देवाचिया भेटी (औंढा नागनाथ जि हिंगोली)भाग-११
देवाचिया भेटी
(औंढा नागनाथ-जि. हिंगोली)
भाग-११
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
************************
.... नानाभाऊ माळी
मनुष्य स्वप्न पाहात जगत असतो!कृती, शक्ती अन श्रमातून स्वप्न साकार होत असतं!साकार शब्दातून अर्थबोध होत असतो!स्वप्न माणसाच्या अस्तित्वाला गती देत असतांत प्रत्येकाची स्वप्न भिन्न असतात!माणूस मुळातच 'आशा' अन 'उमेदीचां' आधार घेत जगत असतो!आशा स्वप्नाळू असतें!आशा धैर्यशील असतें!स्वप्नपूर्तीसाठी स्वतःस झोकून देत असतें!उमेदीच्या साथीने आशा बाहेर पडते!स्वप्न सत्यात उतरवते!शेवटी राहून काय जातं मग ?💐
स्वप्न दररोजचं पडत असतात!माणूस स्वप्नाळू असतो!सर्वचं स्वप्न साकार होतांत असंही नसतं!स्वप्न व्यक्तीपरत्व्य वेगवेगळी असू शकतात!जगता जगता आनंद देता-घेता आला पाहिजे!आनंद कष्टाचं शिखर असतं!आपण मेहनतीने स्वप्नशिखरावर पोहचल्यावर जिंकत असतो!सुख हात पसरून आलिंगन देत असतं!कष्टातलं सुख टिकावू असतं!टाकावू सुखामागे न लागता टिकावू सुखातला आनंद खूप मोठा असतो!साक्षात परमेश्वरानुभूतीचा प्रसन्न काळ असतो!💐
सतवर्तन ईश्वर सानिध्याजवळ नेत असतं!इथं खऱ्या स्वप्नांची परिपूर्ती होत असतें!प्रत्येकाचं छोटं-मोठं स्वप्न असतं!जास्त मोठंही नसतं!रुचेल-पचेल असं असतं!कष्टातून उभे राहत असतो!उभे राहण्यात बरीच वर्षें जातात!उभे राहिल्यावर जगण्याचा अर्थ कळतो!आनंद सुकाळ असतो!आपण आपोआप त्याकडे वळत असतो!वाढत्या वयासोबत जीवनानंद घ्यायचा असतो!मी जे काही कमविलेलं आहे त्यातलं सर्वचं माझं नसतं!९९%माझं असलं तरी १% तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दुसऱ्यांचं असतं, ते त्यांना देता आलं पाहिजे!साह्यस्वरूप इकडच्या कानाकडून दुसऱ्या कानापर्यंत पोचता कामा नये!ही परोपकारी वृत्ती हळूहळू जन्म घेऊ लागते!अशा वेळेस साक्षात ईश्वर दिसू लागतो!पवित्र असं दिसू लागतं!शुद्ध भाव दिसू लागतात!शुद्धतेत परमेश्वर दिसतं असतो!निर्मळ-पवित्र ठिकाणी परमेश्वर असतो!आध्यत्मिक होणं परमेश्वराजवळ जाणं असतं!वाढलेल्या वयाला, मनाला गुंतवूण ठेवणारं अध्यात्म हे माध्यम असतं!आध्यत्मिक मन सतत सद्विचारामागे लागलेलं असतं!चंचल मनाला बांधून ठेवत असतं!आम्ही पवित्र चंदन गाभाऱ्यात एकचित्त होण्यासाठी गेलो होतो!आम्ही 'स्व' चां त्याग करण्या, परमात्म्याचा सानिध्यात दिनांक २ एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथला गेलो होतो!१२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या ८ व्या ज्योतिर्लिंग शिव दर्शनाला गेलो होतो!
आमची बस पोखरणीचें भगवान श्री नृसिंहाचं दर्शन घेऊन 'औंढा नागनाथ'ला गेलो होतो!दिवसभर अनेक ठिकाणी देवदर्शन करून थकलो होतो तरी अंतर्मनातून ज्योतिर्लिंग दर्शनाची अभिलाषा ताजी होती!पोखरणीहून अडीच ते तीन तासांचा प्रवास करून रात्री ८-४५ वाजता औंढा नागनाथला पोहचलो होतो!स्थानिक नियमित वेळेनुसार रात्री ०९ वाजता मंदिर बंद होत असतं!
साक्षात महादेवाने दर्शनासाठी बोलविले होते!आम्ही सर्व दर्शनाभिलाषी औंढा नागनाथला बस मधून उतरलो,धावपळ करीत मंदिरातं पोहचलो!रात्री ८-५० वाजता मंदिरातील दर्शन गाभाऱ्यात होतो!अन साक्षात्कारी दर्शन डोळ्याने घेत होतो!शिवलिंगास हस्तस्पर्शाने दर्शन घेत होतो!अंतर्चक्षुनें घेत होतो!भावविभोर हाऊन श्रद्धेनें दर्शन घेत होतो!मनअंतर्चक्षु एकचित्त झाले होते!शिवलिंग खोल भुयारात,भुगर्भात तळात होतं!भूमिगत होतं,खोल गुहेत होतं!रांगेने पायऱ्या उतरून शिवलिंगावर डोकं ठेवलं होतं!मन शांत शांत होतं गेलं!औंढा नागनाथाचं दर्शन झालं होत!भगवान श्री.हरीहरच दर्शन झालं होत!शिव विष्णू एकत्र रूपाचं दर्शन घेतलं होतं!नागनाथ महादेव दारुका राक्षसाचा वध केला होता!म्हणून हे दारुका वन म्हणूनही नाव प्रचलित आहे!सकाळी ५-३० वाजेपासून ते रात्री ०९-०० वाजेपर्यंत अखंड बारमाही दर्शन सुरु असतं!महाशिवरात्री अन श्रावण महिन्यात जातं गर्दी असतें 🚩
पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठव्या नागनाथ महादेवाचं दर्शन झालं होतं!महाभारत कालीन जेष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिर यांनी बांधलेल्या औंढा नागनाथांचं दर्शन झालं होतं!प्राचीन काळी येथे औंढा सरोवर होतं!औंढा नागनाथ येथील महाज्ञानी विसोबा खेचर यांच्या गावाचं दर्शन झालं होतं!त्यांचेच परम शिष्य संत नामदेवांची परीक्षा येथेच झाली होती!नामदेवांच्या अगाध भक्तीनें चमत्कार घडवला होता!नंदी एकाचं ठिकाणी उभा असतांना मंदिरं पूर्वेकडून पश्चिमेंकडे फिरलं होतं!अशी आख्यायिका आहे!येथील नंदी समोर न दिसता मंदिराच्या पाठीमागे आहे!पूर्वी हे नागनाथ मंदिरं सात मजली होतं असं मानतात!औरंजेबानें त्या काळी मंदिराची नासधूस केली होती!येथील भक्तांनी प्रतिकार केल्याने, औरंजेबाच्या सैनिकांना पळवून लावले होते!म्हणून हे मंदिरं आजही सुस्थितीत शाबूत राहिलं आहे असं म्हणतात!🚩
कालांतराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पेशव्यांनी मंदिराची पुनर्बांधनी केलेली आहे असं मानतात!मंदिरं परिसराचे विशाल, विस्तृत क्षेत्रफळ असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचं वास्तुशास्र कलाशिल्पाचा उत्तम नमुना आहे!संपूर्ण मंदिरं बांधकाम हेमांडपंथी असून दगडांवरील कलात्मक कोरीव काम हृदयाला जाऊन भिडतं!अनेक स्त्री-पुरुषांची, पशु पक्षांची अतिशय सुरेख कोरीव शिल्प दगडावरील भिंतीवर कोरलेली दिसतात!प्राचीन भारतीय कलाशिल्पाचा विस्मयकारी नजारा पावित्र्याकडे नेतो!भव्य,दिव्य वास्तुशिल्पी मंदिरं एक चमत्कार वाटतो!भारतीय कलाशास्राचां प्राचीन ठेवा वाटतो!चहूबाजूनीं मंदिरं पाहिलं तर एक एक अखंड घडीव दगडं कापून एकमेकांच्या मध्ये व्यस्थित अडकवून रचून ठेवलेली दिसतात!म्हणूच हे मंदिरं आजही उत्तम स्थितीत आहे!स्थापत्यकलेचां सुंदर नमुना आहे!
मराठवाड्यातील नांदेड पासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेलं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील हे मंदिरं हिंदू संस्कृतीचं आराधना स्थान आहे!पवित्र श्रद्धास्थान आहे!मन,चित्तास शांत सागरी नेणारं हे स्थळ अंतरीचा प्रकाश प्रदान करीत असतं!येथे सासू सुनेची बारव आहे!संत नामदेव महाराजांचं मंदिरं आहे, चारही देवींचे मंदिरं आहे!बारा ज्योतिर्लिंग मंदिरं देखील येथे आहेत!आध्यत्मिक सुखाची व्याप्तीतं जीवनानंद पूर्ती करणारं औंढा नागनाथ शिवमंदिर स्वानंद देत राहिलं!दर्शनाने हृदय शांत प्रसन्न होतं राहिलं!रात्री मंदिरं परिसरातचं जेवण केल्यावर ११वाजता रात्रीचं बसने माहूर गडाकडे प्रयाण केलं होतं!
🚩👏🏼🚩👏🏼🚩👏🏼🚩
**********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२मे २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment