चला जाऊया गडकिल्ल्यांवर (दगड रचत राहिले, किल्ले ढासळतं राहिले 🚩🚩

चला जाऊया गड किल्ल्यांवर
(दगडं रचत राहिले,किल्ले ढासळतं राहिलें)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी

             प्राचीन काळापासून 'स्व' अस्तित्वासाठी लढणारा माणूस, बुद्धीच्या जोरावर हिंस्र प्राण्यांशी लढून जिंकत राहिला!त्यांना नियंत्रित करीत राहिला!ताब्यात घेत राहिला,जेरबंद करीत राहिला!पशु जिंकून,त्यांची भीती वाटेनाशी झाली!माणसाचा शत्रू कोण होता मग?शह-काटशहाच्यां लढाईत माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू झाला असावा!माणसाला माणसांचीच भीती वाटू लागली असेल!माणूस पशु पेक्षाही हिंसक, आक्रमक वाटू लागला असेल!माणूस माणसापासून असुरक्षित समजू लागला असेल!प्राण्यांच्या झुंडीवर विजय मिळवणारा माणूस, नंतर माणसांच्या झूडींचं नेतृत्व करू लागला होता!

     माणसांच्या भिन्न झुंडी आपापसात लढू-भांडू लागल्या असतील!अति ताकदवर जिंकला असेल!तोचं   झुंडीचां प्रमुख झाला असावा!अनेक झुंडींवर विजय मिळवणारा अतिशूर-क्रूर, शक्तिशाली व्यक्ती त्या झुंडीचां, समूहाचा प्रमुख झाला असावा!स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षेची हमी दिली असेल! वेगवेगळ्या झुंडी आपापलं अस्तित्व जपण्यासाठी लढले असतील!रक्तपात झाला असेल!हल्ले प्रतिहल्ले करून सर्वात ताकदवर त्या क्षेत्राचा प्रमुख दावेदार बनला असेल!प्रचंड जंगलं, त्यात उंच डोंगर, पहाड,दऱ्या खोऱ्यात रहाता रहाता पुढे नागरीकरण होत गेलं असेल!असा सिव्हिलाईजड माणूस शक्ती, युक्ती, बुद्धीच्या जोरावर दहशत,भीतीच्या जोरावर वर्चस्ववादाचा जन्म झाला असेल!🚩

                      अतिशय आक्रमक, शूर-वीर,क्रूर, ताकदवर स्वतः जीवंत राहतांना आपला समूह सुरक्षित राहावा म्हणून घनदाट जंगलाच्या उंच डोंगरावर,गुहेत आपलं बस्थान हलवलं असेल!उंचावर सुरक्षित वाटू लागल्याने पुन्हा त्यावर सुरक्षित दगडं रचले असतील!गुहा कोरली असावी!भिंती बांधल्या असतील!कालांतराने त्या उंच डोंगरावर भक्कम, बुरुज, तटबंधी, प्रशस्त इमारती बांधल्या असतील!चुना, शिसे दगडांनी प्रशस्त इमारती बांधल्या असतील!त्यात वास्तव्य करून समुहाचं रक्षण करीत त्याच्या दिमतीला जीवाला जीव देणारी माणसं उभी रहायली असतील!स्वतःच सैन्य उभारलं असेल!शत्रूशी लढा देत, शौर्य गाजवीत शत्रूची भूमी जिंकून मग पुढे वाटचाल करीत असावा!ज्या ठिकाणाहून सर्व कारभार पाहू लागला असेल त्या अवाढव्य दणकट बांधकामाला "किल्ला" असं संबोधित करू लागले असतील!🚩

        अतिशय शूरवीर,पराक्रमी योद्धे अशा अनेक किल्ल्यांवर सत्तास्थानी बसलें असतील!त्यांस 'राजा' 'king' म्हणू लागले असतील!वंश परंपरेनें त्या घराण्याचा राजा गादीवर बसू लागला असेल!सत्ता,शक्ती,युक्तीच्या जोरावर विस्तारवादाचा जन्म झाला असावा आक्रमण, युद्ध, कुटनीती ,काटशह ,तह,फितुरी,अत्याधुनिक नीती,आधुनिक शस्रांच्यां बळावर इतरांवर रक्ताळलेंला विजय मिळवून किल्ला, सत्ता हस्तगत करीत,भूमी पादाक्रांत करणारा आक्रमक पराक्रमी राजा सर्वश्रेष्ठ ठरला असेल!"सम्राट" झाला असेल 

राजसत्तेच कालचक्र फिरत राहिलं!काळाचं चाक पुढे सरकत राहिलं!सर्वसामान्य माणूस झुंडीतून समूहात,समूहातून राजसत्तेत भरडत राहिला!सत्ता बळकट होत गेली!पकड मजबूत होत गेली!रयत सत्तेचा पाया असतांना,उत्पन्नाचा स्रोत असतांना शोषण होत राहिलं!राजगादी भक्कम, बळकट होत गेली!सैन्य लूट करीत राहिले!सत्ताधारी बदलत राहिले!राजगाद्या बदलत राहिल्या!प्राचीन भारतीय राजसत्तेचा प्रवास काल चक्रासोबत वाटचाल करीत राहिला!धर्म अन सत्तेचा समन्वय साधून राजे राज्य करीत राहिले!हा प्राचीन इतिहास साधर्म्य संस्कृतीचां होता!एक धर्मीय होता!तरीही भिन्न आचार विचारांचा होता!काही प्रमाणात कृती,संस्कार, पूजा पद्धती जवळपास मिळत्या जुळत्या होत्या!आर्य,हिंदू, बौद्ध, जैन,शीख असा तो प्रवास होता!राजा राज्य करतांना, राज्य जिंकताना मंदिर,देवळं या प्राचीनतमं साधर्म्य संस्कृतीला धक्का लागू देत नव्हतें!सत्ताधं होतांना धर्माला स्पर्श करीत नव्हते!तेव्हा क्रूरतेचं आगमन झालेलं नव्हतं!🚩

              भारतीय उपखंडांत प्राचीन संस्कृती अनुरूप राजसत्ता असतांना किल्ला, दुर्ग, गड, भुईकोट किल्ला अशी राजसत्तेची केंद्र होती!महाराष्ट्रातही सह्याद्री, सातपुड्याच्यां सुरक्षित उंच डोंगर रांगेतं किल्ले बांधले गेले होतें!मजबूत किल्ले बांधले होतें!भक्कम तटबंदी होती!भक्कम बुरुज होतें!शत्रूला नाके नऊ आणणारें कातळकडे होतें!किल्ला सत्ता शक्तीकेद्र होती!राजसत्ता अन धर्मसत्ता एकमेकांना पूरक होत्या!पण... पण जेव्हा खैबर खिंडीतून भिन्न धर्मीय आक्रमणकारी शैतानी शत्रूचं अचानक आगम झालं!अत्याधुनिक शस्रानीं एक एक किल्ले, राज्य क्रूरतेने ताब्यात घेत राहिले तेव्हाचं.. तेव्हाचं विशाल हृदयी भरतभूमीचं काळीज छिन्न विच्छीन होत गेलं होतं!प्राचीन भारतीय राजांनी बांधलेले प्राचीन किल्ले गुलाम होत राहिले!तोफांच्या माऱ्यांनी किल्ले ढासळतं राहिले!🚩

           मंदिरं,देवळं,स्तूप,प्राचीन लेण्या ही माणसांची श्रद्धास्थळें होती!भारतीय संस्कृतीची ओळख होती!श्वास होती!प्राण होती!आक्रमणकारी आले,क्रूरतेने श्रद्धास्थळ तोडून, नासधूस करीत पुढे सरकत राहिले!किल्ला जिंकून क्रूरतेने राजा आणि सैन्याची कत्तल करीत राहिलें!तें हमलावर आक्रमक धर्मांध होतें!पुढे किल्ल्यांचे भक्कम बुरुज ढासळतं राहिले!🚩

प्राचीन भारतीय संस्कृतीची सोनेरी पानं रक्ताळली गेली!मानवी मूल्य घटत गेलं!ही गुलामीची वाटचाल होती!साधर्मी राजे अन रयत परचक्राचे बळी होतं राहिले!मजबूत बांधलेले किल्ले परक्यांची सत्ता केंद्र होतं राहिले!प्रचंड अंध:कारानंतर स्वकि्यांचा तेजस्वी तारा उगवत असतो!स्वधर्म उद्धारासाठी जन्म घेतो!सूर्य होऊन अंधःकार दूर करीत प्रचंड ताकदीने लढून परचक्रास आपल्या तलवारीने चिरडीत पुढे निघतो.... तें छत्रपती शिवाजी राजे होतें!🚩
🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८2२९५४६
दिनांक-३० मे २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)