देवाचीया भेटी(श्रीहरी विठ्ठला द्वारी -पंढरपूर)
देवाचीया भेटी
(श्रीहरी विठ्ठलद्वारी-पंढरपूर)
भाग-०६
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
भक्ती रसात अखंड आकंड डुंबावं!भक्ती रसात न्हाऊन निघावं!चिंब चिंब हृदयी स्वतःस बघावं!जगणं सारं त्यांचंच व्हावं!सुखांदे आमुचं जीवन जावं!पंढरपूरी बसलेला विठू अवघ्यां भक्तजनांची माऊली आहे!कोणी त्याच्या खांद्यावरी बैसला!कोणी कटेवरी बैसला आहे!कोणी बोट धरून चालला आहे!भक्तवत्सल कनवाळू माऊलीच्या दर्शनाला महापूर लोटला आहे!भक्तांचा मेळा ताल मृदूंगाच्या अवीट गोड ध्वनीत दंग झालेला दिसतोयं!मनात,तनातं, विठ्ठल निवासाला दिसतोय!पांडुरंग भक्तीचां गोडवा चौफेर पसरला आहे!अपार महिमेत पाय आपोआप चंद्रभागे तिरी वळताहेत!विठ्ठलाच्या गोजिऱ्या रूपास भुलून भाववेडा भक्त भजनी दंग झाला आहे!🚩
पंढरपूरचां सावळा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत!भगव्या पताकांच्या दिंड्या गावागावाहून निघत असतात!भगवंत भक्तीत,विठ्ठल आराधनेत चित्त हरवून बसलेला भक्त हाती टाळ घेऊन भजनात तल्लीन झालेला दिसतो आहे!मृदूंगावर हातांची तालबद्ध थाप पडतं आहे!संतांच्या दिंड्या निघालेल्या आहेत! "ज्ञानोबा तुकारामाचा" गजर करीत पालख्या पंढरपूर दिशेने निघाल्या आहेत!संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी देहूगावातून निघाली आहे!अजूनही महाराष्ट्रातून अनेक संत महात्म्यांच्या पालख्या निघाल्या आहेत!अवघड वाट पार करीत!भजनात विठ्ठल रस ओतीत!कर्णमधुर भजनातून विठ्ठल आळवीत वारी निघाली आहे!एकचं ध्यान लागले आहे!आसं लागली आहे,'माझा विठ्ठल,माझा पांडुरंग, माझा सावळ्या हरी,माझा जगण्याचा श्वास मला भेटावा!'🚩
एक एक दिंड्या दिंडीस भेटतात!पालख्या भेटतात!वारी विठ्ठलाद्वारी येऊन पोहचते!भोळ्या विठ्ठलाचां भोळा भवसागर,चंद्रभागेतीरी येऊन पोहचला आहे!भजनी दंग झालेला विशाल सागर वाळवंटी पोहचला आहे!विठ्ठल नामाचा गजर सुरु आहे!भाव भक्तीचा गजर सुरु आहे!भक्तीत चिंब भिजलेल्या अवीट गोड अभंगासंगे टाळ-मृदूंग कानास विठ्ठलापाशी नेत आहेत!डोळ्यासमोर एकच वाट दिसत आहे!ती वाट विठ्ठल मंदिराकडे जात आहे!नाचत,वाजत,गात एक एक पावलं विठ्ठल भेटीसं निघाला आहे!जीव व्याकुळ झालेला आहे!हृदयात वसलेला पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभाचं आहे!व्याकुळ झालेला भोळा भवसागर नतमस्तक होऊन विठ्ठलास डोळ्यांनी प्रासुन असतात!🚩
भगवंत भेटीच्या आशेने मन व्याकुळ झालेलं असतं!विठ्ठलाचीं आसं आणि ओढीने मन त्याच्या ठायी लागलेलं असतं!भक्तजणांचा महासागर चंद्रभागेतिरी विखूरलेला असतो!अंतकरणातं तळमळ असतें ती विठ्ठल दर्शनाची!तगमग असतें ती विठ्ठल भेटीची!विठ्ठलमय झालेला भोळा वारकरी देव दर्शनाच्या आशेने आलेला असतो!कोण बोलवत यांना?कोण सांगत यांना?येथे बोलवणारा कोणीही नाही!तरीही लाख-लाख पावलं आपल्या आराध्याच्या दर्शनासाठी पंढरपूरी येत असतात!🚩
कोणी विठ्ठलाचां बोट धरून असतो!कोणी करकटेवर असतो तर कोणी निस्सीम भक्त विठ्ठलाच्या खांद्यावरी बसलेला असतो!कुटुंबवत्सल पांडुरंग आपल्या लेकरांना अंगाखाद्यावर घेऊन मिरवत असतो!आपल्या सावळ्या रूपाचं दर्शन देत असतो!अनंत अनंत युगांपासुन भक्त पुंडलिकाने दिलेल्या विटेवरी जगदंपालनहार उभा आहे!पायी वारी, दिंडी, पालखी, बस, मोटर अशा अनंत मार्गानी भक्तीच्या आशेने आलेला वारकरी आपल्या आराध्याच्या दर्शनाभिलाषेने येत असतो!
कानडा! विठ्ठल!पांडुरंग!भक्तीचा भुकेला हरी!लाखो लाखो भक्तांना आपल्या कवेत घेत असतो!मायेने आपल्या कुशीत घेत असतो!अशा भक्तवत्सल विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही दिनांक ०१ एप्रिल रोजी पंढरपूर गेलो होतो!आम्ही पंढरपूरातं पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते!🚩
रात्री भावभक्तीने चंद्रभागेतीरी गेलो!वाळवंटीचं दर्शन घेतलं!विठ्ठलाच्यां संत नामदेव पायरीवर डोक ठेवलं!संत चोखोबांचें आशीर्वाद घेतले!पंढरपूरच्या हरीचं मुख दर्शन घेतलं!कित्येक दिवसांची मनोकामना पूर्ण झाली होती!माझी आस्था अन
श्रद्धेला साक्षात ह्याच हातांनी स्पर्श करीत होतो!साक्षात देवाला हृदयी बसवत होतो!आराध्यासं डोळेभरून पाहात होतो!देह हृदयासह अर्पित करीत होतो!🚩
पांडुरंगाशिवाय जीवन अपूर्ण आहे!वारी एक ओळख आहे!पांडुरंगास भेटण्याची आतुरता, ओढ असतें!वारी स्वतःस जगण्याची मार्गदर्शिका आहे!
आशा,आसं,आराध्य एक झाले होते!मी स्वतःसं जगदपित्या चरणी अर्पित करीत होतो!माझ्या मनचक्षुनी देव दर्शन करीत होतो!मी मी राहिलो नव्हतो!जगदस्वामीतं विलीन होतं गेलो!रामकृष्ण हरी नामात दंग झालो होतो!माझ्या अस्तित्वाच्या अस्तित्वाच्या रेषा पुसट होत गेल्या होत्या!हरी नाम ठळक ऐकू जात होते!आम्ही श्री गजानन महाराजांच्या पंढरपूरातील मठात मुक्कामी होतो!रात्रभर 'हरी' हृदयास घट्ट पकडून ठेवले होते!बाळ आईच्या कुशीत बसतं तसं विठ्ठल कुशीत ढूस्या मारीत राहिलो होतो!पान्हा शोधित राहिलो होतो!विठ्ठल माऊलीला पान्हा फुटत होता!आम्ही विठ्ठलामृत पीत होतो!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
***********************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०८ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment