प्रवासातील फटफजिती(जीवंत खंडकाव्य)

प्रवासातील फटफजिती
   (जीवंत खंडकाव्य)
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
.... नानाभाऊ माळी 

          प्रवास कधी लांबचा असतो!प्रवास खूप दूरचांही असतो!प्रवास कधी शिकवत असतो!प्रवासातून नजर येते!प्रवासातून अनुभव येतो!प्रवास हा हसवा असतो!प्रवास कधी आनंद देतो!प्रवास कधी शिक्षाही देतो!प्रवास  कधी दुःखही देतो!प्रवास हा थांबत नसतो!प्रवासातून देत घेत,
अनुभव संपन्न होत असतो!असाच आमचा प्रवास होता!खुपचं तसा लांबचा होता!पुणे-दिल्ली-सिमला करून पूढे कुलू, मनाली,रोहतांग  होता!ऐकून खूप खुश होतो!मे महिन्याचा प्रवास होता!तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग अजुनी वेदना ताज्या होत जातात!पुण्याचे हो ४० डिग्री, रोहतांगला (वजा) -५ डिग्री तापमान होत!कडक उन्हातून बर्फातं सहल  आनंद सारे खुशाल होतो!आनंदाच्या शब्दकळ्या देवभूमीच्या घेऊनि होतो!

                   परतीचा तो दिवस उगवला,रोहतांग बर्फाच्यां प्रेमात पडलो!मस्त मजेत बर्फात खेळलो!रोहतांग-कुलू-मनाली करून,सिमला आम्ही गाठलं होत!हिमालयाच्या कुशीत आम्हा स्वर्ग नवा भेटला होता!म्हणतात त्यासं स्वर्ग भूमी!म्हणतात त्यांसी देवभूमी!म्हणतात त्यांसी हिमालय भूमी!देवभूमीच्या कुशीत आम्ही आनंद सारा लुटीत गेलो!आनंद लुटीत स्वतःस विसरलो!बस आमची पळत होती!घाट माथ्यावर वळत होती!हरित,थंड,पर्वत रांगा मागे मागे जात होते!हृदयात सारा आनंद अमुचा, ठोसून ठोसून भरीत होतो!हिमालय आहे गर्व अमुचा, मागे मागे जातं होता!देवभूमीच्या कुशीत फिरलो, दृश्य हृदयी साठवीत होतो!बस आमुची पळत होती!🌹

कुलू,मनाली,सिमला सारे सारे मागे मागे जातं होते!ठेवा हृदयी भरलेला आठवून आठवून सोबती नेत होतो!हळूच चादर निघून गेली!थंड सारे  मागे गेले!हिमाचल दृश्य मागे गेले!बस जोरात पळत होती!पंजाब मधून जातं होती!तापमानाचा पारा वाढत गेला!आजच दिल्ली गाठायची होती!रेल्वे रिझर्वेशन झाले होते!दिल्ली-पूणे रेल्वे होती!बस आमुची पळत होती!दिल्ली खूप दूर होती!तापमान पारा वाढला होता!भूक पोटाला लागली!बस हळूच वळत गेली!हॉटेलाटून सुवास खमंग आला!भोजन खूप छान होते!रुचकर, स्वादिष्ट, चविष्ट होते!पोटावरती हात फिरवला!वेळेच मग भान झालं!हाती दोन तास होते!दिल्लीत वेळेत पोहोचायचे होते!

बस आमुची पळत होती!तप्त उन जाणवत होत!चटका झेलीत हायवेवरुन बस आमुची पळत होती!वेळ काटे हाती घेऊन,जोरजोरात पळत होते!बसचा मग वेग वाढला! हायवे टायर घासित होता!चरर चरर आवाज येत राहिला!टायर गरम झाले असतील!मध्येच 'धडाम धूम्म' आवाज झाला!वेग बसचा घटत गेला!स्टीयरिंग एकटी धडपडतं राहिली!बस झोखांड्या खात होती!ब्रेकवर पाय करकचून दाबले!एक किलोमीटरवर गाडी थांबली!मागचा टायर फुटला होता!डोळे आमुचे विस्फारीत झाले!धस्स करून मनी बोललो,'देवा कसली आफत आणली?' मरण रस्ता हायवेवर होतं!मागील गाड्या जोरात होत्या!ब्रेक दाबीत निघून गेल्या!थोडक्यात आम्ही वाचलो होतो!

टायर बदलून दुसरा टाकला!ड्राइव्हर भाऊ पुर्ता वाकला होता!जेव्हा नवीन स्टार्ट घेतला!बस जोरात पळू लागली!हायवे टायर एक झाले!कानी चरर चरर ऐकू आले!तासाभरात होती रेल्वे पुढली?आम्ही दिल्ली जिंकण्या बसलो होतो!ओव्हरटेक करीत,बस पळत होती!१०० पार बसचा वेग होता!वाघ शेळीचा खेळ जणू!दिल्ली अजून दूर होती!५० किलोमीटर अंतर होतं!रेल्वे सुटण्यास ४०मिनिटे होती!हृदयी धडकन सुरूचं होती!वेग मर्यादा वाढली होती!हवेत जणू पळत होती!घाम उन एक झाले!४२ डिग्री पारा होता!मुठीत जीव घेऊन बसलो होतो!

दिल्ली रेल्वे स्टेशन पोहचलो होतो!दहा मिनिटे उशीर झाला!दिल्ली-मुंबई रेल्वे वाकुल्या दाखवीत निघून गेली!ac-3 टायर बुक होतं!आता तोंडावर मारीत सुख होतं? हातची रेल्वे निघून गेली!हाती कोलीत देऊन गेली!आम्ही सर्व हतबल झालो!काय करावे, कुजबुज झाली!हातचं सर्व निघून गेलं!हाती धूपाटनं आयत आलं!पण मुंबई-पुणे जाणचं होतं!धूसर आशा समोर होती!दुपारी ०३वाजता रेल्वे होती!दिल्ली-मुंबई रेल्वे होती!चटका उन्हाचा बसत होता!आशा पल्लवीत झाली!संख्या आमुची ५० पन्नास होती!आमुची मत मतांतर गहाण ठेवली!तिकीट अर्जंट काढून घेतले!

०३ वाजता रेल्वे आली!कोंबून जनरल डब्यात घुसलो!दाटीवाटी तोबा गर्दी, पाय टेकायला जागा नव्हती!घाम, गर्दी,धकाबुक्की रेल्वेनें शिट्टी फुंकली!झुकझुक गाडी पळत होती!खाली बसायला जागा मिळतं गेली!'सीट'  वाकुल्या दाखवीत होतं!मागची गाडी निघून गेली!बुकिंग ac-३टायर घेऊन गेली!आता धक्का बुक्की जनरल डब्बा हताश होऊनि पळत होता!दिल्ली-मुंबई खूप अंतर होतं!रात्र झाली झोप आली!एकमेकांवर पेंगू लागली!पाय वळकुटी,हात वळकुटी शरीर नेमके पेंगत राहिलं!

रात्रीतून दिवस उगवला!दिल्ली-मुंबई पळत होती!शिट्ट्या मारीत रेल्वे आमचं शरीर घेऊन पळत होती!असाह्य आम्ही झालो होतो!जनरल डब्याचा गुलाम होतो!कुणी ओरडे,मध्येच भांडणं माणसं मेंढर झाली होती!अंधार गिळूनी सूर्य  उगवला!प्रकाश आम्हा देत राहिला!जनरल डब्बा,दिल्ली-मुंबई रेल्वे प्रवास अंतःकरणी लिहून झाला!माया नगरी मुंबई 'सि एस टी' स्टेशन आल ! माणसं असून मेंढरं आम्ही धडशा मारत पळू लागली!माया नगरी मुंबई सारी मशीनसारखी पळत होती!
पुणेरी आम्ही अवघे हळूहळू डब्यातून आलो!मुंबई-पूणे बस निघाली अनुभूतीचां साठा घेऊन!घाम, चिकचीक अंगी मुंबईची सोडूनी पुणे निघालो!समुद्री लाटा धडकत होत्या काठा काठावरुनी!आमुची धडकन शांत हवेशीर लोणावळा घाटावरुनी!
पूर्वारध अमुच्या सहलीचा गोड सुंदर स्वप्न होतं!उत्तरार्ध पश्चाताप, दुःख हाल जे नको नकोसे झाले!पुणे सिमला कुलू मनाली आनंदाचा हेवा!सिमला दिल्ली मुंबई पूणे हा दुःखानुभूतीचा ठेवा!उत्तरप्रवासातील फटफजिती का वाटुनी आम्ही घ्यावा?
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
******************************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
       ७५८८२२९५४६
दिनांक-१० मे २०२४
(अक्षयतृतीया)
nanabhaumali.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)