!आई!

💐!!आई!!👏🏼
💐💐💐💐
*************
... नानाभाऊ माळी 

आई आसवं माझी
आई हसणे  माझे
कसे सहलेसं आई
नऊ मासाचे ओझे!.. 🌹

किती यातना सहल्या
त्या डोक्यापार गेल्या 
राही अर्धपोटी आई
गंगाजमुना एक झाल्या!🌹 

अंगी भाजून भाजून 
आई सावली तू झाली
चटका बसला पायास
गाय वासराशी आली!🌹

अश्रू ओंजळीत घेई 
हुंदके झालीत गाणी 
मागे राहीना हो घास 
पोट भरीतसे पाणी..!🌹

आई मी तुझं पान
ममता झिरपत राही
स्वतः झरून झरून
झाली चैतन्याची शाई!🌹

देव पाठवितो आई 
आई ठेवितो देव्हारी
पवित्र झाली रे काशी
देव झालायं व्यवहारी!🌹

तूझ्या कुशीचं दान
रोज ओढूनी मी घेई 
आई फिटेल का ऋण
झालो पालखीचा भोई!🌹

आई कल्पतरू माझी
आई तुकयाचे गाणे
 टाळ मृदूंग वाजतो 
आई खणखण नाणे!.. 🌹
   💐👏🏼👏🏼💐
****************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१२ मे २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)