देवाचिया भेटी (श्री नृसिंह मंदिरं-पोखर्णी)भाग -१०
देवाचिया भेटी
(श्री.नृसिंह मंदिर-पोखर्णी जि.परभणी)
भाग-१०
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
************************
... नानाभाऊ माळी
सगुणात्मक जीवन जगण्याच्या आदर्श आचारसंहितेला 'धर्म' म्हणूयातं!माझ्या समजाप्रमाणे मी हे म्हणतो आहे!श्रद्धास्थानीं अंतःकरणपूर्वक शरण जाणे, नतमस्तक होणे,चित्त समर्पित करण्यातून अनुभूतीचा सर्वोच्च आनंद प्राप्त होतं असतो!मन चक्षुद्वारा सर्वांग सुंदर ईश्वराचं दर्शन होतं असतं!शुद्ध भावनेने अंतचक्षुतून पाहिल्यावर, सगुण-निर्गुण सद्गुण देऊन जातात!ईश्वर सेवेतून पुण्य प्राप्तीचं समाधान मिळत असतं!हे आत्मिक समाधान असतं!त्यातून सात्विक सकारात्मक ऊर्जा सर्वोत्तम मार्गाकडे नेत असतें!रामायण, महाभारत,भगवत गीतासारखे धर्मग्रंथ आदर्श आचरणाची नियमवाली आहेत असं मला वाटतं!धर्म ग्रंथाच्या अध्यनातून आढळून येतं की भगवान विष्णूनी मानव कल्याणसाठी, संयमीत जीवनाच्या उत्तम निर्वाह अन नियमनासाठी अवतार घेतलेले आहेत!श्री.भगवान विष्णूसं काळानुसार, परिस्थितीनुसार अवतार घ्यावा लागला असावा!अवतार महात्म्यातून दुष्ट शक्तीचा संहार केलेला आढळून येतो!माणसाला संस्कारीत,सुयोग्य मार्गांवर चालण्यासाठी 'धर्म' शिकवण देत असतो!धर्मग्रंथ मनाला मोकाट न सोडता सुसंस्कार जीवनरेषेतं आचरण करायला शिकवतात!विष्णू अवतार महात्म्य त्यातून स्पष्ट होत जातं!सामान्यजनावर संस्कारी आचरणाचा पगडा असतो!सर्वांचं भलं, कल्यानकारी सतमार्गाला धर्माचार्य मान्यता देत असतात!🚩
निर्मिती,नियमन,विलंय या तीन ही महत्वपूर्ण घडामोडी निसर्गात नियमित घडत असतात!निसर्गाचां स्वभाव आनंद देणारा असतो!सुंदर मनभावन निसर्ग माणसाला सत्वशील बनवीत असतो!प्रसन्नतेचा पुजारी बनवीत असतो!श्रीहरी विष्णूनीं काळानुरूप अवतार घेतलेलें आहेतं!ते निसर्गदेव आहेत!नयन मनोहारी निसर्गाचां साक्षात्कार देवरूप असतं!निसर्ग देवाचंच सुंदर रूप असतं!शुद्ध रूप असतं!मंगल रूप असतं!नदीतलं निर्मळ निळेशार पाणी मन मोहून घेत असतं!झाडांची हिरवीगर्द वनराई निसर्गाचं सजीव अविष्कार असतो!उंच उंच पर्वतं, त्यात उगवलेलं हिरवेगार गवत मन मोहित करीत असतं!नदीतलं पाणी संजीवन असतं!हवेची झूळूक प्रसन्नतेचा सुंदर अविष्कार असतें!ते डोळ्यात मावत नसते!अशा सुंदर निसर्गावर हक्क सांगणारी अनेक दुष्टप्रवृत्ती जन्माला आलेल्या दिसतात!कोणी निसर्ग ओरबाडून हक्क मिळववायचा प्रयत्न केलेला असतो तेथे खरा संघर्ष सुरु होतो!
मनुष्य स्वभाव मुळातचं वर्चस्ववादी राहिलेला आहे!निसर्गावर, इतर प्राण्यांवर अन कमकुवत माणसांवर राज्य करण्याची खुमखूमी सतत नाशाचं कारण ठरलेलं आहे!अशा अन्यायी,अनाचारी दुष्प्रवृत्तीसं धडा शिकवविण्यासाठी श्री.हरी विष्णूनां वेगवेगळ्या रूपात अवतार घ्यावा लागलेला आहे!त्यातील चौथा अवतार आहे श्री.नृसिंह!🚩
हिरण्यकश्यपू नावाच्या दानवानें अतिशय कठीण तपस्या करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं!मानव, दानव, पशु देव, गंधर्व, नाग यांच्याहातून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, कुठल्याही अस्र शस्रनें मरण येणार नाही!आकाश किंवा पृथ्वीवर मरण येणार नाही!सर्व देवांसारखेच अधिकार असणारा वर मागितला होता!'ब्रम्हदेव' तथास्तु बोलले!हिरण्यकश्यपूनें मिळालेल्या वराचा सदुपयोग न करता दुष्ट कामासाठी केला!
अतिगर्विष्ठ होतं स्वर्ग,पाताळ, पृथ्वी, गंधर्व जिंकून घेतलं!सर्व लोकं भयभीत झाले होते!तो भयंकर अत्याचार करू लागला होता!वराह अवतारातील श्री.हरी विष्णुने
हिरण्यकश्यपूच्या भावाचा वध केला होता तेव्हापासून श्री.विष्णूला कट्टर शत्रू मानत होता!द्वेष करत होता!अत्याचारी हिरण्यकश्यपूच्यापोटी प्रल्हादाचा जन्म झाला होता!पुत्रावर अतिशय प्रेम असणाऱ्या हिरण्यकश्यपूनें पुत्रास विचारले,'तूला सर्वात आवडतं कोण आहे?' प्रल्हाद बालमुखे सहज बोलून गेला,'या जगात श्री.हरी विष्णूपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही!ओमं नमो भगवते वासुदेवाय नमः हेचं श्रेष्ठ आहेत!'विष्णूचं नाव घेतल्याबरोबर हिरण्यकश्यपू भयंकर चिडला!प्रल्हादाला दूर ढकलून देत म्हणाला,' तूझ्या काकांना ठार मारणारा विष्णूचं नावही घेऊ नको!'
भक्त प्रल्हाद सतत श्री हरी विष्णू जप करतं होता,'ओमं नमो भगवते वासुदेवाय नमः!'.. हिरण्यकश्यपुने भक्त प्रल्हादाला ठार मारण्याचे आदेश दिले!कधी हातीच्या पायी, कधी उकळत्या तेल कढईतं, कधी विषारी सापांमध्ये, कधी पर्वतावरून कडेलोट तर कधी होलिकाद्वारा भक्त प्रल्हादास घेऊन अग्नी प्रवेश अशा सर्व आत्याचारातून भक्तप्रल्हाद जीवंत राहिला!
अत्याचारी हिरण्यकश्यपू आपल्या महालात एका खांबाकडे बोट दाखवून,चिडून भक्त प्रल्हादाला विचारतो,'काय तुझा 'विष्णू' या खांबात देखील आहे?' भक्त प्रल्हाद,'होय' म्हणतो!हिरण्यकश्यपू त्या खांबावर जोरात गधा मारतो!त्याक्षणी तेथून तोंडं सिंहाचं,शरीर मानवाच असं विचित्र रूप असलेंलं, अतिशय चिडलेलं भयंकर अजस्र रूप प्रकट होतं!नाव असतं.. श्री.नृसिंह!संध्यासमयी मांडीवर घेत आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचां कोथळा बाहेर काढतो!भक्त प्रल्हादासाठी श्री. हरी विष्णूनी नृसिंह अवतार घेतला होता!...🚩
आम्ही दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी देवदर्शन यात्रेला गेलो होतो!संत जनाबाईंचं जन्मस्थळ गंगाखेडला दर्शन घेतलं!पुढे २५ किलोमीटरवर पोखर्णी म्हणून गाव आहे!तिथं भगवान श्री.नृसिंहाचं भव्य दिव्य मंदिरं आहे!आम्ही त्याचं मंदिराच्या दर्शनाला गेलो होतो!आत खोल तळात महादेवाची पिंड आहे!दुसऱ्या अरुंद खोल गुहेत भगवान श्री.नृसिंहाची मूर्ती आहे!आत गुहेत जाऊन नतमस्तक होतं दर्शन घेतलं!श्री.हरी विष्णू चौथ्या अवताराचं दर्शन घेतलं होतं!चित्त शांत झालं होतं!पुढील दर्शनासाठी निघालो होतो!हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ दर्शनाला निघालो होतो!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.९९२३०७६५००
दिनांक-२६ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment