या माझीया देशात नवं वर्ष शुभेच्छा

*या माझीया देशात नव वर्ष शुभेच्छा*
🌹🌹💐🙏💐🌹🌹
**********************
... नानाभाऊ माळी

    राजेशाहीचां सूर्य मावळत एकदाचा अस्त झाला अन भारतात इंग्रजांची राजसत्ता प्रस्थापित झाली. इंग्रज आले तशी इंग्रजी आचार, विचार, आस्था भारतीय जन माणसावर आपली पकड घट्ट करू लागले होते. इंग्रजी कॅलेंडर जानेवारी-डिसेंबर सुरु झाले होते. ज्यांचं राज्य त्यांचंचं चालणार, चलती त्यांचीचं असणार नां! इंग्रजानी त्यांचं 'तें तें पण' आणलेलं पद्धतशीरपणे खपवत राहिले.आपले भारतीय मन इंग्रजांच्या विकासगंगेत डुंबत राहिले. कधी बुडतही राहिले!आपण भारतीय उगवता सूर्य सोडून पश्चिमेचा मावळता सूर्य पाहात राहिलो.उगवत्या पूर्वसूर्याकडे पाठ फिरवून बसलो. मानसिक,आर्थिक गुलामगिरीत इंग्रजाळतं राहिलो.स्वत्व विसरून दीडशे वर्षांत अस्सलिखित इंग्रजी बोलू लागलो.कंगालपण घेत इंग्रजी पाश्चिमात्य आधुनिक साहित्य स्वीकारत.डोळस होत राहिलो. आपलं स्वदेशी मागे विसरत गेलो. व्हिजन येत गेली पण समज येत नव्हती.आम्ही मानसिक गुलामी स्वीकारली होती.🌹

          वर्षानुवर्षे पश्चात्य ज्ञानी होत असतांना 'आपलं तें देशी, स्वदेशी' मागे सोडून निघालो होतो. अजूनही तेचं होत आहे.भारतीय बौद्धिक संपदा प्रचंड असूनही आपला 'ब्रेन' परकीयांच्या विकासात हातभार लावीत आहेत.आपण कामविलेलं ज्ञान दुसऱ्यांच्या कामी येत आहे. आपण परदेशात जात असल्याचा मिथ्याभिमान बाळगून देशाच्या उन्नतीसाठी काय करीत आहोत?
 चुकून देशाभिमान मागे तर सोडत नाही आहोत ना?🌹

 इंग्रजी महिने आपल्या बेंबीच्या देठातून पाठ झालेले आहेत. गुडीपाडवा, बुद्धपौर्णिमा, अक्षयतृतीया, गुरुनानक जयंती, जैन विचारधारा कुठल्या कुठल्या महिन्यात येतात तें मात्र लक्षात राहात नाहीत.हळूहळू इंग्रजी शाळांनी देशीपण विसरत चाललो आहोत.पुढे तें विसरून जाऊ असं होत आहे. 'December end, January New Year' मात्र आपल्या मनात खोलवर इतके जाऊन रुतून बसले आहेत की त्याचा उल्लेख नाही झाला तर जीव गुदमरायला होतं.इंग्रज जाऊन कित्येक वर्ष झाली असतील. पाऊण शतक झालं आहे.आपले मराठी महिने ध्यानी राहात नाहीत. चैत्र.. वैशाख अजूनही पाठ होत नाहीत.असो  इंग्रजी अंगवळणी चिकटली आहे. ग्लोबलाईज झाली आहे.विसरणं शक्य नाही. 🌹

      परवाचं ०१ जानेवारी २०२६  नवंवर्ष धूमधडाक्यात साजरा झालं. ३१ डिसेंबरच्या पूर्वरात्रीला तर जीव इतका घायकुतीला आला होता की 'हे काही तास अजून कसे संपत नाहीयेत!' असा जीव गुदमरायला झालं होतं.३१डिसेंबरच्या रात्री १२ वाजता काट्यावर काटा चढला नि भक्कम पॅक बरणीत बंदिस्त खेकडे झाकण उघडल्याबरोबर बरणीच्या बाहेर उड्या मारून पळत सुटावे तसें मानवी खेकडे रात्रीचे बारा वाजता नवा स्वच्छ प्राणवायू मिळावा तसें झिगांट जागेवरचं हालत डुलत नाचत होते.एवढेच काय 'मागच्या वर्षी अंधाऱ्या कोठडीत पडलो होतो. सुटलो बुवा एकदाचा.' इंग्रजी नवं वर्षाचं स्वागत करायला.रात्रीचा ३१ डिसेंबर पुढे सरकत नव्हता. कित्येकांनी जगभरातलें समुद्र किणारे बुक करून ठेवले होते. त्यात गोवा आघाडीवर होता म्हणे.गोवा म्हटल्यावर आपण अंदाज लावू शकतो.🌹

०१ जानेवारीलां उगवता सूर्यदेव पूर्व दिशेला तांबूस लालिमा घेऊन उगवत होता.आईच्या गर्भातून बाळ जन्म घ्यावं अन आईला प्रसव वेदना व्हाव्यात तसं, तिचं-आईचं वेदनेतील सुख नवाजन्म घ्यावा असं असतं. तिचा नवा जन्म होत असतो.तशीच अवस्था पूर्व क्षितिजावर झाली असेल का?तांबूस लालिमा पसरलेल्या पूर्व क्षितिजावर एक एक सेकंदानीं सूर्यबाळ आपलं विशेष गोंडस रुपडं घेऊन उगवत होता.अस्तित्व घेऊन वरती येत होता. ०१जानेवारी २०२६ चां सूर्य उगवत होता.आदल्या दिवशी कोकण, गोवा, पार्ट्यात स्वतःसं हरवून-बुडवून बसलेल्या किती जणांनां उगवत्या नवसूर्याचं दर्शन झालं असेल बरं?सूर्यदेव सूर्यकिरणानी चटका देत उठवत असावा.तरीही सूर्यदेव विश्वाचा रखवाला आहे. तो सर्वांना एकाच तागड्यात मोजत असतो.तो कुणाची वाट थोडीचं बघत बसणार होता? तो ०१ जानेवारीला निघाला नेहमीप्रमाणे उगवला वेळेवर.आपल्या रथावर स्वार होऊन निघाला सुद्धा होता!'कोई किसी के लिए रुखता नही.ओ तो जीवनाधार हैं!प्रकाशपर्व!' थंडीलां पिटाळून आपला रथ घेऊन निघाला होता.३१ डिसेंबर काय किंवा ०१ जानेवारी काय काहीही फरक पडलेला नव्हता. 🌹

आम्ही नवं वर्षाला समुद्रकिणारी असूनही सकाळच्या उफाळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यापासून वंचित राहिलो.उगवत्या सोनेरी किरणांच्या महाप्रसादाचा पासून वंचित राहिलो. ३१ डिसेंबरला आदल्या दिवशी रात्री एक दिड पर्यंत जागे होतो.धुमशान करीत होतो.उगवता नवा सूर्य पहायला जाग तर आली पाहिजे ना!! सृष्टीचे आयुधे कधीही म्यान होत नसतात.सूर्य चंद्र निरंतर निरंतर मार्गक्रमण करीत असतात. तें त्यांच्या कार्यात व्यस्त असतात.आपलं हृदय देखील तसंच आहे. हृदय थांबलं की उभा देह थांबेल.जीवन कुणासाठी थांबत नसतं.देशी विचारांना पाठ दाखवून निघालो आहोत. इंग्रजी नवं वर्ष प्रचंड आनंद उत्साहाने साजरा केलं. तसं देशी होळी, गुडीपाडवा, बुद्धपौर्णिमा,पर्युषन पर्व देखील आठवणीतं ठेऊया.जानेवारी २०२६ नवं वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🌹
💐💐💐💐🌹🌹🌹🌹
***************************
... नानाभाऊ माळी 
हडपसर, पुणे -४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०३ जानेवारी २०२६ 
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol