कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव.. भाग -०५

कानिफनाथ ट्रेक कष्टाचा देव
              भाग -०५
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
**************************
... नानाभाऊ माळी 

      काल ११तारखेच्या संध्याकाळी पावसाने हजेरी लावली होती!सलग दुसऱ्या दिवशी हजेरी होती!कालचा पाऊस म्हणजे आठवणींचा पाऊस होता!त्याची हजेरी आज सकाळी ६-३० वाजेपर्यंत संतत शिडकावा सारखी होती!लहान मुलासारखा पाऊस होता!कधी खेळत होता!कधी जोरात ओरडत होता!कधी हसत होता!कधी खोड्या करीत अंग भिजवत होता!अखंडपणे कमी जास्त धारा सुरूचं होत्या!हा पाऊस प्रीमान्सून होता!वादळ वारे ढग गडगणारा होता!मोकाट सुटलेल्या बैल सारखा होता!जिकडे जागा असेल तिकडे नुसताच उधळत होता!माणसाची हिम्मत तरी होती का व्यसणं लावायची?कुणाच्या घरात हळूच प्रवेश करून जातं होता!कुणाच्या झोपडीत घुसला होता!असलेलं सर्व काही भिजवून गेला!वळवाचा हा धुडघुश्या पाऊस नकोसा होता तरी हवाहवासा वाटत होता!

         तापलेल्या घरांना थंडावा देत, छडीने मजबूत येत राहणारा पाऊस बोलावीत होता,' अरे या तुम्ही!भिजा!माझ्या कुशीत येऊन मनसोक्त उधळा!तुमच्या अंगावरील उठलेल्या घामेरी पुटकुळ्या धुवून घ्या!'... भिजवणार नाही तो पाऊस कसला!.. कोणाच्या घरात जाऊन हिंडू फिरू लागला!रस्त्याच्या कडेनें उतारावर वाहू लागला!नाल्यात जाऊन गुडूप होऊ लागला!खोल रस्ते  तलावासारखे पोट फुगवून शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्यांची गम्मत पाहू लागला!रस्त्यावरील खोल खड्यात गाड्यांची चाकं धप्पदिशी पडत होती!पाण्याची पिचकारी उडवीत होते!गटारी तुडुंब भरून रस्त्यावर आली होती!रहदारीचा खेळ खंडोबा झाला होता!हा धुडघूश्या पाऊस पहिला वहिला होता!🚩

              आज पहाटे नेहमी प्रमाणे रविवार असल्याने कानिफनाथ गडावर निघालो होतो!पावसाचीं फवारणी सुरूचं होती!आता थांबेल, तेव्हा थांबेल अशी वाट पाहात थांबलो!पण पाऊस परीक्षा पाहात असतो!परीक्षक बनून नजर ठेवून थांबला होता!थेंब थेंब येत होता!थांबणारा नाहीच असं समजून आमच्या मनाला फटकन चाबूक मारला!नकार देणारं चंचल मन वटणीवर आलं!आज चारचाकी मित्र पण भेटले नाहीत!मग शेवटी जायचंच आहे असा दम भरल्यावर दुचाकीनें निघालो!पावसाच्या एखाद्या दुसऱ्या थेंबाला न जुमानता आमची टू व्हीलर कानिफनाथ गडाकडे पळत होती!डोकं थोडंफार भिजत होतं!माघार घ्यायचीं नाही असे पूर्वजाचीं शिकवण आठवली!छत्रपती शिवरायांचा पराक्रम इतिहासातून वाचला होता!मोहीम फत्ते करायचीच म्हणून जिद्दीनें निघालो!

               आमची गाडी होळकरवाडी गावाच्या कानिफनाथ पायथ्याशी लावून गड सर करण्यासाठी आगेकूच सुरु झाली होती!इकडे तिकडे नजर जातं होती!चढाई सुरूचं होती!पावसाने चौफेर जमिन भिजलेंली दिसतं होती!लहान मोठे डबके दिसतं होते!घाम येत असतांनाही कोरडेपणा जाणवत नव्हता!थंडाव्याच्या हलक्याशा झूळूकनें वातावरण प्रसन्न होतं!पाऊस ढगात जाऊन बसला होता ढगाळलेल्या अंधुकशा वातावरणातं मोहिमेला वेग आला होता!

                  चमचम करणारे लाईट कानिफनाथ शिखरावर दिसतं होते!गड चढतांना  शिव गोरखनाथ मंदिरं दिसलें!दम लागला होता!थोडं थांबलो अन पुन्हा छातीत दम भरून अंतिम ध्येयाकडे निघालो!मनुष्य ध्येयवादी असतो!ध्येय नजर देत असतात!ध्येयातून आत्मिक बळ वाढत असतं!आम्ही आमच्या ध्येयाकडे चालत होतो!मोहीम अडथळ्याची असली तरी विजयाकडे नजर असल्याशिवाय यश शिखर गाठता येत नसतं!आम्ही घामाघूम झालो होतो!गुडघे भट्टीचा भाता चालवीत होते!हळूहळू यश दृष्टीपथ्यात आलं होतं!🚩

                       कानिफनाथ मंदिर डोळ्याला दिसलं!पाय चालत होते!गुडघे वाकत होते!पावसाने जमीन भिजलेली होती!मातीचा सुगंध येत होता!शेत नागरून ठेवले होते!काल पर्यंत ४० डिग्री तापमान होतं!त्यावर पावसाने जबरदस्त पाऊस बाण मारल्याने भिजले होते!काळे ढेकळं विरघळलेली दिसतं होती!निसर्ग डॉक्टर असतो!वेळोवेळी वेगळ्या स्वरूपात नियमन करीत असतो!आम्ही निसर्ग सानिध्यात,दगड-गोटे ओलांडीत,ओलसर मातीचां सुगंध घेत होतो!शॉर्टकट घेण्याच्या नादात भिजलेल्या मातीत पाय ठेवून उभट कड्याने वर चढत कानिफनाथ मंदिरापर्यंत येऊन पोहचलो होतो!

                       निसर्ग देव असतो!निसर्गात, उंच डोंगरावर मंदिरं आहेत!कानिफनाथ मंदिरं उंच डोंगरावर आहे!वास्तुशिल्पीचां अतिशय सुरेख नमुना असलेलं कानिफनाथ मंदिर आहे!संगमरवरी शुभ्र पायऱ्या देवत्वाकडे नेत होत्या!शुशोभीत मंदिर पाहिलं!गाभाऱ्यातील गुरुदेव कानिफनाथांचं दर्शन घेतलं!मन शांत,प्रसन्न होत राहिलं!आजूबाजूला असलेल्या मंदिरातं जाऊन दर्शन घेतलं!🚩

                     देव घाम टिपित असतो!देव देव्हाऱ्यात असतो!देव गाभाऱ्यात असतो!त्यातील मूर्ती दर्शन अंतरात्म्याला शीतलता प्रदान करीत असतं!आज घाम गाळून देवदर्शन घेतलं!कानिफनाथ ट्रेकिंग ग्रुपचे आदरणीय शाम कुंभार सर आरोग्य घुटी देत असतात!गड चढून देव दर्शन होणे!हिचं आरोग्य घुटी आहे!जगण्याची शिदोरी आहे!आज आम्ही मनोभावे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो होतो!आमच्या शरीरातील वाहिन्या धमणीला शुद्ध रक्त पुरवीत होत्या!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**************************
.... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१२ मे २०२४
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)