यांनी वसा घेतला होता त्यांच्यासाठी यज्ञ पुढे सुरु ठेवावाचं लागतो.छातीवर दगड ठेवून पुढे वाटचालीस लागणारे आदरणीय मोठे सर,विद्यमान अध्यक्षा मा. सौ. स्मिता रवींद्र वाघ मॅडम आणि सचिव प्राचार्य श्री. रविंद्र पोपटराव वाघ सरांनी मोठया बाईंच्या स्मृती सतत ज्ञानदानातून जिवंत ठेवल्या आहेत. संस्थेचें नाव नामांकित संस्था म्हणून गणली जात आहे.🌹
अनेक वर्षे मागे निघून गेलीत. आठवणी आहेत. याद आहे.. संस्थेत आयुष्याचें जोडीदार कर्मयोगी आदरणीय श्री. रतन माळी सरांचा दिनांक ०१ जानेवारी २०२६ रोजी अमृतहोत्सवी वाढदिवस, अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. विद्यमान अध्यक्षाच्यां, संस्थापकांच्या भावुक डोळ्यात अश्रू तरळत होते. आदरणीय मोठ्या सरांचा अमृतमहोत्सव साजरा होतांना आनंद होता.भावुक वातावरण देखील होतं.एका व्यक्तीची खुर्ची रिकामी होती.थांबणे नव्हतं.अनंत स्मृती सोबतीला घेऊन *त्यांचा वसा* चालवायचा म्हणून अध्यक्ष,संस्थापक स्वतःस संयमीत करीत अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात एकजीव झालेत.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुलें यांचें कृतिशील वारसदार कर्मवीर, ज्ञानसूर्य आदरणीय *श्री.रतन माळी सरांचा* अमृतमहोत्सव सोहळा अनंत आठवणींनां उजाळा देत गेला.
🌹🌹🌹७५🎂७५🌹🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८ जानेवारी २०२६
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment