जीवन पाण्याचा बुडबुडा 💐💐
जीवन पाण्याचा बुडबुडा
💐💐💐💐💐💐💐
***********************
... नानाभाऊ माळी
काल सकाळचें ८-३० वाजले होते!शनिवारी १८ तारखेला 'चला जाऊया गड किल्ल्यांवर'मोहिमे अंतर्गत लोणावळ्याजवळ लोहगड किल्ल्यावर जाणार होतो!माझे एक मित्रही येणार होते!मी मोहिमेचे प्रमुख आदरणीय बागुल सरांना काल सकाळीचं फोन केला,'सर नमस्कार!माझे मित्र गुरव सर देखील येणार आहेत लोहगड किल्ला सफारीला!'.. मला ओके सिग्नल मिळाला तसं गुरव सरांना देखील कळवलं!लोकशाहीचं महामंथन म्हणजे निवडणुका!मी टीव्ही वर बातम्या पाहण्यासाठी दंग झालो!अवघ्या अर्ध्या तासात श्री बागुल सरांचा फोन आला,'नानाभाऊ आपण १८ तारीख कॅन्सल करीत आहोत!मी विचारात पडलो,'अशी तर एकही सहल कॅन्सल झाली नाही!सर असं कसं म्हणताहेत!..... सरांनी सांगितलं आणि माझ्याही छातीचे ठोके वाढायला लागले होते!बागुल सर बोलत होते!मी सुन्न होऊन ऐकत होतो!............💐
'..........स्थळ रेणुका अपार्टमेंट, बिजली नगर चिंचवड, पुणे!सकाळचें ०८-३० वाजले असतील!घरात छान पैकी गप्पा सुरु होत्या!देव्हाऱ्यात दिवा लावला होता!देव दर्शनानें प्रसन्नता होती!सकाळच्या चहा-नाश्त्याचीं जय्यत तयारी सुरु होती!तरुण मुलगा,पत्नी अन यजमान असे तिघेजन घरात होते!मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली!मुलगा नोकरीला!मुलाच्यां विवाहसाठी स्थळ येत होती!स्वतः वधुवर मंडळात कार्य करणारे यजमान एसटी वर्कशॉप दापोडीत आपली नोकरी पूर्ण करून गेल्या दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले!तरीही सेवाभावी स्वभाव स्वस्थ बसू देईना म्हूणन सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेलं!वधू वर मंडळात सतत कार्यरत असे देवभोळे व्यक्तिमत्व!काल नेहमीप्रमाणे देवपूजा आटोपून नाश्त्याला बसणार होते!सगळं कसं छान पैकी चालेलं होतं!तेवढ्यात पोटात कळ आली म्हणून बाथरूम मध्ये गेले!आतून दरवाजा लावला!काही सेकंदाचा अवकाश तेवढ्यात बाथरूममधून धाडकन आवाज आला!
घाबरून मुलगा अन पत्नीनें बाथरूम बाहेरून आवाज दिला!आतून आवाज आला नाही!काही मिनिटे दरवाज्यावर टकटक दिली!आवाज आलाच नाही!तशा अवस्थेत दरवाजा तोडायला सुरुवात केली!दरवाजा तोडला!यजमान बाथरूममध्ये निपचित पडले होते!शांत झोपी गेल्यासारखे मान टाकून पडले होते जणू!माय लेकांनी घाबरून धावाधाव सुरु केली! जवळच्याचं लोकमान्य हॉस्पिटलला नेलं!डॉक्टरांनी तपासून वाय.सी.एम हॉस्पिटलला न्यायला सांगितलं!धावाधाव करीत वाय सी एमला नेलं!डॉक्टरांनी चेक करून सांगितलं'
'पेशन्ट गेलेलं आहे!'💐
डॉक्टरांची भाषा रुटीनची होती!त्यांचं बोलणं फिजिकल होतं!अचानक वीज कोसळावी,होत्याच नव्हतं झालं!आयुष्य लुटून न्यावं असं वाटून दोघांचाही संयम सुटून हंबरडा फुटला!'कैलासवाशी' असा पक्का शिक्का बसला तसा जीवन हिरावून घेतलं असं वाटू लागलं!हंबरडा फोडीतं डोळ्याच्या नदीला महापूर आला होता!नियती खेळ खेळते असतें!चालत बोलत घर उस्कटून टाकीत असतें!देव असा निर्दय का होतो? संसार सुखाचं एक चाक सरळ सरळ मोडून टाकावं!काय गुन्हा असेल यांचा!.....!'.... बागुल सर मोबाईलवर सांगत होते!मी सुन्न होऊन ऐकत होतो!श्री बागुल सरांचे व्याही कै राजेंद्र बर्के यांचं सिव्हियर हार्ड अटॅकनें निधन झालं होतं!माझे डबडबलेले डोळे न राहून गालावर ओघळले!💐
आज १८ मे होता!सकाळीच ८ वाजता मी अन वडगाव शेरीतील माझे मित्र श्री पांचाळ सर दोघेही बिजली नगरला पोहचलो!मुलगी-जावाई १९ मे च्या मॅरेज अनिव्हर्सरीसाठी थायलंडला गेले होते!रात्री अर्जंट निघून आले!सकाळी जनसागराने शोकाकुल वातावरणात कै. राजेंद्र बर्के यांना निगडी स्मशानभूमीत पवित्र दिव्य प्रवासासाठी निरोप देण्यात आला!श्रद्धांजली वाहिली!दुःख घरच्यांना होतं!वेदना घरच्यांना होतं होत्या!मुलगी अन मुलावर जीवापाड प्रेम करणारा बाप अचानक देव प्रवासाला निघून गेले होते!मागे राहिलेत त्यांच्या डोळयांत अश्रूपूर देऊन गेले होते!आज १८ मे दुःख देऊन गेला!जीवनाची अपूर्णता सांगून गेला!माणसाचं जीवन शेवटी पाण्याचा बुडबुडा आहे का मग?
💐💐💐💐💐💐💐💐💐
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१८ मे २०२४
Comments
Post a Comment