देवाचिया भेटी(संत जनाबाई-गंगाखेड, जि. परभणी)भाग-०९
देवाचिया भेटी
(संत जनाबाई-गंगाखेड,जि परभणी )
भाग-०९
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
****************************
... नानाभाऊ माळी
झीज या शब्दातून अनेक गोष्टींचीं उकल होत असतें!आपण नव घर बांधतो!नव घर छान दिसतं!नजरेत भरतं!सुंदर वाटतं!हृदयाला भावतं!पूढे भावनं कमी होत जातं! वर्ष जातात!उन्हाळा पावसाळा सहन करीत घर उभं असतं!काही वर्षें असेच निघून जातात!हळूहळू घराला दिलेला रंग उडायला लागतो!घर जुनं होतं जातं!कालांतराने ते झिजायलाही लागतं!झिज निसर्गाने दिलेलं दान असतं!....माणसाचंही असचं असतं!जन्म आनंद देणारा असतो!तरुणपण उमेद-आकांक्षेच्या घोड्यावर असतं!वृद्धत्व नको असतं!जन्म ते शेवटच्या निरोपापर्यंत शरीर कृश होतं जातं!झिजतं जातं असतं!वयपरत्वे सर्व घडत असतं!🚩
पण ज्ञानाचं गणित उलटं असतं!ज्ञान जितकं वाढत जातं तितकं समृद्ध होतं जातं!ज्ञान परिक्रमा असतें अनुभव अन संशोधनाची!जितकं घ्याल तितकं सोन्याहून पिवळं होऊ लागतं!अस्सल होत जातं!ज्ञान परीस असतं!ज्ञानी ज्ञान प्रकाशक असतात!ज्ञानप्रकाश विकासाचा हमरस्ता असतो!ज्ञान घेता घेता,देतादेता समृद्धीचं बंद द्वार उघडत राहतं!सामान्यजन ज्ञानी होऊ लागतात!ज्ञानी महाज्ञानी होऊ लागतांत!ज्ञानियांच्या संगे जग प्रकाशमान होऊ लागतं!ज्ञानी विज्ञातील असो,अध्यात्मातील असो, भूगोल,इतिहास,जीव,रसायन,भौतिक मानववंशशास्रांतील असो,ज्ञान सकारात्मक पायरीवर चढायला लावतं असतं!गाळून गाळून अतिशय शुक्ष्म होत जातं!ज्ञानजाळीतून जग कल्याणाचं मिशन हाती घेतलं जातं असतं!विज्ञान अन अध्यात्माच्या सोबतीने जग चालत असतं!हृदयातून श्रद्धा जोपासावी लागते!परमार्थ साधून साध्याकडे वाटचाल सुरु असतें!🚩
अध्यात्मातील भक्तिसंप्रदाय संताच्या प्रकाशित पाऊल वाटेने वाटचाल करतो आहे!संत समाजातील अज्ञान घालविण्यासाठी स्वतःसं झिजवत राहिले!शरीराने झिजत राहिले!समाज जागृतीतून,प्रबोधनातून भक्ती संप्रदायचा झेंडा चंद्रभागेतीरी नेऊन फडकवत राहिले!महाराष्ट्र दैवताच्या अंगणी फडकवतं राहिले!पंढरपूरात दिंड्या-वारीतून विठ्ठल दर्शन करून देत राहिले!अज्ञानाशी झुंजत प्रबोधन करीत राहिले!स्वतः दुःख सहन करीत,पचवत समस्त समाजासं ज्ञानउजेड दाखवीत राहिले!जाती पातीच्या भक्कम तटबंदी उध्वस्त करीत राहिले!भक्ती संप्रदाय वाढत राहिला!दुःख-कष्ट सहन करीत संत पदाला पोहचत राहिले!संत सतसंस्कार करीत असतात!संत समाजाचे डोळस गूरू असतात!शिक्षक असतात!अशाच महाराष्ट्र भूमीत संत जनाबाई होऊन गेल्या!परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे संत जनाबाईचं जन्म गावं होतं!कर्मभूमी पंढरपूर होतं!🚩
विठ्ठल भक्तीत डुंबलेल्या,निस्सीम भक्त संत जनाबाई,संत परंपरेतील महाकवी होत्या!अनुभवामृताच्या जननी होत्या!त्यांची भजनं अंतःकरणाला भिडतांना वास्तव अनुभूतीचा चंदणी लेप होते!एक वेगळ्या प्रकारची आर्तता त्यांच्या ओवीतून प्रकट होत जाते!आई-वडील विठ्ठल भक्त होते!नेहमीचं पंढरपूरात विठ्ठल दर्शनासाठी जातं असतं!जनाई थोडी मोठी झाली!ती ही आई वडिलांसोबत पंढरपूरला जात असे!जनाबाईला विठ्ठल भक्तीची अवीट गोडी वाटू लागली होती!एकदा आई -वडिलांसोबत पंढरपूरात आले असता लहान जनाबाई विठ्ठल मंदिरातचं राहिली!तिची अन आई-वडिलांची चुकामुक झाली होती!ते तिला शोधत होते!ती सापडली नाही!ते दुःखी-कष्टी होत गावी गंगाखेडला निघून गेले!लहान जनाई रात्रभर मंदिराजवळचं होती!विठ्ठल नामात एकचित्त झाली होती!नेहमीप्रमाणे सकाळी संत नामदेवाचे वडिल दामाजी शेठ नामदेवांसोबत विठ्ठल दर्शनासाठी आले असता ही लहानशी मुलगी त्यांना दिसली!विचारपूस केल्यावर कळले,जनाई हरवली होती!दामाशेठ तिला आपल्या घरी घेऊन आले होते!पूढे संत नामदेवांच्याचं घरी राहून, घरातली सर्व कामे करू लागली होती!केर काढता,दळण दळता, कांडता, गोवऱ्या थापता साक्षात विठ्ठलाशी एकरूप हाऊ लागली होती!
संत जनाबाईच्या बाबतीत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात!संत कबीरांपर्यंत जनाईचें अभंग पोहचले होते!जनाईची, किर्ती अन महती पोहचली होती!संत कबीर जनाबाईच्या विठ्ठल भक्तीची किर्ती ऐकून स्वतः जनाईला भेटायला येतात!तिची भक्तीची अपूर्वाई गातात!एकदा असचं संत जनाईचीं भक्ती किर्ती ऐकून संत कबीर आले होते!गावातील रस्त्यावर जाता जाता त्यांनी पाहिलं,एका गल्लीत दोन बायकांमध्ये गोवऱ्या चोरीचं भांडण सुरु होतं!त्यात त्यां दोघींनी योग्य न्याय करण्यासाठी संत कबीरांना बोलावलं!पण गोवऱ्या तर एक सारख्या दिसत होत्या?कोणाच्या कुठल्या कसं ओळखणार होते?जनाबाई सहज बोलून गेली,'ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी!' दोघांनी ते मान्य केलं!संत कबीर एक एक गोवरी कानाजवळ नेऊन वाजवूनं पाहू लागले त्यातील सत्तर टक्के गोवऱ्यांमधून 'विठ्ठल'नाम ऐकू येऊ लागले होते!त्यात जास्तीत जास्त गोवऱ्या जनाबाईच्या होत्या!संत कबीरांनी स्वतः या असामान्य संतांची,जनाबाईच्या विठ्ठल नामाची भक्ती अनुभवली होती!जीवनदृष्टी देणाऱ्या,भक्तीची महिमा जगात रूढ करणाऱ्या संत परंपरेतील जनाबाई श्रेष्ठ होत्या!
दळीता,कांडीता विठ्ठल नामाचं अमृत वाटणाऱ्या संत जनाईसाठी साक्षात पांडुरंग जात्यावर दळण दळतो!जनाईला दळू लागतो!असंच एकदा ब्रम्हपहाटे दळता दळता,विठ्ठला सोबत दळता दळता थकून जनाबाई जात्याजवळचं जागेवरचं झोपून गेली होती!विठ्ठलही तिचं वाकडं पांघरून झोपले होते!इकडे पहाटे भक्तजन मंदिरात आले!पांडुरंग घाई गडबडीत मंदिरात येऊन उभे राहिले!दर्शनाला आलेले भक्त आणि पुजारी आश्चर्यचकित झाले होते!देवाच्या अंगावरील दागिने,अभूषण रत्नपदक हार कुठे गेले होते? सर्वचं हैराण झाले होते!देवाच्या अंगावर वाकडं कुठून आलं हा प्रश्न होता!चौकशी अंती कळले,वाकडं तर जनाबाईचं आहे!तिच्याकडे जाऊन तिच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात आला!देहांत प्रायश्चितांची अर्थात फाशीची शिक्षा होते!चंद्रभागेतीरी सर्वांसमक्ष जेव्हा जनाईला शिक्षेच्यां अंमलबजावणीसाठी उभे केले जाते! तेव्हा तेथे जमलेले सर्वचं आश्चर्यचकित होतात!लोखंडी सूळ वितळून गळून पडला होता!सर्वांनां गुलाल,अबीर तुळशीमाळ दिसू लागले होते!चंदनाचा पवित्र सुगंध दरवळत होता!जमलेल्या सर्वांनी जनाईच्या चरणावर नतमस्तक ठेवत क्षमा मागितली होती!सर्वचं हरी विठ्ठल नामात दंग झाले होते!..
संत जनाईचीं भक्ती हृदयातून होती!उच्च कोटीची होती!पराकोटीची होती!भागवत धर्माची पताका फडकवणारी संत जनाबाई घरातील केर कचरा काढत काढत,दळण दळत-कांडत, गोवऱ्या थापत मुखी विठ्ठल नामाचं भजन गात राहिली!शुद्राघरी जन्मुन,दास्यत्व जगणं कपाळी असलेल्या या श्रेष्ठ संताच्या अभंगातून कधी दुःख दिसतं,कधी यातना उतरतात!कधी चोरीचा आरोप होतो!तरीही निस्सीम भक्तीमुळे पारमार्थिक जीवनाचं सोनं केलं होतं!जनाबाई विठ्ठलामृत पाजत राहिल्या!आदर्श भक्ती संप्रदाय जगण्याची शिदोरी होऊन गेला होता!त्यांची भजन लिहिण्यासाठी साक्षात पांडुरंग लेखणीक झालेले दिसतात!अभंग गाता गाता भाव माधुर्य त्यांच्या भक्ती रसातून प्रकट होत जाते!संत श्रेष्ठ जनाबाईनीं साधारण २००च्यां वर अभंग रचले आहेत असं मानतात!भक्ती संप्रदायाला श्रेष्ठत्वाकडे नेणारे हे अभंग म्हणजे आत्मिक उद्बोधन आहे!भक्तीत तल्लीन होऊन जाणारं उत्तम औषध आहे!डोळ्यातून अश्रू गळत राहतात!जनाबाई गात राहते!आम्ही चिंब भिजत राहतो!निस्सीम भक्तीची अनुभूती घेत राहतो!संत नामदेवांनीं देह ठेवला साधारण त्याचं वेळेस संत जनाबाई यांनी देखील पंढरपूरात आपला देह विठ्ठलाचरणी अर्पण केला असं म्हणतात!एका महान संताने निरोप घेतला होता!माऊली ज्योती स्वरूप झाली!आम्ही आजही भक्ती रसात न्हात असतो!डोळ्यातल्या असवांतून जनाबाई पाहात असतो!
आम्ही दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी,या संतश्रेष्ठ माऊलीच्या,संत जनाबाईच्या जन्मगावी परभणी जिल्ह्यातील गंगाखेडला गेलो होतो!संत जनाबाईच्यां दर्शनाभिलाषेने गेलो होतो!नतमस्तक होतं,हृदय अर्पित करून भक्तीरस सोबत घेऊन आलो होतो!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१९ एप्रिल २०२४
nanabhaumali.blogspot.com
Comments
Post a Comment