कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव( भाग -०६)

कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव
               भाग-०६
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
... नानाभाऊ माळी 

            माणूस प्रवासी या जगाचा!सतत शिकत शिकवत पुढे चालला आहे!आपलं अस्तित्व घेऊन निघाला आहे!!तुम्ही,आम्ही,आपण सर्वचं निघालो आहोत!प्रवासात अनेकांची भेट होत असतें,होत आहे!आपला जन्म कुठल्या उद्दिष्ठांसाठी झाला आहे तेचं अजून पूर्त कळलेलं नाही असं वाटतं!पळणं सुरूचं आहे!पळणं थांबलं तरी उद्दिष्ठ कळलं नाहीये!आपण या पृथ्वीवर जन्माला आलो!कशाला आलो?मनुष्य योनीत जन्माला आलो!आपल्याला नाव चिकटलं गेलं!बस्स,त्याचं नावाचां आधार घेऊन जगणं सुरु असतं!माणसात माणूसपण शोधत पळत असतो!अनाकलनीय विश्वाचां शोध घेत घेत स्वतःचा शोध घेत पळणं सुरु असतं!

                    आपण अंगणात एकांतात एकटेच उभे असतो!उगवत्या,मावळत्या- सूर्याकडे पाहात असतो!वेळ पुढे सरकत असतें!रात्र अंधारी असतें!आपण वर गगनाकडे पाहात असतो!अनंत चांदण्या अंधारात स्वतःचं अस्तित्व घेऊन लुकलुकत असतात!आपली ओळख घेऊन अंधाऱ्या गगन पोकळीत मोठा 'धवल'चंद्र दिसू लागतो!आपण हे सगळं कुतूहलाने पाहात असतो!हा विस्मयी चमत्कार पाहात असतो!आपलं अस्तित्व शोधू पाहतो!आपली बुद्धी घुसळायचा प्रयत्न करू लागतो!खरचं या पृथ्वीवरील आपण एक छोटासा 'जीव' आहोत का?आपलं अस्तित्व नगण्य आहे?मी कोण आहे?जवळपासची माणसं कोण आहेत?माणसं आपल्याशी जोडली गेलीत!नात्यात बांधले गेलो!मैत्रीत बांधले गेलो!पुढे गोतावाळ्याचा विशाल समूह तयात होतो!तरीही 'स्व'अन हे विश्व काय आहे मग?हे ब्रम्हाडं भानगड काय आहे?हे सगळं सगळं पाहून बेचैन होऊ लागतो!स्वतःस शोधू पाहतो!अंतःकरणात डोकावून पाहू लागतो!खगोलीय गूढ कळतं नाही!उत्तरं मिळत नाहीत!आपण पुन्हा बेचैन होतो!आतून बाहेरून गुदमरायला होऊ लागतं! श्वास जिथून आत बाहेर करतात त्या धमणी नावाच्या अवयवापर्यंत येऊन पोहचतो!

माणूस प्रवासी या जगाचा!सतत शिकत शिकवत पुढे चालला आहे!आपलं अस्तित्व घेऊन निघाला आहे!!तुम्ही,आम्ही,आपण सर्वचं निघालो आहोत!प्रवासात अनेकांची भेट होत असतें,होत आहे!आपला जन्मच मुळी कुठल्या उद्दिष्ठांसाठी आहे तेचं कळत नसतं!भरकटलेल्या पळणं सुरूचं असतं!पळणं थांबलं तरी उद्दिष्ठ कळतं नाहीये!आपण या पृथ्वीवर जन्माला आलो!मनुष्य योनीत जन्माला आलो!  आपल्याला एखादं नाव चिकटलं जातं!बस्स, त्याचं नावाने जगत असतो!माणसात माणूसपण शोधत पळत असतो!अनाकलनीय विश्वाचां शोध घेता घेता स्वतःचा शोध घेत पळत असतो!

अंतःकरणात डोकावून पाहू लागतो!खगोलीय गूढ कळतं नाही!उत्तरं मिळत नाहीत!आपण पुन्हा बेचैन होतो!आतून-बाहेरून गुदमरायला होतं!श्वास जिथून आत बाहेर करतात त्या धमणी नावाच्या अवयवापर्यंत येऊन पोहचतो!कसं आहे बघा ना , चालता चालता त्याची धडकन थांबली तर?माझं नाव 'नानाभाऊ' कधीही धारार्थी पडेल!माझं शरीररूपी अस्तित्व या भूमीवरून नाहीस होईल!नानाभाऊ नावाचं पान फाटून विषय संपेल?विषय येथेच थांबत नाही!चंचल मनात वादळ सैरावैरा उठू लागतात!वादळांना थोपवणाऱ्या, गुढत्व धारण केलेल्या,मनःशांतीच्या ठिकाणी ओढले गेल्यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कळू लागतात,अर्थ कळू लागतात!भावार्थ कळू लागतो!त्याचं नाव 'अध्यात्म' असं ठेऊ!येथे मन दुरुस्तीचं औषधं मिळू लागतं!

जन्म मिळालाचं आहे,मरण निश्चित आहे!ईश्वर नावाचं हृदयातलं आगम्य स्थळ जवळ येऊ लागतं!आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात!आपला जन्म सिद्ध करण्यासाठी पळू लागतो!जन्म सत्कारणी लागण्यासाठी माणसं गोळा करू लागतो!सद्गुणी माणसं वाटाडया म्हणून काम करतातं!आपण इतरांच्या कल्याणासाठी झटलो तर आत्मिक समाधान मिळू लागतं!

अनेक माणसं आपल्या जीवन प्रवासात देवदूत बनून काम करीत असतात!मी शरीर अन मनाने तंदुरुस्त असेल तरच माणसं कमाऊ शकू!अनेक गड किल्ले स्फूर्ती देत असतात!त्यावर जाऊन मन-तन शुद्ध करून हिंडतो आहे!कधी अध्यात्म अन चालण्यातून उंचावर देव भेटत असतो!मन,शरीर तंदुरुस्ती घेऊन हिंडतो आहे!🚩

            पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालूक्यातील बोपदेव गावी,उंच पर्वतावर कानिफनाथ मंदिर आहे!ते मन-तन दुरुस्तीचं उत्तम स्थळ भेटलं आहे!दर रविवारी पहाटे पाच वाजता पायथ्यापासून चालायला सुरुवात करायची!तासभर घाम गाळत उंचावरील मंदिरात जाऊन एकचित्त व्हायचं!रस्त्यावर अनेक उभट खडक, दगडं, झाडं भेटतात!आशीर्वाद देतात!स्फूर्तीचं टॉनिक देतात!निसर्ग उदार होत परिसर फुलवला आहे!येथे गेल्यावर मनातली अनंत वादळं शांत झाल्याचा साक्षात्कारी अनुभव येत असतो!अनेक सद्गुणी माणसं येथे भेटत असतात!ती अंतःकरणातून जोडली गेली आहेत!

       आरोग्यरक्षक बनून माणसं जोडणारे श्री.शाम कुंभार सर घाम काढणारे गुरु आहेत!त्यांच्यामुळे अनेक तरुण,जेष्ठ मित्र जोडले गेले आहेत!अशी माणसं अंधारातील प्रकाश किरणे आहेत!उजेड दाखवणारे लामणदिवे आहेत!जेष्ठ गुरुवर्य ८० वर्षांचे तरुण श्री.रमेश पाटील सर ऊर्जास्रोत वाटतात!कानिफनाथ मंदिरातील अनेक आदरणीय व्यक्तिमत्व भेटत आहेत!
काही जोशपूर्ण तरुण देखील भेटतात!आपलं काम अन शरीरयष्टीची सांगड घालीत निसर्ग कुपीच्या अनमोल कुशीत येत असतात!तें तरुण मित्र बनून कधी ऊर्जास्रोत  होत आहेत!मी माझं वय विसरतो!तरुण होतो!

          तरुणांशी मैत्रीचा धागा जोडीत शुद्ध हवेतल्या कानिफनाथ ट्रेकला येणारे धवलराज ठोंबळ, दर्शन ठोंबळ, सचिन मोरे, अमोल मोरे,उत्तम काळेबाग,नंदकुमार गुरव,बंडवालं काकांसारखे प्रकाशयात्री या प्रवासात भेटतात!यांच्या संगतीने बोनस आयुष्य कमळासारखं फुलल्यासारखं वाटतं आहे!आरोग्यसंपन्न,दमदार वाटचाल सुरु आहे!घाम गाळणारा कानिफनाथ गड दम देत,चालायला सांगतो!वर बोलावतो!अंगावर येणारा चढ मैत्री करण्यास बोलावित असतो!काल रविवारी सकाळी मी माणसं वेचीत घरी आलो होतो 🚩

डोंगर पार करीत सूर्योदयास साक्षात कानिफनाथांचं दर्शन झालं होतं!चंचल मन शांत,स्थिर होत गेलं होतं!दर रविवारी मन-शरीराचं शक्तीवर्धक औषधी घेऊन निश्चितपणे घरी परततं असतो!देव गडावर शोधित आता मित्र माणसातंही भेटू लागला आहे!अशी माणसं माझे देवचं आहेत!पूजनीय आहेत!काल रविवारी मी कानिफनाथ गडावर माणसं वेचीत घरी घेऊन आलो होतो! 🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-२० मे रविवार २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol