हडपसर तें सासवड प्रवास

हडपसर ते सासवड प्रवास
🌹🌹🙏🙏🌹🌹
********************
.... नानाभाऊ माळी 

            काल बराच वेळ वाट पाहत होतो!एकदाची सिटी बस आली!थांबली तसें प्रवासी एकमेकांना ढकलीत गर्दीतून बसमध्ये घुसू पाहत होते!रेटारेटीत तरुण वर्ग जास्त होता!आत प्रवेश करायचा अन खाली उतरायचा असे दोन वेगवेगळे दरवाजे होते!चढणाऱ्यांची प्रचंड झुंबंड होती!पी.एम.टी सिटी बसचा प्रवास म्हटल्यावर,डाव्या बाजूची सीटं महिला वर्गासाठी राखीव असतात तर उजवीकडील पुरुषांसाठी असतात!बसायला जवळपास ३० आसन तर ५० प्रवासी उभे होते!बसमध्ये उभे राहायलाही जागा नव्हती!तोबा गर्दीत,रिटेरेटीतं मागील सीटवर दोन प्रवाशांमध्ये जबरदस्त भांडण सुरु होतं!दोघांची हातापायी सुरुचं होती!एकमेकांचे हात ओढणे-ढकलणे सुरूचं होतं!तोंड नावाच्या महत्वपूर्ण अवयवातून डरकाळी सुरु होती!

              प्रवाशांना उभे राहायलाही जागा नव्हती!लोकं अंग चोरून दाटीवटीने उभे होते!बस सासवडच्या दिशेने पळत होती!ए.सी बस असल्याने बाहेरील उकाडा जाणवत नव्हता!तोबा गर्दीची उष्णता ए.सी तरी काय काम करणार?मागील त्या दोन प्रवाशांच्या भांडणात दुसरे कोणी मध्यस्तीही कारायला तयार नव्हतं!कंडक्टर तिकिटे काढण्यात व्यस्त होते!बसमध्ये उजव्या डाव्या आसनांमध्ये, डोक्यावरून लांबचा लांब लोखंडी पाईप मागे पूढे बोल्टिंग करून बसवला होता!त्याला प्लास्टिक कड्या अडकवल्या होत्या!उभे राहणाऱ्या प्रवाशांनी हातात त्या डोक्यावरील हलत्या कड्या घट्ट पकडून ठेवल्या होत्या!कड्या हाताचा आधार होत्या!ड्रायवरने अचानक ब्रेक दाबल्यावर तोल जाऊ नये म्हणून भक्कम आधार होत्या!

            एक एक किलोमीटरवर बस थांबा असल्यामुळे लोंढा येत होता!लोंढा जातही!बस पाण्याच्या माठासारखी फुगली होती!तरुण तरुणी उभ्यानेच आपापसात चेष्टा मष्करी करीत होते!चेहरे वेगळे, वय वेगळं, कपडे वेगळे, माकडागत वरच्या कडयांना घट्ट पकडून काहींचा प्रवास सुरूचं होता!मी ही एक कडी धरून उभा होतो!हडपसर-सासवड अंतर २२ किलोमीटर होतं!थांबे जास्त असल्याने वेळ लागत होता!

              बस वळणा वळणाने दिवे घाट चढत होती!घाटाच अंतर पाच किलोमीटर असावं!उंच डोंगर घाट माथ्याच अप्रतिम दृश्य पाहून मन प्रसन्न झालं होतं!डाव्या बाजूला मान वळवून पाहिले,मस्तानी तलाव कोरडाठाक दिसतं होता!अनेक वळणावर वाहने थांबवून सेल्फी काढणारे पर्यटक दिसत होते!पाच सहा दिवसांपूर्वी सतत पाऊस झाल्याने!जमिनीतून हिरवळीने डोकं काढलेलं दिसत होतं!डोळे बसच्या बाहेरील मनोहारी दृश्य टिपण्यात दंग होते!बस नागमोडी वळणे घेत पळत होती!बसमध्ये कोंबलेलें प्रवासी झोखांड्या घेत उभी होती!भांडणं करणारें दोघेजन दाटीवाटीने शेजारीचं बसले!दोघांनी आपापल्या तोंडाला कुलूप लावलं होतं!तरी मारक्या बैलासारखी अवस्था होतीचं!🌹

                         उंच उंच वळणदार घाटरस्ता पार करीत आमची बस उंच भुईसपाटीवरून पुढे निघाली होती!खोलगट दिवेघाट पार करीत माथ्यावर पोहचली होती!रस्त्याच्या कडेने शेती, हॉटेल्स दिसतं होतें!बस सासवडच्या दिशेने पळत होती!मी उत्सुकतेपोटी मागे वळून पाहिले!भांडणं    करणाऱ्यांपैकी एकाच्या हातात शेंगदाण्याची पुडी होती!त्यातील काही शेंगदाणे भांडणाऱ्याच्या हाती देत होता!दोघेही एक एक शेंगदाणे उचलून तोंडात टाकत होतें!मी माणसांचं भिन्न रूपं पाहत होतो!डोळे विस्फारून पाहत होतो!कडू कारले खाल्ल्यानंतर ताटात पुरणपोळी दिसावी तसं झालं होतं!

जवळपास एक तासांनी सासवडला पोहचलो होतो!प्राचीन नगरी सासवडला पोहचलो होतो!संत सोपान काकांच्या संत भूमीत पोहचलो होतो!कऱ्हा नदी किनारी पोहचलो होतो!मला प्रसिद्ध लेखक प्र.के.अत्रे दिसतं होतें!त्यांची झेंडूची फुले दिसत होती!साहित्य नगरीत पोहचलो होतो!सिटी बसमधून उतरतांना दोघे भांडंखोर मित्र झाले होतें!दोघेही चहाच्या टपरीत बसून चहा पित बसले!मी सासवड नगरीच्या प्रेमात पडलो होतो!मी भांडखोरांच्या प्रेमात सुद्धा पडलो होतो!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
******************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२५ मे २०२४
nanabhaumali.blogpot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol