देवाचिया भेटी श्री गजानन महाराज मंदिर (भाग १३)

देवाचिया भेटी
श्री.गजानन महाराज मंदिर-शेगांव जि बुलढाणा
 (भाग-१३)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी

शुद्ध हृदय घेऊन
देव भेटीला निघालो!
देव देहात आला रें
मी धन्य धान्य झालो!
🚩🚩🚩🚩🚩
 
ठेचूनी हो टोक त्यांचे 
 पायांत खूप रुतुनी झाले 
काट्यावरून चालतांना
संत महंत जिंकूनी गेले!🚩

        सुंदरशा फुलं झाडांवर 
        खूप काही हसूनी झाले 
         संत महंत देवरुप होता 
        अंतःकरणी बसुनी गेले!🚩 

काट्यावरून चालतांना 
फुलं आली  पायाखाली
सांडीले हो सुख ज्यांनी
देव भक्त गेले महाली !🚩

माणूस जन्मताचं निरागस असतो!निष्पाप असतो!त्याचं जग अतिशय सुंदर असतं!देवपण,बालपण सारखंच असतं!त्यात कुठलाही स्वार्थ नसतो!भेदभाव नसतो!नजरेला सरळसोट दिसत असतं!बुद्धीत हळूहळू स्वार्थाची वाकडी नजर डोकावू लागते! 'माझं आहे!' असा स्वार्थी शब्द ऐकू येऊ लागतो!'माझं आहे!' मग मी कोण आहे? 'माझ्याचं लोभीपण,अहंम उफाळून जागृत होऊ लागतो!आईच्या पोटात असतांना काळजी होती का?भुकेसाठी रडावं लागायचं का?जेव्हा आईच्या पोटी जन्म घेतला!नाळ कापली गेली!शरीर वेगळं झालं!भूक लागू लागली!पुढे पोट स्वार्थी झालं!निष्पाप निरागसतेत स्वार्थी पोट येऊ घातलं!पण पोटाची भूक अप्पलपोटी असतें!🚩

            पोटाच्या भुकेनें दुसऱ्याच ताटं ओढून घ्यायची सवय लागली!तशी भाषा जन्म घेऊ लागली!माझं पोट भरल्यावर,माझा जवळचा कोण असेल?..तर तो 'भाऊ' असतो!'बहीण असतें!त्यांची पोटं भरून शील्लक राहिल्यावर रक्ताच्याच नात्यांकडे ते अर्धवट ताट  जात असतं!मग माझा गोतावळा,समाज,असा प्रवास सुरु राहतो!'लोभ' पोटाचा असतो!तोचं पाठीवर येऊन बसत असतो!पोट-पाठच्या स्वार्थी खेळाचीं स्पर्धा सुरु राहते!स्पर्धा तीव्र होत जाते!अटीतटीची स्पर्धा जीवघेणी असतें!मी,माझं,माझा असा स्वार्थी गट तयार होतो!स्पर्धेत प्रतिगटही उभा असतो!स्वार्थाच्या पोळीचीं विभागणी सुरूचं राहते!व्यक्ती भरकटत राहते!मनस्वास्थ्य बिगडत राहतं!🚩

              कशासाठी ही स्पर्धा पण?पोटासाठी?अस्तित्वासाठी? जगण्यासाठी?प्रसिद्धीसाठी? का घमेंडीसाठी?या कुतर ओढातानीत शरीर अन मानसिक स्वास्थ पार बिघडून गेलेलं असतं!ज्यासाठी स्वार्थी झालो 'त्याचाही 'उपभोग घेता येत नाही!मानसिक शांती नाही!भौतिक सुख मिळुनही समाधान नाही!आनंद नाही!असं समाधान दानात असतं!मन अन हृदय समर्पणात असतं!देव नावाच्या अनाकलनीय सकारात्मक अस्तित्वासं समर्पित झाल्यावर आत्मिक आनंद मिळतं असतो!हा आनंद चिरकाल टिकणारा असतो!चित्त समर्पित झाल्यावर स्वार्थ वितळू लागतो!मोह,मत्सर,राग,लोभ दूर जाऊ लागतात!सुखी कुटुंबाची व्याख्या जन्म घेऊ लागते!माणूस सकारात्मक होऊन श्रद्धेवर डोकं ठेवायला जाऊ लागतो!येथे देव महाद्वार उघडायला लागते!आम्ही देव महाद्वारी गेलो होतो!देवाचिया भेटी गेलो होतो!०३एप्रिल २०२४रोजी माहूर गडाला गेलो होतो!श्री.रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्ही विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील 'शेगावच्या' श्री.गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो!🚩

एप्रिल महिन्यातील तप्त उन्हाचा कडाका होता!सकाळी १० वाजता आमची बस माहूर गडाहून १७० किलोमीटर दूर शेगावच्या दिशेने पळत होती!एका योग्य ठिकाणी बस थांबवून जेवण केलं!महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण बनवणारी टिम सोबत होती!भोजन सुग्रास,चविष्ट होत!जेवन करून बस पुढील प्रवासास निघाली होती!घनदाट जंगलाच्यां डोंगर रांगा पार करीत संध्याकाळी पाच वाजता शेगावला पोहचलो!शेगावला खूप मोठे रेल्वे स्थानक आहे!रेल्वेस्थानकाला लागूनचं एक ते दिड किलोमीटर वर श्री.गजानन महाराजांचं विशाल मंदिर आहे!आम्ही देवद्वारी गेलो होतो!आम्ही श्री.गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो!🚩

श्री. गजानन महाराजांच्या मंदिर प्रवेशाआधी विशाल 'भक्तनिवास' दिसलं!मनमोहक,सुंदर इमारतीत प्रवेश केला होता!संध्याकाळचें ५-३० वाजत होते!भक्तनिवासात प्रथम चहा घेतला!हलके फुलके वातावरण होत!तेथून ओळीने पुढे गेलो!समोर चप्पल स्टॅन्ड होत!सर्वांनी एकत्र एका छोट्याशा पोत्यात चप्पल ठेवले!ते पोतं सेवेकऱ्यांच्या स्वाधीन केलं!पुढे गेल्यावर स्वच्छ हातपाय धुतले!येथून मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केला!दर्शन रांगेने जातांना समोर डिजिटल बोर्डवर डिस्प्ले दिसतं होत!दर्शनाला किती वेळ लागेल?पुढे किती गर्दी आहे!

मुख्य इमारतीच्या पीनड्रॉप शांत परिसरात रांगेने पूढे सरकत होतो!रांगेने जातांना इमारतीत उन्हाळा असूनही थंडगार वातावरण होत!वातानुकुलीत होत!शुभ्र धवल संगमरवरी टाईल्स आतून लावलेल्या होत्या!हळूहळू पुढे सरकत होतो!चालतांना उतारावरून खोल गाभाऱ्यात गेलो!समोर साक्षात श्री. गजानन महाराजांच्या दिव्यमूर्तीचं दर्शन झालं!आमचं सौभाग्य होत, महाराजांची आरती सुरु होती!याचं ठिकाणी श्री. गजानन महाराजांनीं समाधी घेतली आहे!समाधी गाभाऱ्यातील मूर्तीचं दर्शन घेतलं!मन प्रसन्न होत राहिलं!मनातले विकार गळत राहिले!दिव्यत्वास हृदयी उतरवत गेलो!चित्त स्थिर होत गेलं!स्वार्थ,लोभ,मत्सर हे विकार झटकत राहिलो!जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत राहिलं! 'गण गण गणांत बोते' या शुद्ध श्रद्धा मंत्राची ही शिदोरी घेऊन बाहेर पडलो होतो!🚩

मंदिर प्रांगणातील भव्य दर्शनी हॉलमध्ये टाळ मृदूंगाचा मधुर स्वर कानी पडत होता!डोळेभरून पाहिले असता हरी कीर्तनात तल्लीन झालेले 
 ह.भ.प कीर्तनकार महाराज अन सेवेकरी होते!कीर्तनातील स्वराभंग भक्ती सागराचीं अथांगता सांगत होते!भाविक भक्त कीर्तनात दंग होते!विठ्ठल भक्तीची पताका घेऊन पादुका मंदिरात गेलो!भव्य दिव्य संगमरवरी ध्यानमंदिरात अनेक भाविक भक्त श्री गजानन महाराजांच्या पोथी वाचण्यात दंग होते!चिंतनातं दंग होते!ध्यान मग्न होते!आम्ही पादुका मंदिरात चित्त अर्पून मनोभावे दर्शन घेतले!देव भक्तीचां मधुर रस  घेऊन बाहेर पडलो होतो!भक्तीत चिंब भिजून आनंदाश्रूसंगे बाहेर पडत होतो!श्री.गजानन महाराजांची सुंदर मूर्ती डोळ्याच्या तलावात भिजवून घेत होतो!

भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन असलेलं शांत,स्वच्छ,सुंदर, नीटनेटकेपणा असलेलं श्री.गजानन महाराज मंदिर उत्तम श्रद्धा धाम असले पाहिजे!कार्यमग्न नम्र सेवेकरी हृदयाला स्पर्शून गेले होते!मंदिरातील स्वच्छता,शांतता,प्रसन्नता ईश्वर साधनेला प्रोत्साहन देत होती!पीनड्रॉप शांततेच भरभरून कौतुक करावे तेवढे कमीच होईल!आतून बाहेरून तृप्तीचा प्रसाद घेऊन बाहेर पडलो!नंतर प्रसादालयात गेलो!महाप्रसादाला वेळ होता!आम्ही पुन्हा दोन्ही हात जोडून नतमस्तक होत मंदिर महाद्वारातून बाहेर आलो!🚩

श्री.क्षेत्र शेगांवचीं चविष्ट कचोरी प्रसिद्ध आहे!कचोरीचा आस्वाद घेतला!रिक्षात बसून थेट श्री.गजानन महाराजांच्या प्रकटस्थळी गेलो!ज्या वटवृक्षाखाली महाराज बसले होते!उष्टी पत्रावळीतील शित खात होते,ते प्रकट ठिकाण म्हणजे बंकट सदन आहे!आता वटवृक्षास कुंपण घातले आहे!त्या वटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतलं!परतीच्या प्रवासाकडे वळलो होतो!आनंद सागर गार्डन बंद असल्याने जाता आले नाही!श्री.क्षेत्र गजानन महाराज संस्थेची आनंद विहार, भक्त निवास अन विसावा सारखी राहण्यासाठी उत्तम सोय  असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना नाममात्र शुल्कातं राहण्याची व्यवस्था होत असतें!लांबवरून रेल्वे, बसने येऊन भाविक भक्तांची अलोट गर्दी श्री क्षेत्र शेगावी होत असतें!संध्याकाळचें ७ वाजले होते!श्री.गजानन महाराजांचं दर्शन लाभ घेऊन पूण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो होतो!

देवाचिया भेटी मन आतुर झाले होते!देव हृदयी बसवतं सलग चार दिवसांच्यां अध्यात्मिक यात्रेचीं सांगता झाली होती!एकमेकांच्या सोबतीने आनंद सुखाचां प्रवास संपन्न झाला होता!एकमेकांचां निरोप घेऊन हडपसर, पूणे येथे यात्रेची सांगता झाली!मन भरून आले होते!यात्रेकरू परके न रहाता जणू जन्मोजन्मीचें नातेवाईक झाले होते!🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१४ मे २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol