चला जाऊया गड-किल्ल्यांवर (लोहगड किल्ला भाग -०1)

चला जाऊ गड-किल्ल्यांवर
 (लोहगड किल्ला-भाग-०१)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
.... नानाभाऊ माळी 

या अंतर्मनातं माझ्या 
दबलेले सारेचं असते 
डोळ्यातुनी पाहता खोल 
 मला सारेच गहन दिसते!🚩 

 दृष्टीतं बसेना माझ्या
 ही सृष्टी लाजूनी हसतें
त्यावर असतात किल्ले
ही नजर अधाशी असतें!🚩

हा कोणी रचिला पाया
नजर नजरेला फसते
विशाल बुरुज कडे ही 
मज सारे अफाट दिसते!🚩

दगडात ओतीला जीव 
 भिंतीत काळीज असते
अफाट काळे कातळ
मज माय भवानी दिसतें!🚩

 सह्याद्री विशाल छाती
 वरती तोफ गर्जत दिसतें
जेव्हा लढ म्हणती शिवबा 
 तेव्हा तलवार तळपत असतें!🚩

किल्ले शूर विरांची शक्तीस्थळं आहेत!स्फूर्तीस्थळं आहेत!स्मृती स्थळं आहेत!वीरश्रीने गाजलेलें  किल्ले लढाऊ ढाल होऊन ग्वाही देतांना दिसतात!भारतीयांना जाज्वल्य देशभक्तीची, देशप्रेमाची हाक देत उभे दिसतात! प्रेरणा देत असतात!अस्मितेची जाणीव करून देत असतात!स्वराज्याची हाक देत असतात!किल्ल्यांची दगड-माती ऐतिहासिक घडामोडीची साक्षीदार आहे!अखंड बुरुजांचा दगड शतकानुशतके किल्ल्याला आधार देत आहेत!किल्ल्यावरील माती सतत बोलावित असतें!ती मस्तकी लावून धन्य व्हावंसं वाटतं!त्या मातीत आमच्या राजांची पाऊले उमटलेलें दिसतात!त्यांच्या पाऊलखुणा हृदयाला जाणीव करून देत असतात!लढ म्हणायला सांगतात!किल्ल्यांवरील स्मृतीस्थळ छत्रपतीनी जीवंत केली होती!हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकास मुजरा करावासा वाटतो!माझ्या राजास नतमस्तक व्हावंसं वाटतं!सतत जाणवत असतं,अजूनही शिवाजी राजे गडावर राज्य करताहेत!वाटतं,राजदरबार भरला आहे!रयतेचा राजा सर्वांसमक्ष सिंहासनावर बसला आहे!राजा प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करताहेत!... किल्ले ऊर्जा देत असतात!घोगावणारे वारे कानी पडतात!नजर मान वाकून उंचावर जाते तेव्हा गगन खाली आलेलं दिसतं!सह्याद्रीभूमी विरांची आहे!पौलादी छातीची आहे!🚩

किल्ल्यावर अनंत पिढ्या शौर्य गाजवत निघून गेल्या!कर्तृत्वाचा ठसा ठेवून निघून गेल्या!पडके, झिजलेले, जिर्णावस्थेतील किल्ले अजूनही हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभे दिसतात!अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार किल्ले दिसतात!अजूनही शौर्य पताका घेऊन,अस्तित्व जपून किल्ले उभे दिसतात!आम्हास अजूनही छत्रपतीं शिवाजी राजे लढतांना दिसतात!भक्कम दगडांतील चुण्याचा आधार घेऊन किल्ले उभे दिसतात!प्रचंड जंगलांच्या आधारांने आजही सह्याद्रीच्या छातीवर किल्ले उभे दिसतात!🚩

किल्ले आमचे श्वास होतात!अनेक पिढ्यांचे वैभवी साक्षीदार होतात!किल्ले जगण्याची नजर देत असतात! आम्हा पिढीला इतिहासातील कडू-गोड पानं उघडून देत आहेत !

अशा अनेक किल्ल्यांपैकी मावळातील लोणावळा-मळवलीजवळ असलेल्या उंच डोंगरावर,उभट कातळातील किल्ला म्हणजे 'लोहगड'!!हा कठीण दुर्गकिल्ला आहे!लोहगड नावाप्रमांणे अवघड अन कठीण आहे!पण उत्तम पायऱ्या असल्याने चढायला सहज सोफा आहे!तत्कालीन राजसत्तेचीं महत्वपूर्ण ओळख असलेला सुस्थितीत असलेला लोहगड किल्ला दुर्ग, गिरीभ्रमण करणाऱ्यांसाठी साहसी दर्शन स्थळ आहे!राजसत्तेसाठी महत्वपूर्ण मानला गेलेला हा किल्ला सहयाद्री पर्वत रांगेतील अतिशय भक्कम, अभ्यद्य सुरक्षित मानला गेलेला किल्ला आहे!नावाप्रमाणे लोह असलेला कठीण किल्ला "लोहगड" आहे!🚩

सह्याद्रीच्या कुशीत,सुरक्षित आपलं अस्तित्व जपून ठेवलेला, घनदाट जंगलात उंचावरून दिमाखात, गर्वाने फडकणारा भगवा झेंडा उंचावरून दिसत असतो!पुण्यापासून अवघ्या ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या, लोणावळा-मळवली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५ किलोमीटरवर अंतरावर असून विसापूर किल्ल्याजवळच उंच, धीप्पाड कातळकड्यांनी पौलादी छाती काढून उभा असलेला किल्ला आम्हास इतिसातील पाने उघडण्यास भाग पाडतो!या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ३४०० फूट आहे!पायथ्या पासून काही अंतरावर पवना नदी वाहते!पवणेच खोरे जंगलांनी वेढलेलं आहे!काही अंतरावर पवना नदीवर बांधलेलं पवना धरण अफाट समुद्रा सारखा पसरलेलं दिसतं!निसर्गाचा अविष्कार अविस्मरणीय,अविश्वसनीय आहे!
 अशा या निसर्गसानिध्यातील एकांतात उभा असलेल्या लोहगड किल्ल्यावर दिनांक ०२ जून २०२४ ला जाण्याचं भाग्य मिळालं!
(लोहगड किल्ला दर्शन पुन्हा पुढील भाग-०२मध्ये पाहू) 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-०३ जून २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)